Feb 28, 2024
डॉक्टर्स डे स्पेशल

जगातील सगळ्यात सुंदर चेहरा

Read Later
जगातील सगळ्यात सुंदर चेहरा
गावाकडच्या अनेक डॉक्टरांचे सल्ले आणि औषधं घेऊन घेऊन थकलेलं ते कुटुंब शेवटी आपल्या छोट्याशा तीन वर्षाच्या बाळाला घेऊन कलकत्याच्या त्या प्रचंड मोठ्या मेडिकल कॉलेजच्या गेट समोर काय करावं, कुठं जावं अशा विचारात उभं होतं. खिशात पैसा नसला की जी अगतिकता चेहऱ्यावर येते ती त्या दोघं नवरा बायकोच्या चेहऱ्यावर दिसत होती.

एकतर त्यांच गाव आणि  कलकत्ता यात प्रचंड अंतर. जिथं रस्ते पोहोचलेले नव्हते, वीज पोहोचलेली नव्हती अशा एकदम दुर्गम भागामधून हे कुटुंब कलकत्त्या सारख्या महानगरात येवून पोचलं होतं. निव्वळ एकाच अपेक्षेने की आपल्या मुलावर योग्य उपचार व्हावेत .पण इथं तर  सगळी कडे माणसच माणसं. जो तो आपल्याच घाईत. कोणालाच कोणाकडे बघण्यासाठी वेळ नाही.

आणि याच्या जवळ होतं फक्त त्यांचं अशक्त, डोळे बंद करून नाजूक आवाजात रडणार त्यांचं बाळ. ते पण  इतकं अशक्त होतं की त्याच्या तोंडातून रडण्याचा देखील आवाज फुटत नव्हता.

जन्मताच अत्यंत नाजूक असणार ते बाळ लहान पणीचं गावातल्या वैदू डॉक्टरचे उपचार घेऊन घेऊन जास्तच आजारी होऊन गेलं होतं. जेंव्हा त्याची तब्येत सुधारण्याच्या पलीकडे गेली तेंव्हा तिथल्या डॉक्टरांनी त्याच्या आई वडिलांना त्याला कलकत्त्याला घेऊन जायला सांगितलं.आता ते बाळ  आपल्या जीवनाच्या आणि नशिबाच्या शोधात गावाहून कलकत्त्याला येवून पोहोचलं होतं. त्या ठिकाणी पोहोचल्या वर मात्र त्या जोडप्याला आपण सगळ्याच बाबतीत किती असहाय्य आहोत याची जाणीव झाली. त्या माणसांच्या महानगरातली ती प्रचंड गर्दी नुसती ओसंडून वाहात होती. जो तो घाई गरबडीत धावत पळत होता. सगळी कडे नुसती  बसेस, ट्राम, ठेले वाले, माणसांनी माणसांना ओढण्याच्या रिक्षा, मोटारी आणि माणसं यांची नुसती वर्दळ होती.

असंच ते दोघेही आजारी बाळाला  घेऊन किती वेळ उभं राहणार होते. काहीतरी करायलाच हवं होतं. शेवटी कशी बशी हिम्मत करून ते दोघ आत गेले. तिथं कोणीतरी दयाळू माणसाने त्यांना लहान मुलांचा वार्ड दाखवला. मुलगा जवळ जवळ बेशुद्ध अवस्थेतच होता.

त्या बाळाचं त्या दिवशी नशीब चांगलं होतं की त्या दिवशी तिथल्या डॉक्टरने त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला भरती करून घेतलं आणि लगेच उपचार करता यावेत म्हणून  पुढच्या चाचण्या करायला सुरवात झाली. बाळाचा श्वास मंद मंद सुरु होता. रक्त, लघवी, एक्स रे अशा सगळ्या चाचण्या घेतल्या गेल्या. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे रिपोर्ट आले. जे अत्यंत निराशा जनक होते. त्या बाळाच्या शरीरातील नवीन रक्त निर्माण करण्याची सिस्टीमच खराब झाली होती. त्या मुळे त्याच्या शरीरात नवीन रक्तच निर्माण होतं नव्हतं. या वर एकच उपाय होता. की दर दोन महिन्यांनी बाळाला कलकत्त्याला इथे आणायचं आणि रक्ताची बाटली चढवून दयायची. अर्थात ही पण गोष्ट काही सरळ सोपी नव्हती. त्या साठी, एखादा रक्तदाता गावावरून सोबत आणावा लागणार होता, तरच थोडे कमी पैसे लागणार होते.पहिल्या वेळी  रक्ताची एक बाटली देऊन तात्पुरतं त्या बाळावर उपचार करण्यात आले आणि त्याला घरी  सोडण्यात आलं.

