जगा वेगळं सासर भाग - 9

एक आगळी वेगळी कथा जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल


जगा वेगळं सासर भाग - 9


घरात वेगळाच उत्सव साजरा होतं होता. सासूबाईंचं आणि पूर्णाचं एक वेगळं ट्युनिंग जमलं होतं.
दोघी जोर शोरात तयारीला लागल्या होत्या. येता जाता एकमेकांना टिप्स देण सुरु होतं. सगळं छान सुरळीत झालं होतं पण तरीही पूर्णाच्या सासूबाईंच्या मनात काही तरी खुपत होतं. त्या नजरानजर करायला घाबरायच्या. बाबांना त्याची व्याकुळता लक्षात आली होती. त्या आपल्या खोलीत आराम खुर्चीवर डोळे मिटवून बसल्या होत्या. तेवढ्यात ते त्यांच्या जवळ गेले ...
"सुलभा, या आनंदाच्या क्षणात तुझ्या मनात काय खुपतय, कुणास ठाऊक. "

डोळे न उघडता त्यांनी नुसतंच " हम्म्म्म " म्हणून उत्तर दिलं.

"मला माहिती आहे कुठल्या तरी वादळाने घेरलंय तुझ्या मनाला. पण व्यक्त झाल्याशिवाय कसं काय कळेल. कोणती गोष्ट सलते आहे तुला?."

त्यांनी डोळे उघडले. लांब श्वास घेतला. काठोकाठ भरलेल्या डोळ्यातून भराभर अश्रू गालावर सरसावू लागले. त्यांनी अपराधी भावनेने हळूच मान वर केली आणि म्हणाल्या , " मी इतकी वाईट कशी वागली हो त्या निरागस पोरीशी. तुम्ही सुद्धा थांबवलं नाही हे पाप करतांनी. "

"सुलभा शांत हो शांत हो, असा विचार नाही करायचा आता. झालं ते झालं. मनं मोकळं कर. माणसाचा स्वभाव कधी कधी असं वागायला भाग पडतो पण तुला तुझी चूक कळली यातच तुझं प्रायश्चित आहे. "

" मला फार अपराधी वाटतं. घृणा वाटते मलाच माझी."

"सुलभा, सुलभा अगं आवर स्वतःला. आता असे रडत बसायचे दिवस सरलेत आपले. आपल्या सुखी संसारात आपला मुलगा, सून, नात सगळेच आहेत. किती जीव लावतात आपल्यावर किती काळजी घेतात. आपल्या अखेरच्या क्षणात आपल्याला अजून काय हवं?".

"खरंच तुम्ही अगदी बरोबर बोललात. मी इतकी वाईट वागूनही पूर्णाने घराला किती छान सांभाळलं. संस्कारी मुलगी आहे ती. मीच तिला समजू शकले नाही."

" आता तुच दे तिला पाठिंबा. "

"मी सदैव तिच्या पाठीशी असेल".

"पण मानावं लागेल बुआ सुनबाईला.... शेवटी जिलेबी सारख्या सासूला तिने अगदी दोरी सारखं सरळ केलं.", ठसका मारून हसत ते म्हणालेत.

"करा अजून मस्करी करा. तुम्हाला तर मला छळायचा एक चांगला टॉपिक भेटला.. नाही का? "

काहीही असो पण मंदारच्या बाबांना मनोमन फार आंनद होतं होता. शेवटी का होईना त्यांचही बिस्कीट मुरलं होतं.
घरात दिवसदिवसभर रंगीत तालीम व्हायची. सगळेच उत्सुक असायचे दोघींचा डान्स बघायला.
अखेर स्पर्धेचा दिवस आला. पहिली फेरी तर उत्तम झाली होती पण आता दुसरी फेरी अतिउत्तम होईल याची शाश्वती सगळ्यांच होती.
मागच्या वेळेपेक्षा या वेळेला दुप्पटीने लोकं कार्यक्रम बघायला हजर होते. हॉल खचाखच भरलेला होता. या वेळेला लक्ष्मी एवढे प्रेक्षक बघून घाबरली नाही तिने एक नजर पूर्णाकडे बघितलं आणि स्मित हसली. या वेळेला लक्ष्मी बिनधास्त होती पण पूर्णाला मात्र घाबरगुंडी सुटली होती. इतक्या वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या ऑडियन्सला फेस करणं तिच्या साठी सोप नव्हतं.
लक्ष्मीची आपली बडबड सुरूच होती आजीबरोबर. पण पूर्णा मात्र चुपचाप बसली होती. हात - पायाला थरकाप सुटला होता. तिची बैचैनी शिगेला होती. मंदारच पूर्ण लक्ष होतं तिच्यावर. तिची अस्वस्थता तो जाणून होता. तो हळूच तिच्या मागून आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"काय ग! इतकी अस्वस्थ नको होवूस. मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू खूप छान करशील. "

