जगा वेगळं सासर भाग - 4

एक अनोखी प्रेमकथा.... जी वाचण्यास भाग पाडते...


जगा वेगळं सासर भाग - 4
आता परत " गरीबीत गिला आटा" एक तर रात्रीचा राग त्यात पाळीचा द्वेष.... आता सगळं आणखीन कठीण होऊन बसलं . लवकर उठून पटपट सगळं आटपून सासूबासासूबाईंचा राग कमी करावयाचा प्लान पाण्यात बुडाला . उलट आता तिची सावलीही त्यांना आजुलाबाजूला नकोशी असते. आता उठूनही काही फायदा नव्हता. तिला ना स्वयंपाक घरात एंट्री होती ना हॉल मध्ये. गुपचूप तयारी करून मागच्या दराने क्लिनिकला जायचं होत. समोरच्या दारात मंदिर असल्यामुळे अशावेळी तिथून जायची सुद्धा परवानगी तिला नव्हती. त्या काय काय नियम लादायच्या त्यांचं त्यांनाच माहिती.
ती आपली तयार होऊन क्लिनिकला जायला तयार झाली.
मंदारही हॉस्पिटलला जायला तयार झाला. आता घरात एन्ट्री नाही म्हणून ती बिचारी नाश्ता न करताच जाणार होती.

"पूर्णा तू थांब उपाशी पोटी जाऊ नकोस मी आणतो तुझ्यासाठी नाश्ता. रात्री पण न खाताच झोपली होतीस", मंदार केविलवाण्या शब्दात तिला म्हणाला.

"जाने दो मंदार इच्छा नाही माझी."

"हे बघ काहीही झालं तरी अन्नावर राग नको", तिला थांबवून तो बाहेर पडला.

वेळेप्रमाणे नाश्ता डायनिंगवर सजला होता. मान खाली करून मंदार पुर्णासाठी नाश्ता घ्यायला बाहेर आला. आई - बाबा अगदी शांतपणे नाश्ता करीत होते. टीव्हीवर बातम्या सुरु होत्या. तो अगदी चोर पावलांनी खोलीत शिरला. तो चोरपावलांनी शिरला पण लक्ष मात्र सगळ्यांच होतं. थरथरत्या हाताने त्याने प्लेट हातात घेतली. चष्म्याच्या आतून आधीच टपोरे असलेल्या डोळ्यांना आणखीन टपोरे करून करून त्या मंदारला न्याहाळत होत्या.

गार वातावरणात चांगल्या माणसाला घाम फुटावा असा प्रसंग होता. मंदारची दमछाक बघून सासरे मात्र खुद्कन हसले. खरं तर ते मोठ्या मनाचे, बिनधास्त, मनमिळावू व्यक्तिमत्वाचे हसरे व्यक्ती होते पण बायको समोर त्यांचही फार चालत .पण ते मात्र नेहमी पूर्णाची कड घेत असे .

बाबांना हसतांनी बघून मंदार बिचाकला आणि खालची मान खाली ठेवूनच धूम ठोकत परत आला. ...

त्याला धावत पळत येतांना बघून मंदार दांदरला ..

"बाहेर सगळं ठीक हैं ना मंदार"

"ठीक आहे. तू आपला नाश्ता कर आणि निघ. विचार करत बसू नकोस. आता झालं ते झालं. उशीर होतोय तुला".

"तुमको किती घाम आया मंदार".

"माझं सोड ग. मला गर्मी होते आहे. तू आवर तुझं"

"मंदार सही मध्ये बाहेर ओके आहे ना सगळं".

"आई बसली होती डायनिंग वर जाम रागावली होती काही बोलली नाही पण तिचे डोळे सगळं बोलून गेले. अजूनही ती शांत झालेली नाही."

"मंदार मी कुछ दिवस साठी अम्माच्या घरी जाऊन येऊ काय?"

"हे बरं राहील. घरात थोडं वातावरण शांत झालं की ऐ मग परत. तो येईस्तोर आईचा रागही कुठल्या कुठे पळून जाईल."

"Hope For The Best Mandar", बोलता बोलता ती बॅग पॅक करते.

"हम्म्म्म.. चल बाय मी ही निघतो".

"बाय.... ख्याल रखो."

"आणि हो गाडी जरा हळू चालवं. विचार न करता ."

"हो रे."

ती खोली बाहेर निघतेच तो... सासूबाई बाहेर बंगळीवर पेपर वाचत बसलेल्या दिसतात. पूर्णाचे छक्के पंजे पळतात. त्यांना बघताच तिचा चेहरा पांढुरका पडतो. हातची बॅग धपकन खाली पडते. ती हळूच उचलते. सासूबाईंची अन् तिची नजरानजर होते.
ओठांवर शब्द यायला तयार नसतात पण कसं तरी हिम्मत एकवटून ती बोलते..
"आई कुछ दिन अम्माकडे जाऊन येते म्हंटल."

त्या हातचा पेपर खाली ठेवतात...
"उद्या मीराताईकडे स्वागत समारंभ आहे. घरचा प्रसंग आहे. तू नसलीस तर विचारतील सगळे. घरची सून प्रसंगात हजर हवीच. लग्नाचा बेत आटोपला की मग जा निवांत. आटा नको."
एवढं बोलून त्या परत पेपर हातात घेतात.

