जगा वेगळं सासर भाग - 2

एक खूप सुंदर लव्ह स्टोरी जी प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल.
पूर्णा आणि मंदार एका मेडीकल काॅलेजमध्ये एम॰बी॰बी॰एस॰ चे सहपाठी होते.... पूर्णा चेन्नई ची राहाणारी साऊथ इंडियन कम्युनिटीमधन बिलॉन्ग करणारी श्रीमंत घराण्याची ऐकुलती एक लेक. साधारण सावळ्या वर्णाची, लांब कमरेला विळखा घालणारे कुरळे केस, नाकी डोळी अगदी चरमरीत, घप्प काळे पाणीदार डोळे .. तिचा वर्ण जरी सावळा असला तरी सौंदर्य मात्र सगळ्यांना वेड लावणार होत. अगदी साधं पण मोहक. जेवढी तिची देखणी साधी तितकंच स्वभावाने मोहणार तीच व्यक्तिमत्व...

इकडे मंदार एकदम शुद्ध मराठा... गोरा चिट्टा. एकदम हँडसम. गबरू जवान. पाहण्या देखणीला एखाद्या नायकाला मागे पडणारा. आपल्या मजाकी आणि मनमिळावू स्वभावाने तो सगळ्यांचं मन मोहून घ्यायचा. अगदी सामान्य संयुक्त कुटुंबात वाढलेला.... टिपिकल "मम्माज बॉय" . आईचा शब्द म्हणजे जणू त्याच्यासाठी पत्थर कि लकीर...आई काहीही म्हणणार आणि तो डोकं हलवणार.
घरातील सगळे डॉक्टरी पेशातले. अगदी पणजोबा, आजोबा आणि बाबा सुद्धा मग परंपरेनुसार मंदारलाही डॉक्टरच व्हावं लागणार होतं अगदी त्याची इच्छा असो अथवा नसो. तसं त्याला ऍक्टर बनायचं होतं अगदी लहाणपणा पासून सुंदर हुबेहूब मिमिक्री करायचा पण आईला अजिबात आवडतं नसे.
मग काय मन मारून त्यांच ऍडमिशन शहरातील मोठ्या कॉलेजमध्ये झालं.

कॉलेजचा पहिला दिवस.... तो चालला होता आपल्या मित्रांबरोबर तेवढ्यात...
बेधुंद वाऱ्याच्या गतीने पळत पळत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत धावतांनी पूर्णा आणि मंदारची जोरदार टक्कर झाली. ती खळखळ हसत मैत्रिणींचा पाठलाग करीत पळत सुटली होती आणि मंदार मित्रांसह फिरत होता तेवढ्यात दोघे एकमेकाला धडकले आणि पूर्णा सरळ त्याला धडकून हातावर पडली. एकदम ढासू पिक्चरवाली एन्ट्री ... ती त्याच्या हातावर आणि त्याच्या हाताचा विळखा तिच्या कमरेवर... तिचे लांब सळक केस खाली जमिनी पर्यंत टेकले होते..

बॅकग्राऊंडवर जाणू हळू हळू म्युझिक वाजत होतं......

ओह्ह्ह होsssssss त्याच्या हृदयाची स्पंदन ती स्पष्ट ऐकू शकतं होती.. वाटलं सगळंच थांबलं... आजूबाजूचे अदृश्य झालेत. वेळ जणू गोठला त्याच्या बाहुपाशात...
अगदी त्याच क्षणी तो तिच्या प्रेमात अडकला आणि तीही हरवून बसली स्वतः.
तीच हळूच लाजणं, केसांची बट अलगद सावरणं, खळी पडलेल्या गालावर एक वेगळीच लाली येणं, मग हसू कि नाही म्हणून अलवार हसणं.... त्याला ती जाम आवडली बोले तो "Love at first side.”
ती अलगद सावरली त्याच्या डोळ्यात डोळे घालून तोही बावरला सगळ्यांना आजूबाजूला बघून....
"सॉरी लक्ष नव्हतं ", मंदार बाजू सावरत म्हणाला..
" हम्म्म्म कोई बात नही. ", एवढं बोलून ती निघून गेली...