असा क्रम आता नेहमी सुरु झाला.बाळाची तब्येत खराब झाली की दर दोन, तीन महिन्याने कोणीतरी रक्तदात्याला गावाकडून घेऊन यायचं. त्याच रक्त हॉस्पिटलमध्ये जमा करायचं आणि बाळाला एक बाटली रक्त देऊन काही दिवसांसाठी जीवन दान घ्यायचं. बरं हे, कुटुंब एव्हढं सधन पण नव्हतं की प्रत्येक वेळी एव्हढा खर्च करू शकेल.  प्रत्येक वेळी गावाकडून एक माणूस सोबत आणायचा म्हणजे त्याच्या गाडी भाड्यापासून खाण्या पिण्या पर्यंत सगळा खर्च या जोडप्यालाच करावा लागायचा.त्यातून कमाई शून्य. गावात शेती खेरीज काय काम असणार. हळू हळू शेती विकावी लागली. दागिने मोडावे लागले. हळू हळू सगळं संपायला लागलं पण माया मोठी वेडी असते. एकच आशा असायची काहीही झालं तरी बाळ जगलं पाहिजे.

पण एक दिवस खूप खडतर आणि सगळ्या गोष्टींची परीक्षा घेणारा निघाला. त्या दिवशी धो धो पाऊस सुरु होता. गावाची कालिंदी नदी दुथडी भरून वाहात होती. आणि संध्याकाळी बाळाला सणसणून ताप भरला.काही केल्या ताप कमीच होतं नव्हता. श्वास पण मंद मंद चालला होता.ही लक्षण आता त्यांच्या परिचयाची झाली होती. आता ताबडतोब दोन गोष्टी कराव्या लागणार होत्या एक म्हणजे रक्तदाता शोधायचा, दुसरं म्हणजे लगेच बाळाला घेऊन  कलकत्त्याला जायचं.

आई त्या अशक्त बाळाला मांडीवर घेऊन पदराने वारा घालत बसली होती आणि वडील त्या किर्रर्र अंधारात प्रत्येक घरोघरी जाऊन कोणी रक्त द्यायला मिळतो का याचा शोध घेत होते.प्रत्येक ठिकाणाहून त्या दिवशी त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्या दिवशी त्यांना कोणी रक्तदाता मिळालाच नाही. पण असं हातावर हात धरून बसणं पण योग्य नव्हतं.

अशा वेळी गावात एकच असं घर होतं जे त्यांना मदत करू शकत होतं. ते म्हणजे त्या गावचा जमीनदार. त्यांच्या घरी घोडागाडी होती.त्या घोडागाडीने जर त्यांनी यांना स्टेशन वर सोडलं असतं तर नंतर मिळेल त्या गाडीने ते सकाळ पर्यंत  कलकत्त्याला पोहोचू शकले असते.

आणि काय आश्चर्य, त्या रात्री बाळाचे बाबा जमीनदारा कडे जायला आणि ते घोडागाडीत बसायला एकच वेळ झाली. जमीनदार देखील स्टेशनवर जायला निघाले होते.

बाबूजी, कुठं निघालात. बाळाच्या बाबांनी  हात जोडून विचारलं.
कंदिलाच्या प्रकाशात जमीनदार बाबूंनी त्यांना पाहिलं आणि म्हणाले, अरे रेल्वे स्टेशनवर चाललोय. तिथून कलकत्त्याला पोहोचायचंय सकाळी लवकर.

बाळाच्या बाबांना तर क्षणभर काहीच सुचलं नाही. ते हात जोडून म्हणाले, कृपा करून आम्हालाही  स्टेशनवर सोडून दया ना. बाळाला  कलकत्त्याला दवाखान्यात न्यायचं आहे. बाळाची तब्येत खूप खराब झालीय. त्याला ताबडतोब दवाखान्यात न्यायला हवे.

अरे पण, पाऊस, वादळवारा बघीतलास का. तुझा मुलगा अजून आजारी पडायचा.

नाही. नाही. बाबूजी, तुम्ही मला देवासारखे भेटलात.आम्हाला स्टेशन वर सोडून दया ना. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही.

शेवटी जमीनदार बाबूंना काय वाटलं कुणास ठाऊक. ते म्हणाले ठीक आहे, चला मी सोडतो तुम्हाला स्टेशनवर.

