जगा वेगळं सासर भाग -1

कथा एका अश्या स्त्रीची जी आपल्या कर्तृत्वाने आणि प्रेमाने अक्ख जग काबीज करते..
सारखं सारखं तेच तेच गाणं वाजताय . जणू मला जळवायला कुणी तरी मुद्दामच वारंवार वाजवताय. ना माझे पाय साथ देतात आहे ना माझं डोकं.. बहोत नाइन्साफी हैं ये भगवान.. यईच गाना मिला था... कान बंद करूया या आँखे कुछ समझमे नाही आ राहा, तिचा आपल्या मनाशीच संवाद सुरु होता...
मात्र बॅकग्राऊंडवर हे गाणं सतत वाजत होतं.. 

"" पिंगा ग पोरी.... पिंगा ग पोरी.... पिंगा ग पोरी... पिंगा ”..  
       हे भगवान ये गाणा बंद करा... माझ्या पायातली शिल्लक डोके मध्ये जाते... यार कोई दुसरा गाण बजाव ना...
     “अरे वहिनी काय अर्ध मराठी.. अर्ध हिंदी”, रीमा पूर्णा ला म्हणाली आणि दोघी खळाखळा हसू लागल्या.... 
“अरे बाबा मेरे को इतनी ही आती है। तुझ्या दादाने बड्या मुश्किलने शिकवल”..... पूर्णा मस्करी करत म्हणाली...

“पर तू त्याला बोल ना हे गाणं बंद करायला”... 
“अरे पण का...? एवढ छान गाण तर आहे हो वहिनी. त्या दोघी चोंबड्या नाचणार आहेत ना उद्या या गाण्यावर.”

“ काय....? अरे देवा... मेरेको ये गाना न खुप पसंद आहे. आमच्या डांस क्लास मध्ये मस्त शिकवला होता... हे काय पोरया बकवास डान्स करत है |”..

“अरे वहिनी क्या बात है... करा न मग डांस कोणाची वाट बघताय”...

“पहिलेच तो मेरे हिंदी मराठी पे आधा समाज हसता है। आता नाचेल बिचेल तर लोक और बात करेल”....
“ह्म्म्म्म्म्म्म...”
"वहिनी तुम्ही माझ्या लग्नात नाचाल आज असू द्या आत्या भडकतील अजून."

"जाने दे बाई आपले कान बंद केलेलेच बरे."

  ती स्वतःच लक्ष दुसरी कडे वळवू लागली... पण मन काही लागेना. ते गाणं तिच्या कानाला सतत छळत होतं सोबत पाय थिरकायला आतुर होते.... पण मनाला घट्ट आवर देत ती स्थिरवली होती..

     तिकडे मंदार आपला पाहुण्याच्या सैरबराई मग्न होता. शेवटी आत्याच्या घरचं लग्न...
    शेवटी ण राहवतं तिने त्याला आवाज दिला...

"अरे सुनो ना."
"काय ग? मी मगापासन नोट करतोय तू काही तरी रेस्टलेस दिसतेय."
"चल एवढं तर तू ओळखलं. बरं मला या गाण्यावर नाचायचय."
"काय????"
"ऐ बाई... तुझ तर काही तरी भलतच सुरु असत. इकडे तुला चार लोकात मिरवायला आईला आवडत नाही त्यात तू नाचली बिचली ना मग सरळ आपलं सामान पॅक करून दक्षिण भारतातच आपल्याला आपला संसार थाटावा लागेल ”...

“ऐ problem solve करणा जमत नाही तो पुछा क़्यु और फार बडबड करतो हैं रे तू. दम तो नाही तेरे मैं. फटरुचंद आया बडा प्यार मोहब्बत करणे.!!!"

“ये माझ्या प्रेमाला मध्ये नको ओढूस हाsss ! आणि काय ग हे तुझं जेव्हा तेव्हा फटरुचंद ... फटरुचंद काय म्हणत असतेस तू मला.