ती आपली निघाली....
पण तो अजूनही स्वप्नात होता तिच्या आणि ती अजूनही अडकली होती बाहूपाशातच त्याच्या. दोघेही कॉलेज कॅम्पस फिरून घरी निघालेत. पण मन मात्र अजूनही त्याच खोलीत अडकलेलं होतं. अजूनही स्तब्ध होतं... त्याला तिचे दिपलेले नयन वारंवार डोळ्यांसमोर ओझंरत होते तर तिला त्याचा स्पर्श राहून राहून अंगाला शहारत होता...कधी सकाळ होते आणि कधी एकमेकाला बघतो असं झालं होतं दोघांना.
कशीबशी झोप लागली आणि सूर्योदय झाला. नेहमी अलार्म 10 मिनिटे पुढे ढकलत ढकलत एक तास जास्तीची झोप घेणारे दोघेही पहिल्या रिँग मध्ये उठून बसले. लगबगिने तयार होऊन कॉलेजला पोहोचले. जिकडेतीकडे सानसूनच होतं. अजून एकही जण कॉलेजमध्ये हजर नव्हतं.
मंदार आपला फटकाजवळच्या बेंचवर बसला. हळूहळू मित्र मंडळी येऊ लागली. त्याची नजर अजूनही तिलाच शोधत होती.
लांबून पार्किंगजवळ ती त्याला मैत्रिणी सोबत येतांनी दिसली.
उफफ्फफ अगदीच जान लेवा... तिने लांबून त्याला एक नजर वर करून बघितलं आणि गालावर आलेली बट मागे केली. तेवढ्यात दोघांची नजरानजर झाली आणि तो खल्लास ...
एकाच बॅच मध्ये - एकाच खोलीत कधी एका बेंच वर तर कधी बसच्या एकाच सीटवर.... म्हणजे कधी कळत तर कधी नकळत दोघे एकमेकांना नजरेत भरून घ्यायचे . पण कधी मनमोकळे बोलायचे नाही. माहिती दोघांनाही होतं पण व्यक्त करायची हिम्मत नव्हती.
पुढे पुढे या त्या कारणांवरून दोघे एकट्यात भेटू लागले. म्हणजे कधी फील्ड व्हिसिट... कधी कॉफी तर कधी पार्क... मिळणं जुळणं वाढू लागलं... दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला. डॉक्टरकी शिकता शिकता दोघेही आपल मन हरवून बसले. दोघांची गुढ मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित होऊ लागली.

कॉलेजच शेवटचं वर्ष आणि दक्षिणी परंपरेप्रमाणे वयात आलेल्या पूर्णाच्या आई - वडिलांना तिच्या लग्नाची झालेली घाई. पूर्णाला काही सुचतं नव्हतं. अजून पर्यंत दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. कॉलेज संपलं. परीक्षा झाली. सरता शेवटी निकालही लागला. आता दोघेही घाबरून चालणार नव्हतं.
मंदारचाही तिच्यावर जीव जडला होता पण तो कधीच व्यक्त होणार नाही शिवाय घरच्यांच्या विरुद्ध जाऊन आंतरजातीय लग्नही करणार नाही याची शाश्वती तिला त्याच्या स्वभावावरून आली होती. घरच्यांच मन दुखवून आपलं सुख साधणारा तो नव्हताच. मन कधीचेच एक झालेले होते पण आता प्रॅक्टिकली विचार करायची गरज होती. तो संधी साधणार नाही म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल असं पूर्णाला वाटलं.

काही तरी करावं जेणे करून आणखीन एकमेकाच्या जवळ येता येईल म्हणून पास झाल्याच्या आनंदात तिने घरी पूजा ठेवली . त्या निमित्त्याने वर्गातील सगळ्यांना निमंत्रण दिले. मंदारलाही वेगळं स्पेशल निमंत्रण दिलं . घरच्यांशी ओळख व्हावी आणि त्याला तिचं बॅकग्राऊंड कळाव म्हणून तिने त्याला निमंत्रण दिलं होतं.
ती आपल्या पारंपरिक संस्कृतीप्रमाणे छान टापटीप साडी नेसून, कपाळावर चांदनाचा टिळा, त्यात केसांना माळलेला अबोलीचा गजरा तिच्या सौंदर्याला चार चंद्र आणखीन लावतं होता.
इकडे मंदारही आपला अगदी पारंपरिक पोशाखातच पोहोचला. आकाशी रंगाचा कुर्ता-पायजमा, कपाळावर लाल कुंकवाचा टिळा, चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास..
त्याचं व्यक्तिमत्व नेहमीप्रमाणे खुलून दिसतं होतं.
तो आला...
तिने नजर वर करीत त्याला बघितलं.
त्याने गाडी पार्क केली..
लांबूनच दोघांची नजरा नजर झाली.
तिने लाजून नजर खाली केली.
आजचा दिवस खास होता आणि त्या खास दिवसाला आणखीन खास बनविण्यासाठी ती नटली होती त्याच्यासाठी.
ती आपल मन त्याच्या पुढे व्यक्त करणार होती पण त्या आधी तिला तिच्या संस्कृतीची छाप त्याच्यावर पाडायची होती. जसा तो आपल्या धर्माचा मराठी संस्कृतीचा बाणा कायमच गर्वाने पाळतो तशी ती पण तिच्या दक्षिणी संस्कृतीची पुजारण . तिलाही मनाभावाने देवाला साकडं घालायला आवडतं हे त्याला तिला सांगायचं होतं आणि हो लग्न करून ती मराठ्यांची सून झाली तरी आपली संस्कृती ती सोडणार नाही हा मॅसेज त्याच्या पर्यंत तिला पोहोचवायचा होता.
दोघांच्या संस्कृतीमध्ये, पेहऱ्यामध्ये, बोलीभाषेमध्ये फरक असला तरी दोघेही प्रेमाने एकमेकाच्या परंपरेचा आणि आस्थेचा स्वीकार करू हे तिला त्याला आवर्जून सांगायचं होतं.

