जाड्या

जाड व्यक्ती चे विचार
जाड्या

हिंदी पिच्चर मधला एक फेमस डायलॉग आहे त्यामध्ये थोडा बदल करत म्हणेन
"जजसाहेब कोणी आईच्या पोटातून जाड्या होऊन येत नाही ते त्याला बनवतात त्याच्या घरचे "

माझं बऱ्या पैकी असंच झालं . सुरवातीला गोड कमी आणी गुटगुटीत जास्त आणी त्यात ही पहिला वंशाचा दिवा म्हटल्यावर विचारायचं काम नाही. कॅनेडा च्या क्रिकेट टीम ला जसे प्रत्येक जण धोपटून टाकतो तसे माझ्या गालाचे झाले होते . जो तो येतोय आणी गाल गुच्चे घेतोय . माझ्या पप्पानी जर ऐक गाल गुच्चा दोन रुपये ला ठेवला असता तर पाळण्यात असतानाच नरिमन पॉईंट वर माझा ऐक स्वतःचा बंगला असता . अगदी शांत सरळ अशी ख्याती असणारी माझी काकू पण मला पाहिल्या वर तिच्यात कोण हिडिंबा घुसायची कोणास ठाऊक . गाल लाल करून टाकायची राव.

आई काय काका काय काका काकू काय अगदी आमच्या घरी धुण्या भांड्याला येणार्या मावशींनी सुद्धा माझा गाल ओढणायचा येथच्छ आनंद घेतला . बर ठीक आहे घेतला गाल गुच्चा मग थोडं उचलून घ्या म्हटले की लगेंच
"आई फार ओझा आहे , हात भरून येतात "
ही सबब पुढे यायची . यात अपवाद माझी आजी . तसे तर ती पण गाल ओढायची पण सोबतीला ती माझी मस्त मसाज करून अंघोळ पण घालायची . मला काखेत घेऊन फिरायची पण हा सगळा लाड आजोबा नसताना , एकदा ते घरी आले की मग माझ्या कडे बघायची पण नाही . आई पण तशीच , बाबा नसताना माझ्याशी बोलायची खेळायची पण बाबा आले की ती मला झोपाळ्यात कोंबायची . तेव्हाच वाटायचं की माझी पण एक पर्सनल आई किंवा आजी ( बायको माहित नव्हतं तेव्हा) असायला पाहिजे जी फक्त माझी काळजी करेल .

वंशाचा दिव्या ला सगळे भरभरून तेल घालू लागले की दिवा समई झाली . पण काहीही म्हणा माझा रुबाब वेगळा घरात ही आणी शाळेत ही . मुले खेळायला लागले तर मला आवर्जून घेऊन जायचे . कोणी माझ्या जाड होण्या बद्दल बोललं की घरचे लगेंच म्हणायचे खात्या पित्या घरचा मुलगा असाच असतो .

आधी घर मग शाळा , इतकंच काय ते माझं विश्व पण दहावी नंतर कॉलेज ला तालुक्याला जायला लागलो तेव्हा हळूहळू गोष्टी कळू लागल्या . धावायला क्रिकेट खेळायला मला टाळायचे मग लक्षात आलं शाळेत आम्ही कबबड्डी खेळायचो आणी माझं एकच काम होतं विरोधी प्लेर आला की त्याला पाडायचं आणी त्याच्या अंगावर बसायचं . त्या साठी मी त्यांना हवा होतो पण क्रिकेट आणी धावण्यात मी साफ अयशस्वी . कॉलेज मध्ये मुली लांब असायच्या . त्यांना हवा होता फिटनेस वाला त्या समोर आम्ही बॅरेल .

वजन वाढू लागले तसे अनेक प्रॉब्लेम शेवटी मनात ठरवलं , कॉलेजात वजन वाढवायचं असेल तर आता वजन कमी कारावं लागेल बाबा