Login

जागर त्या देवीचा

समाज परिवारणासाठी एक छोटी गोष्ट जिचा अर्थ मात्र डोंगराऐवढा निघतो
आपण नवरात्री साजरी करतो...उपवास करतो पूजा आराधना करतो 
पण या सर्वात आपण 
एका देवीला विसरतो  ती देवी म्हणजे,
     जीने "स्त्री शिकण्यासाठी" आणि स्त्रीला "शिकवण्यासाठी" या समाजाची अवहेलना सोसली तीच्या नावाने का बर आपन एक दिवस उपवास नाही करत? 

तीच्या नावाने नवरात्री सारखे दिवस का नाही पाळत?
आहे का याचे उत्तर तुमच्या कडे?
थांबा मीच देते उत्तर तुम्हाला..
आपण या देवीच्या नावाने उपवास किंवा जागर या साठी नाही करत कारण "ती" देव नाही, एक सामान्य स्त्री आहे.

आपल्या समाजात चार हात, आठ हात असणारी, भरजरी वस्त्र नेसलेली, कितीतरी दागिने घातलेली मूर्तीच देव आहे असा समज आहे.

पण ज्यांनी त्यांच्या दोन हातानी देवापेक्षाही मोठे काम केले आहे त्याला आपन देव नाही मानत... 
ही खंत आहे आपल्या पंरपरेची म्हणा किंवा समाजाची म्हणा.

ज्या रूढी - परंपरा झुगारून त्या माऊलीने शेणाचेगोळे, दगड अंगावर झेलले, लोकांचा तिरस्कार सहन केला. शेणाचे डाग धुवून तसेच ओले कपडे अंगावर घेऊन,ओल्या अंगाने शाळेत येऊन शिकवल. त्या माऊलीसाठी आपण आपली पंरपरा नाही बदलवू शकत का? विचार करा..
आपण हे नक्कीच करू शकतो त्यासाठी फक्त आपली मानसिकता बदलवायची गरजआहे. नास्तिक बना अस मी नाही म्हणतं. फक्त आपण कशाला महत्व जास्त द्यायला हवे हे सांगण्याचा प्रयत्न करतेय.

धन्य ती सावित्रीबाई फुले माऊली जिच्या मुळे तळागाळातील सर्व मुली शिकू शकल्या. 

चला तर मग या देवीच्या नावाने जागर करूया.. 
दोन हातांच्या या विद्यारुपी देवीला.. 
जनमानसात रुजवू या...???
सावित्री माईच्या नावाने जागर करूया.. ????

कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायचा माझा मुळीच हेतू नाही. फक्त माझे विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न करते. आवडल्यास like करा नाही आवडल तर कमेंट करून सांगा. रूढी परंपरा बदलवण्याचा एक प्रयत्न माझा. शेअर करायचा असेल तर नावासोबतच करा की विनंती. ??धन्यवाद ??
©जयश्री कन्हेरे -सातपुते