तिने संधी साधून मंदारला आपल्या खोलीत नेले . मंदार आधी बिचकला पण तिने त्याचा हळूच हात धरला आणि म्हणाली
"हे बघ मंदार अभी बहोत हुआ. कुछ आगे का सोचा या नहीं".
"काय ग कसला विचार?", तो कोऱ्या पाटीप्रमाणे तिच्याकडे बघत होता.
तिने त्याच्या हातावर ताडकन मारली आणि म्हणाली", हे बघ मंदार कोणी माझ्या घरी डोली आणायच्या आधी तू कुछ तो भी कर."
तो बिचारा डोळ्यांची पापणी न लावता एक टक तिला बघत होता...
तिने परत त्याच्या दंडावर हाणून दिली...
"नुसताच आँखे फाडून काय बघतो. बंदर दिसते आहे काय मैं. एक तो मी प्रपोज करते आहे तुमको. उसमे तुमको नाटकं सुच राहा हैं|".

" अग अग रागावू नकोस शांत हो शांत हो", तिचा हात प्रेमाने जवळ घेऊन तो म्हणाला.
"आज किती गोड दिसते आहेस तू. मी अगदी पहिल्या नजरेत तुला बघताच क्षणी प्रेमात पडलो होतो. पण कधी हिम्मत झाली नाही. आज तू डायरेक्ट लग्नाच बोल्लीस. किती बरं वाटतं आहे".
"मला माहिती होतं तुम नही बोलोगे फिर क्या" प्यार किया तो इजहार तो करना पडेगा ना".मंदार आता निकालही लागला आपण दोघेही पास झालोत आता नक्की घरी लग्नाची बात चालू होंगी. मेरा दिलं बैठा जा राहा हैं|"
"हे बघ मला ही तूच हवी आहे माझी बायको म्हणून.पण आधी घरी तर बोलू दे".
"मंदार कधी ऑलरेडी मेरी शादीकी घाई झाली आहे घरच्यांना."
"हो ग मी बोलतो घरी. पण तुला हे जितकं सोपं वाटतंय ना तितकं नाहीच. माझ्या घरचे तुझ्या घरच्यांच्या अगदी विरुद्ध आहेत."
"मंदार तुमको लग्न करने का हैं या नहीं|"
"आताच बोललो ना... माझं प्रेम आहे तुझ्यावर."
"मग बोल उद्या घरी".
तिने त्याला घट्ट मिठीत घेतलं. चेहऱ्यावरचा आनंद गगणात मावेना असं झालं होतं दोघांच. एवढं बोलून दोघेही बाहरे पडलेत . जेवण आटपून तो घरी निघाला. ती रात्र खूप जड जाणार होती त्याला आणि तिलाही. त्याला राहून राहून तिचीमिठी आठवतं होती. उद्या काहीही करून आपण घरी बोलायलाच पाहिजे म्हणून तो रात्रभर शक्कल लढवत बसला होता.
कसं बोलावं. काय बोलाव. त्याला काहीच सुचेनास झालं होतं
मंदारची जाम थरारली होती. तो सकाळी उठला. हिम्मत एकवटून हॉलमध्ये बसला पण आई दिसली अन् गुपचाप खोलीत परत आला. जवळपास दहा-पंधरा दिवस तेच चाललं शेवटी तो रात्रभर विचार करून सकाळी बोलायला आईसमोर जायचा आणि घाबरून परत पळत यायचा. किती तो आईचा धाक त्याला. जाम टेरर होतं त्याला.
येत्या रविवारी पूर्णाला बघायला मुलगा येणार होता. ती खूप रागावली होती त्याच्यावर अन् तिला अजून कुणी तरी दुसरं बघायला येणार म्हणून मंदार ही वैतागला होता.

आदल्या रात्री म्हणजे शनिवारी मध्यरात्री तिचा कॉल आला...
फोन वाजतो.. तो एका रिंग मध्येच रिसिव्ह करतो...
" सोये नहीं क्या अभितक. "
"नाही".
"मंदार मेरा दिलं बैठा जा राहा हैं यार मेरा . कल कोई और आयेगा मुझे देखने. मैने बहोत कोशिश अम्मा को समझानेकी पर नहीं माने. कुछ करो मंदार", पूर्णा आवंडा गिरत म्हणाली.

"पूर्णा मी खूप प्रयत्न करतो आहे पण आईशी बोलणं इतकं सोपं नाही."

" मग तुला मला भुलना पडेगा मंदार. "

" असं नको बोलू प्लीज पूर्णा असं नको बोलू".

आणि ती फोन कट करते...
क्रमश:

लव्ह स्टोरीला जबरदस्त सुरुवात झाली... पुढचा भाग आपल्या भेटीला लवकरच.

©️®️ सौ. अश्विनी रोशन दुरगकर.

जगा वेगळं सासर भाग - 1 वाचा खालील लिंक वर...
https://irablogging.page.link/aH6d4fapPYBcJajV7

🎭 Series Post

View all