पूर्णा परत खोलीत जाते आणि बॅग ठेवून क्लिनिकला निघते.
रात्री असा प्रकार घडला तरी आईंना मी कार्यक्रमात हवी आहे म्हणजे त्यांचा राग गेला की काय? नाही असं नाही होऊ शकतं. एवढ्याने त्या शमणार नाही. राग तर त्यांना खूप आलेला असेल पण आज त्या जे काही बोलल्यात ना मनाला फार बरं वाटलं. विचार कर मी न सांगाताच अम्मा कडे निघून गेले असते तर आईंना अजून राग आला असता. बरं झालं त्या बाहेरच बसल्या होत्या. तिचा आपला मनातल्या मनात विचार सुरु असतो.

रात्री लवकर जायचं म्हणून तिने झटपट कामं आटोपली आणि घरी निघाली. मंदारही हॉस्पिटलमधून परतला होता. घरंच वातावरण तसं सामान्यच होतं. सगळे वेळवर कार्यक्रमात पोहोचलेत. हजर असलेले प्रत्येक जण पूर्णाच कौतुक करीत होते. सासूबाईंजवळही तिच्या प्रशंसेचे पूल बांधन सुरु होतं. सगळ्यांच्या चर्चेचा विषय फक्त्त पूर्णाच होती.
जस चालल आहे सगळ तसच चालल होत. पूर्णा मंदारच्या घरच्यांच्या मनात आपली कोरडी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती आणि तोंडघशी पडत होती... घर आणि क्लिनिक मोठया हिम्मतीने ती सुरळीत चालवायची...पण सासरच्या लोकांच्या अपेक्षा पुर्ण करता करता स्वतःला ती हरवुन बसली..... सदैव खळखळत असणारी पूर्णा कोमेजू लागली होती.. मराठा आणि दक्षिणी संस्कृती जपता जपता तिचा मुरांबा व्हायचा.... तिच्या माहेरच्या लोकांची सासुबाईंना खुप चिड होती.... तसे ते अगदीच कमी यायचे पण पूर्णालाही वारंवार माहेरी जाऊ द्यायचे नाही... ती माहेरी गेली की नॉन व्हेज खात असावी म्हणून ती माहेरून आली की त्या तिला स्वयंपाक खोलीत फार येऊ द्यायच्या नाही.

त्या खुप नियमबद्ध आणि तत्ववादी होत्या... दुसऱ्या संस्कृतीची धाप घरात पडु नये म्हणुन त्या वाटेल ते करायच्या.....
त्यांच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून एकही मुलगी जन्माला आली नव्हती... खुप नवस पाणी केलेत पण आजतायत तसं झालं नाही म्हणुन मुलीच प्रेम काय असतं त्यांना कळे ना... तिच्याशी कसं वागावं? , तिला कसं समजवाव त्यांना उमजेना... त्या फक्त आपल्या तत्वांना घेवुन चालायच्या...
पण मंदार पूर्णाला नेहमी म्हणत असे” माझी आई नारळाप्रमाणे आहे...तु फक्त धीर धर”... पण त्यांचं वागणं बघुन तिला याची शाश्वती दिसत नव्हती...सासरे बरेचदा पूर्णाची साथ द्यायचे पण सासुबाईंच्या भितीपोटी ते ही घाबरायचे... त्यांच्या पुढे कुणाची चालत नसे....
मंदार मात्र तिला आपलं शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करायचा.
वर्षाकाठी तिला दिवस गेले... दुसऱ्या पीढ़ीतील पहिल बाळ येणार होत...पण सासुबाईंच्या वागण्यात मात्र काही फारसा बदल झाला नव्हता... पण घरातील वातावरण हळुहळु बदलाच्या दिशेने वळत होते...काही नियम आता शिथिल झाले होते. घरात तिच्या आवडीचे पदार्थ बनायला सुरुवात झाली होती. म्हणजे आधी डोसा, इडली, सांबर वडा क्वचित म्हणजे सासूबाई घरात नसल्या तेव्हाच बनायचा पण आता दिवसा आड तिला आवडेल ते बनू लागलं. कधी मंदार तर कधी सासरे तिला बनवून द्यायचे. सासूबाई आपलं मराठी डिश बनवायच्या तेही ती आवडीने खायची. ती जास्तीत जास्त आनंदी राहावी याचं प्रयत्नात असायचे दोघ.
तिला नव्वा महिना लागला . घराण्यात नवीन पिढीच पहिलं बाळ म्हणून सासरी मोठ्या थाटामाटात तिचा ओटी भरण्याचा सोहळा साजरा करण्यात आला.

सगळं अगदी सुरळीत सुरु होतं.अचानक एका अर्जेन्ट सर्जरीसाठी मंदारला नजिकच्या गावात जावं लागलं. घरात तिघेच होते. सासू - सासरे आणि पूर्णा. तसं नऊही महिने तिला काहीच त्रास झाला नाही. नियमित क्लिनिकला जाणं, घरची कामं, सगळं वेळेवर होतं. शिवाय पूर्णा स्वतः डॉक्टर म्हणून तिने त्याला बिनधास्त जाण्यास सांगितले. नेमकं दुसऱ्या दिवशी रात्री पूर्णाला पोटात कळा सुरु झाल्या. तोंडातून आवाजही निघे ना. ती कशीबशी खोलीबाहेर निघाली आणि सासू सासऱ्यांना उठवू लागली. तिला अश्या अवस्थेत बघून दोघे जाम घाबरले. कधी प्रेमाने जवळ न घेणाऱ्या सासूबाईंनी तिला मांडीवर डोकं ठेवून शांत केलं.
---------------------------------------------------------------------------

क्रमशः
पुढे काय होईल पूर्णाची डिलिव्हरी सुरळीत होईल काय? बघूया लवकरच पुढच्या भागात...

©️®️ सौ. अश्विनी रोशन दुरगकर.


🎭 Series Post

View all