जादूची गोष्ट

It Is A Story Of Beautiful Jadu And Her Friend Pari.

भाग पहिला

कोणे एकेकाळी , आटपाट नगरात एक राजकुमार रहात होता... 


थांबा थांबा.... आजपर्यंत अशाच वाचलेल्या जादूच्या गोष्टी असतील नाही! पण ही जादूची गोष्ट अशी नाहीच मुळी!

कारण या गोष्टीत ना राक्षस आहे ना राजकुमार, ना परी आहे ना परी ची जादू!

तरीही यागोष्टीत जादू आहे, परी आहे आणि राक्षस सुद्धा आहे.

       ☺ सॉरी , खूप बोरं करतेय का? चला तर मग , लगेचच सुरू करूया आपली जादूची गोष्ट!!!!

   पवन शिंदे आणि त्याची पत्नी सौ रिया शिंदे, नीलकंठ सोसायटी मधील एक प्रसिध्द हसमुख दाम्पत्य होते. पवन हा एक नावाजलेला वकील होता. तर त्याची पत्नी ही प्रसिध्द गायिका होती. घरात लक्ष्मी पाणी भरत होती. स्वतःचा 4bhk फ्लॅट, गाड्या, नोकरचाकर हेवा वाटावा असे सर्व सुख होत. पण या कुटुंबाच्या सुखाला एकच दुःखाची किनार होती. या सर्व सुखाला कुणीही वारस नव्हता. लग्नाला 8 वर्ष होऊनही रियाला संतती सुख लाभलं नव्हतं...

आणि एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात जादू  आली. छान , गोंडस जादूने त्यांच्या पूर्ण आयुष्याला व्यापून टाकलं. रिया जादूला भरवायची, पवन जादूला फिरवून आणायचा, दोघेही वेळ मिळेल तसा जादुबरोबर खेळायचे...

ओळखलं ना तुम्हींमी कोणत्या जादू बद्दल बोलतेय ते?

अजून नाही ओळखलं? अहो जादू म्हणजे पवन आणि रिया यांची पेट डॉग! अहं! कुत्री नाही म्हणायच!! कारण जादू खूप गोड, गोंडस होती. तिची ब्राउन फार, लांब कान, झुपकेदार शेपुट, निळे डोळे, गुलाबीसर तोंड तिचा रुबाब वाढवायचे.

जादूने पवन आणि रियाच्या आयुष्यातला दुःखाचा भर कमी केला... तिच्या येण्याने ते मॉम डॅड झाले.. ☺

थांबा ... गोष्ट अजून संपली नाही...अजून परी यायची आहे... आणि राक्षसुद्धा.. आणि जादूची गोष्ट तिच्या साहसी करनाम्यानशिवाय पूर्ण कशी होईल?... 


लवकरच भेटू पुढच्या भागात.... 

कंमेंट करून नक्की सांगा हा भाग कसा वाटला....

Thank you.

Yours,

Annie.