बाळाला नीट गुंडाळून ती दोघं सकाळी सकाळीच हॉस्पिटलला पाहोचली.तिथं गेल्यावर काय करावं लागतं हे त्यांना आता पाठ झालं होतं. पण या वेळी परिस्थिती खूप गंभीर झाली होती. बाळ पूर्ण ग्लानीत होतं. आणि या वेळी त्यांच्या जवळ रक्त दाता कोणीच नव्हता. बाळाची आई खूप विवश झाली होती. डोळ्यातून सारखे अश्रू वाहात होते. तिने अखेर सगळा संकोच सोडला आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला रक्त देण्यासाठी पदर पसरून विनंती करायला सुरवात केली. असं रडणं हॉस्पिटलच्या वातावरणाला  काही गोष्ट नसते.

पण अचानक एका ऍप्रन घातलेल्या तरुण शिकाऊ डॉक्टरला तो आक्रोश पाहवला गेला नाही. अजून त्या तरुण डॉक्टरचे डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण देखील झाले नव्हते. कुणास ठाऊक त्याच्या हृदयात कोणती महा करुणा निर्माण झाली. त्या तरुण डॉक्टरने त्या बाळाची स्थिती पाहिली. बाळाचे श्वास हळू हळू मंद मंद होतं चालले होते. नाडी देखील खूप मंद सुरु होती. डोळे तर उघडतंच नव्हतं ते बाळ. डॉक्टरला एव्हढंच कळलं की जर या बाळाला वाचवायचं असेल तर ताबडतोब रक्त देणं खूप गरजेचं आहे. त्याने त्या बाळाचा ब्लड ग्रुप पाहिला आणि तो पळतच ब्लड बँकेत आला. तिथं त्याला कळलं की बाळाच्या ब्लड ग्रुपच रक्तच शिल्लक नव्हतं.

अचानक डॉक्टरला आठवलं की आपला आणि बाळाचा ब्लड ग्रुप एकच आहे. त्याने एक मोठा धाडशी निर्णय घ्यायचं ठरवलं. त्याने ब्लड बँकेत त्याच रक्त काढायला सांगितलं. आणि मेडिकलच्या इतिहासात असं धाडस कोणीच कधीच करणार नाही असा निर्णय घेतला.कधी कधी कायदे आणि नियम याच्या पलीकडे हृदयाचा आवाज वेगळाच निर्णय घ्यायला सांगत असतो. कदाचित त्या मुळे असेल,  स्वतःचच रक्त घेऊन हा डॉक्टर त्या वार्डात आला. आणि तिथल्या डॉक्टरची जुजबी परवानगी घेऊन ते रक्त बाळाला चढवायला सुरवात केली.

बाळ, जन्म मृत्यूच्या हिंदोळ्यावर झुलत होतं. जसं जसं रक्त बाळाच्या शरीरात जायला लागलं तस तसा बाळाचा श्वास आणि नाडी स्थीर झाली.हळूच बाळाने डोळे उघडले आणि त्याच्या अशक्त होठांवर अलगद हसू फुटलं. मला वाटतं कदाचित त्या बाळाला त्याला त्या डॉक्टरच्या चेहऱ्यात त्याला जीवनदान देणाऱ्या देवदूताचा सगळ्यात सुंदर चेहरा दिसला असावा.

( *सत्यघटनेवर आधारित* )गावाकडच्या अनेक डॉक्टरांचे सल्ले आणि औषधं घेऊन घेऊन थकलेलं ते कुटुंब शेवटी आपल्या छोट्याशा तीन वर्षाच्या बाळाला घेऊन कलकत्याच्या त्या प्रचंड मोठ्या मेडिकल कॉलेजच्या गेट समोर काय करावं, कुठं जावं अशा विचारात उभं होतं. खिशात पैसा नसला की जी अगतिकता चेहऱ्यावर येते ती त्या दोघं नवरा बायकोच्या चेहऱ्यावर दिसत होती.

( *सत्यघटनेवर आधारित* )
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Datta Joshi

Senior Pharmacy Officer

मी खूप सुंदर दिसतो असं मला वाटतं .मराठी कथा, कादंबरी, विनोदी कथा कविता, लिहायला आवडतात.इंग्रजी साहित्य, बंगाली साहित्य , मराठी साहित्य खूप आवडते.कोविड काळात कोविड योध्दा म्हणून काम केलं. रवींद्र संगीत प्रचंड आवडत.

//