" मंदार सोपं नाही रे एवढ्या लोकांसमोर नाचणं. "

"अगं हो तुझं बरोबर आहे पण तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही मला पूर्ण विश्वास आहे तू जिंकूनचं येशील."

"अरे बाबा एवढा कॉन्फिडेंस नको दाखवू माझ्यावर अजून प्रेशर येतं ."

"ए बाई तू घरच्या एवढ्या टेरर व्यक्तीला नरमवलं तर हा डान्स किस खेत की मुली हैं ?", स्वतःच्या आई कडे इशारा करत तो म्हणाला.

"गप्प बस रे ", त्याच्या पाठीवर मारत ती म्हणाली..
"इकडे जीव कंठापर्यंत आलाय माझा आणि तुला मस्करी सुचते आहे",

"डोन्ट वरी पूर्णा तिला बघ ती कशी मस्त बिनधास्त आहे", लक्ष्मीकडे बोट दाखवून तो म्हणाला.

"तिला काय आहे चिमणीला, hसगळा भार माझ्यावर टाकून ती मटकते आहे इकडे तिकडे".

"तेवढ्यात मोठ्याने अनाउन्समेंट झाली यानंतर आपल्या पुढे नृत्य सादर करणारं आहे... लक्ष्मी आणि तिची आई पूर्णा... जोरदार टाळ्या होवून जाऊ द्या."

पूर्णाने लांब श्वास घेतला आणि लक्ष्मीचा हात पकडून मंचकडे वळली. मंचला नमस्कार करून दोघीही वर गेल्या. गाणं सुरु झालं.. तेचं गाणं तिचं फेवरेट... "पिंगा ग पोरी पिंगा"....

गाणं लागताच सासूबाईंच्या डोळ्यांना धारा लागल्या. यांच गाण्यावर नाचली होती म्हणून त्यांनी चार चौघात तिचा अपमान केला होता.
दोघी अप्रतिम नाचल्या. व्हॉट ए वंडरफुल सिंक्रोनायझेशन! अप्रतिम कोरीओग्राफी! ब्यूटिफुल एक्सप्रेशन! लव्हली मदर - डॉटर! जजेस मध्ये मध्ये कंमेंट करीत होते. त्यांच परफॉर्मन्स संपताच सगळ्यांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं... टाळ्यांचा कळकळात अक्ख्या हॉलमध्ये गुंजत होता.
त्यांचं परफॉर्मन्स खूप छान झालं होतं. मंचच्या खाली उतरताच सासूबाईंनी तिला घट्ट मिठी घेतलं व म्हणाल्या...
"तू तेव्हाही अप्रतिम नाचली होतीस आणि आजही अप्रतिम नाचली माझी लाडो".

पूर्णाने मिठी आणखीन घट्ट केली. सोबत लक्ष्मी, मंदार, बाबा सगळे त्यांना बिलगले. कॅमेराच फोकस त्यांचा कुटुंबावर आला आणि परत सगळ्यांनी कडाळून टाळ्या वाजवल्या. अगदी फोटोत कैद करण्यासारखा तो सुरेख क्षण होता.

सगळ्यांचे परफॉर्मन्स खूप छान झाले होते. कोण जिंकेल कोण नाही सांगणं खूप कठीण होतं. द्वितीय फेरीतील सगळे परफॉर्मन्स आटोपले होते. आता वाट होती निकालाची.

