जग बिनधास्त...

सहज सुचलेले...
"हवा असा एक क्षण निवांत
जिथे मिळावा मज एकांत..

मनात नसेल हुरहूर कोणतीही
चिंता नसे उरी अशी कशाची...

सर्वं सोडून जगाचा व्याप तिथेच
फक्त जगावे सुखाने एकटेच...
शोधावे थोडं स्वतःचे अस्तित्व...
तमा नसावी ना बंधनाला महत्त्व

नको कोणी तुझं तु रहा बिनधास्त..
जगावे जीवन सहज सुंदर असे मस्त!!"


🎭 Series Post

View all