जादू ची परी.... सासूबाई

love between in in-laws

आजी आणि चिऊ मस्त गोष्ट बघत गप्पा मारत असतात,
अशी खरच येते का ग जादूई परी??----चिऊ 
आजी(हसुन)----अगं ती वेगवेगळ्या रुपात येते पण आपल्यालाच कळत नाही..
म्हणजे ग काय??---चिऊ
अग खूपवेळा आपल्या मनात येते आणि अचानक आपल्याला हवी ती गोष्ट जादू झाल्यासारखी भेटते तेव्हा ते देणारी व्यक्ती म्हणजे परी,जसे तुझ्या आईला तुझ्या मनातले सगळं समजत म्हणजे ती जादूई परीच नाही का???--आजी
तुझी परी कोण???----चिऊ
तूच माझी परी---आजी
धावत जाऊन आईला विचारते आई,तुझी????
रीमा आजीजवळ जाऊन---सून असून पण स्वतःच्या मुलीप्रमाणे घडवलेत,  तुमचा  मुलगा गेला तरी माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीत...खरच सासूरुपाने भेटलेल्या तुम्हीच माझ्या परी आहात आई...

आजी आणि रीमाला एकदम भरून येते.....
चिऊ मात्र बघतच बसते......