पूर्णाची आई आणि सासूबाई सतत देवाला प्रार्थना करी होत्या. मंदार आणि पूर्णाही हातात हात घालून होते. लक्ष्मी पण आजोबांच्या मांडीवर फिंगर क्रॉस करून बसली होती. सगळ्यांचीचं उत्सुकता शिगेला पोचली होती.

तेवढ्यात अनाउन्समेंट झाली...

"कसले वाटले सगळे परफॉर्मन्स... आवडलेत की नाही?"

"प्रेक्षकांनी जल्लोषात होकार दिला."

" मग काय वाटतं कोणत्या पाच जोड्या अंतिम फेरीच्या महास्पर्धेत पोहोचतील. "

पूर्ण हॉलमध्ये प्रेक्षकांचा आवाज गुंजत होता. सगळे आपापल्या स्पर्धेकांना पाठिंबा देत होते.

जजेस मंचावर आलेत... सगळे जीव मुठीत घेऊन बसले होते...

"मज्जा आली की नाही?"

"हो आली", प्रेक्षक घोळक्यातून मोठ्याने ओरडले .

"हाऊझ द जोश!"

"हाय सर", प्रेक्षक फुल्ल टू जोश मध्ये म्हणाले.

"तुमची उत्सुकता अजून न ताणता आम्ही निकाल जाहीर करतो. कॉम्पिटिशन खूप टफ होती. एवढ्या कंटेस्टंट मधून तिघांची निवड करणे खूप कठीण होतं. पण कॉम्पिटिशन आहे फॉर्मेट फॉल करावा लागेल."

पूर्ण हॉलमध्ये शांततेची लहर होती....

"आजच्या द्वितीय फेरीची पहिली विजेता जोडी आहे... लक्ष्मी आणि पूर्णा."

आपलं नावं ऐकताच पूर्णाचं अंग शहारून आलं. मंदारने तिला आणि लक्ष्मीला मिठीत घेतलं. सगळे आनंदाने नाचू लागलेत. सासूबाई दोघींच्या मटामटा पप्प्या घेऊ लागल्या. पूर्णाच्या आईला किती नाचू आणि किती नाही असं झालं होतं.
द्वितीय फेरीतून तीन जोड्या तृतीय म्हणजेच अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. इथून पुढे कॉम्पिटिशन अजून टफ होणार होती. पुढे काय आव्हान असेल कोणालाच माहिती नव्हतं. प्रत्येक वेळेला कॉम्पिटिशन अजून अजून कठीण आव्हानांनी टफ करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता.
" तृतीय म्हणजे अंतिम फेरी अजूनच कठीण असणार आहे. सगळे तयार आहात. "

प्रेक्षकांकडून आणि स्पर्धेकांकडुन "हो" चा जल्लोष झाला...

" या फेरीतच ठरेल कोण आहे "डान्सिंगचा सुपरस्टार". पुढंच आव्हान खूप आगळ वेगळ असणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेत फक्त्त दोन जोड्या सहभागी झाल्या होत्या. पण आता काही तरी नवीन होणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. आता पर्यंत कुटुंबातील एक व्यक्ती स्पर्धेका सोबत नाचली पण पुढे त्यात अजून एक सदस्य ऍड करायचा आहे".

"काय?", सगळे एकमेकांनकडे बघून आश्चर्यचकित झाले."

" शॉक बसला सगळ्यांना. मी सांगते काय करायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या घरच्या आणखीन एका सदस्याला नाचायला भाग पडायचं आहे. "
पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाने गजबजला...

"एस... टफ आहे पण अंतिम फेरीसाठी सिलेक्ट झालेल्या या तीन जोड्यांना जिंकण्यासाठी हे आव्हान पूर्ण करावंच लागेल."

देशमुख कुटुंबातील सगळे आव्हान ऐकून थक्क होते कारण त्यांच्या घरी नाचणारा तिसरा व्यक्ती कोणीच नव्हता. आता आपण पक्क्यात हरणार त्यांना माहिती होतं.
कार्यक्रम आटपून सगळे घरी पोचले. सगळेच चिंतेत होते. तिसरा सदस्य कोण असणार?

क्रमशः




🎭 Series Post

View all