जगा बिनधास्त

जगा बिनधास्त


‘जगा बिनधास्त’


‘जगा बिनधास्त’
\"महाराष्ट्र टाइम्स\"च्या ऑल विमेन बाईक रॅली..!!!
रविवारी १२ मार्च रोजी सकाळी ७:०० वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S.P.College ) पासून रॅलीला सुरुवात झाली.



विमेन बाईक रॅली नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले, त्यात वाहन परवाना अनिवार्य होता. म्हणजे ज्यांच्याकडे वाहन परवाना आहे त्यांनीच ह्यात सहभाग घेतला होता.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील जोरदार नियोजन मटा आणि S P कॉलेज तर्फे करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन पोशाखात असणारा आन -बाण -शान म्हणजे फेटा..! त्याच देखील नियोजन करण्यात आले.

मी देखील ह्या रॅली चा भाग होते आणि पहिला वहिला अनुभव खूप खास होता माझ्यासाठी..!!  सगळ्यात भारी काय वाटत माहिती आहे... जेव्हा कुणी नेते मंडळी शहरात प्रवेश करतात तेव्हा आम्हा सामान्य नागरिकांना लोक थांबवून ठेवतात आणि त्यांचा ताफा सुसाट जाऊ देतात पण रॅली मधे असताना बाकी मंडळींना थांबवून नॉनस्टॉप रॅली पुढे सरकत गेली. आणि संपूर्ण रस्त्याने पत्रकार , इतर लोक रस्त्याने फोटो - व्हिडिओ काढत होते.

घरात होते चूल आणि मूल
होती हाती पाळण्याची दोरी
अफाट माझी संघर्षगाथा
नाही आता मी पाटी कोरी...

पर्वतापरी उंची माझी
गगनचुंबी उंच भरारी
हर एक क्षेत्र पादाक्रांत मी केले
नाही आता मी अबला नारी...

तंत्रज्ञान माझे सगेसोयरे
तयाशी माझी \"दोस्ती न्यारी\"
नावडती होती माझी मी
झाली आता \"गुडीया प्यारी\"...

नाही आता मी पाटी कोरी
नाही आता मी अबला नारी...


जगा बिनधास्त ...!!!!

ह्या टॅग लाईन मध्ये खूप सार सामावलेल आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्रियांचा समावेश आणि उत्तुंग यश संपादन केले आहे. आज ती कुठेच कमी पडत नाही ह्याची शाश्वती समाजाला द्यायची होती. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून सकाळ मस्त एन्जॉय केली.


अतिशय मोठ्या संख्येने स्रियांची उपस्थिती होती.
बाईक रॅली चा मॅप... म्हणजे कुठून असणार त्याचा रुट दोन दिवस आधीच रजिस्टर केलेल्या नंबर वर पाठवण्यात आला होता. ह्यात भरपूर स्वयंसेवकांचे योगदान मिळाले. पोलिस अधिकारी भल्या सकाळी ह्या कार्यक्रमासाठी तैनात होते त्यांचे ही विशेष आभार ..


रॅली अतिशय रॉयल पद्धतीने काढण्यात आली. सगळ्यात पुढे थार मधे लेडीज बसून कॉलेजच्या आवारातून बाहेर निघाल्या आणि त्यानंतर भगवे झेंडे- मटा चे झेंडे फडकत... शिवरायांचा ... आई जिजाऊच्या घोषणांच्या गर्जात रॅलीची सुरुवात झाली. संपूर्ण रस्त्याने फक्त आणि फक्त जल्लोष होता. पण तो ही अगदी संयम आणि शिस्त पाळून...



काही सैनिकी वेषात तर काही आपल्या गौराई सुद्धा सोबत घेऊन आले होते.



काही आजींचे तर गुढगा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊन ही त्या ह्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.


प्रत्येकाच्या एक एक वेशभूषेच कौतुक वाटतं होत. कारण सकाळी साडेसहा वाजता सगळे मैदानावर रॅली साठी हजर झाले होते.

सगळ्या पुरुषांची बोंब असते की बायकोला रेडी व्हायला वेळ लागतो पण साडेसहा ला सगळे हजर म्हणजे उठले कधी असणार... किती तो उत्साह... परफेक्ट मेक् अप आणि अगदी मनसोक्त आनंद...


नवू वार साडी नेसून अगदी ठेक्यात उभ्या असलेल्या माझ्या सखी ..


सारखे ड्रेस कोड आणि सारखीच स्माईल...


कधी बर उठल्या असतील इतकं सकाळी एवढं सुंदर दिसण्यासाठी ...


मीच आदि श्री गणेश
च मीच शिव.. मीच पार्वती...मीच आदिशक्ती...


ह्या छोट्या पेशवीन बाई पुणेरी पगडी मधे आईसोबत बाईक रॅली मधे होत्या .. मुख्य म्हणजे तिचे बाबा तिच्या सोबत होते. पुरुषांच्या काळजीला आणि त्यांनी केलेल्या मदतीला नक्कीच दाद द्यायला हवी.


दुनियादारी च्या वेशभूषेतून दुनियादारी ची शिकवण...
त्यांच्या सोबत त्यांच्या छोट्या छोट्या परी झेंडे फडकत सोबत बाईक वर... इतकं वेळ हातात घेऊन फिरणे म्हणजे त्यांच्या ताकदीला दाद द्यायलाच हवी.


सुरक्षित अंतर ठेऊन अतिशय शिस्तीत ही रॅली पार पडली.


कॅन्सर वर मात ... पुणे - मुंबई डबेवाले , ट्रॅफिक पोलिस, डॉक्टर , समाजातील प्रत्येक घटकाला मानवंदना देण्यासाठी ह्या वेशभूषा स्रीयानी केल्या होत्या.


हा अनुभव इथे सादर करताना अतिशय आनंद होतो की स्री विशेष कथा ही माझी आवडती श्रेणी आहे आणि मी ह्या अमेझिंग एक्सपरीन्स चा एक भाग होते.


धन्यवाद .