थांब... चक्कर चालवतो काही तरी.”....

           तिचा तीर मात्र निशाण्यावर लागला होता मनोमन ती खुशीने चहकू लागली होती ... 

       आता पर्यंत ती अशीच जगली होती तिच्या माहेरी. खुल्या वातावरणात उडायची सवय होती तिला.. आई-वडिलांची एकुलती लाडाची नवसाची लेक. काही मागायच्या आधीच तिला सगळं मिळायचं. हव्या नको त्या सगळ्या जिद्द पूर्ण व्हायच्या तिच्या. 

     अगदी सात वर्षाची होती तेव्हा पासन ती कत्थक शिकत होती.. पुढे पुढे बऱ्याच परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण करून ती विशारद झाली...अगदी गणपती जवळ डान्स करण्यापासून ते नेशनल लेव्हल वर भाग घेण्यापर्यंत सगळीकडे ती चॅम्पियन होती.

      लग्न झाल आणि सगळे शौक़ जागच्या जागी राहालेत.. पण गाण वाजल की तिला थांबविणे अशक्य होतं .

 "ते म्हणतात ना.. कसल ज़री वेड लागल तर माणुस वेडा झाल्या शिवाय राहात नाही". असच काहीस तिच्या बाबतीत घडायच.. नृत्य तिच्या रगारगात होते.. आणि गाणी वाजली की रगारगातील नृत्य अंगभर सळसळायच....

  इकडे मंदार एक नजर आईकडे बघायचा दुसरी नजर पूर्णाकडे फिरवायचा ... पूर्णाला प्रॉमिस तर करून आला पण पूर्ण करणे कस जमेल त्याला काही कळत नव्हतं... 

  मग काय वादा किया तो निभाना तो पडेगा ना...!!!! मंदारला एक भन्नाट आयडिया सुचली . त्याने ताईला नाचायला ओढल... ताईनी आईंना ओढललं ... आईने रीमाला ओढल आणि शेवटी मंदारचा पैतरा कामी आला... रीमाने पूर्णाला डोळा मारला आणि जोरात मध्ये ओढले... मग काय पूर्णा डान्स वर चान्स मारायला... तयारच बसली होती. साडी खोचली आणि तिने सुरवात केली.. तिचा डान्स सुरु होताच सगळी मंडळी स्तब्ध झाली... तिचा डान्स सुरु होताच सगळी मंडळी स्तब्ध झाली... तिने नाचायला सुरवात केली आणि सगळे डोळे फाडून बघू लागले. तिच्या नृत्यातून तिच्या संस्कृतीचा आणि संस्कारचा अनोखा झरोखा प्रदर्शित होत होता... किती नयनरम्य दृश्य होत !!!! मंदारला बघून खूप आनंद होत होता. गाणं संपल... सोबतच तिचे पाय थांबले आणि मंडपात टाळयांचा कडकडाट झाला... 

तिने पहिली नजर सासुकडे फिरविली.... त्यांचा चेहरा चांगलाच पिळवटलेला होता. जिकडून तिकडून वाहवाही चे बोल कानी पडत होते. त्यांना सोडुन प्रत्येक जण तिचे कौतुक करीत होत... पण त्यांना मात्र जाम संताप आलेला दिसत होता त्यांच्या चेहऱ्याचे बदललेले हावभाव स्पष्ट व्यक्त होत होते. मंदारचे तर छक्के पंजे त्यांना बघूनच पळाले होते. डोळ्यात पेटलेली आग तिला जाणवत होती. 

        त्यांनी तिरप्या नजरेने मंदारला बाजुला यायचा इशारा केला. मंदार नजरेला नजर चोरण्याचा प्रयत्न करीत होता पण त्यांच्या तिरकस नजरेचा मारा चुकविणे कोणालाही शक्य नव्हत. लोक मंदार आणि पूर्णाचे जवळ येऊन येऊन कौतुक करीत होते पण ते हि त्यांना खपत नव्हतं. नजरेचा खूप लपंडाव खेळून शेवटी त्यांनी मंदारला जवळ जाऊनच गाठलं तिकडे पूर्णाला त्यांना बघून बघून अर्ध व्हायची वेळ आली होती. 

     त्यांनी मंदारचा हात पकडला आणि मंडपाच्या बाहेर घेऊन गेल्या. दोघेही मंडपाच्या अगदी बाहेर जाऊन बोलत होते. पूर्णाच अंग थरथरत होत. त्यांचे हातवारे आणि डोळ्यांचे हावभाव थरकाप सोडणारे होते. तिला ऐकायला तर काही येत नव्हतं पण काय होत असेल ती अंदाज बांधू शकत होती.... 

” अस नाचायला तिला लाज नाही वाटली काय रे आणि तु...? तु ही तिला प्रोत्साहित करीत होता. तिच्या घरी हे सगळ चालत असेल आपल्या घरी अजिबात चालणार नाही. कोणाची सुन नाचली अशी सांग मला..? काय हा वेडेपणा आणि कसला हा उतावळेपणा. मला हे अजिबात आवडलेल नाही.. दोघे ही आताच्या आता चालते व्हा”....

“अग आई... ऐक तरी जरा”...

“आता चर्चा नको... चालते व्हा”, खडसावत त्या म्हणाल्या.

मंदारला आईचे परखड बोल कळले होते. त्यांच्या पुढे कुणाचीच चालत नसे.. 

        मंदार भरल्या डोळयांनी बाहेर आला. पूर्णाला ईशारा केला आणि दोघेही निघाले... पूर्णा वाटेत ढसाढसा रडत होती... तिच्या रडण्यावर काय प्रतिक्रिया देवु त्याला कळे ना..? तो फक्त तिच्या हातात हात घालुन होता... त्याच्यामुळे तिला आज हा दिवस बघायला मिळाला.. याची त्याला खुप खंत होती... घडलेल्या घटनेचा आघात तिच्यात खोलवर झाला होता... ती फक्त अश्रु गाळीत होती... ओठांनी स्वतःला शिवुन टाकले होते.. ती आजवर फक्त मंदारच्या घरच्यांच्या मनात स्वतःच कोरड स्थान बनविण्याचा प्रयत्न करीत होती पण तिच्या वाटेला निराशाच आली.... तिच्या एका वेडेपणाचा परिणाम असा होईल याची तिला कल्पना ही नव्हती....

शिवाय सासुबाई एवढ्या भडकतील... याचा जरा हि अंदाज तिला नव्हता... त्या तिला एकही शब्द बोलल्या नाही... मात्र त्याचा राग तिच्या पर्यंत पोचला होता... त्यांना तिच्या नाचण्याचा राग आला होता की मुळात तिचाच राग त्यांनी या तऱ्हेने काढला तिला कळे ना... कार्यक्रम आटपून सगळी मंडळी घरी पोहोचली. जवळपास मध्यरात्र होती. पूर्णा अजूनही जागीच होती मंदारचा मात्र डोळा लागला होता. तिचं अजूनही वरच्यावर कूस पलटण सुरूच होत. उद्या काय होईल? त्यांच्या किचकट गोष्टी आणि तिरकस नजरेचा सामना करण्याची हिम्मत तिच्यात नव्हती. पण पहाट तर होणारच होती आणि दोघांची नजरानजरही.

क्रमश:

        अजूनही कित्येक मुलींना निव्व्ळ रूढी, परंपरा आणि घराण्याच्या नावाखाली आपल्या हौशी-नवशी, आवड मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवाव्या लागतात. त्यातलीच एक पूर्णा. बघूया पुढे अजून काय काय होतं... 
           पूर्णाच्या चुकीची काय शिक्षा देतील सासूबाई? तिच्या चुकीचा काय परिणाम होईल. बघूया पुढच्या भागात.

©️®️सौ. अश्विनी रोशन दुरगकर. 



   


🎭 Series Post

View all