जादू की झप्पी-मिठी 

Feelings of wife

प्रस्तावना :

आईवडील लेकराला मायेने मारतात ती,

भावंडे एकमेकांना प्रेमाने मारतात ती,

मित्र मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांना मारतात ती,

प्रेयसी प्रियकराला प्रेमाने मारते ती,

जादू की झप्पी म्हणून जी प्रसिध्द आहे ती.

कवितेचे शीर्षक-मिठी 

बायको नव-याला जेव्हा मिठी मारते तेव्हा तिच्या ज्या भावना असतात त्या शब्दबध्द केल्या आहेत कवितेतून -

तुझ्या मिठीत सामावताना,

आयुष्य जगण्याचे एक आश्वासन असते,

मी मात्र खूप निर्धास्त असते,

तुझ्या शरीराच्या गंधाने,बेधुंद झालेली असते,

तुझ्या स्पर्शाने,अंग नी अंग मोहरून जाते,

तुझ्या विचाराने ,मनातल्या मनात हसते,

डोळ्यांची भाषा,एकमेकांना समजायला लागते,

दिवसभराचा थकवा,क्षणार्धात विसरून जायला लावते,

मन नव्याने,उद्याच्या दिवसासाठी प्रेरणा देते,

दोन मनांचे मनोमीलन ,हेच का असते,

जे आयुष्यभर, साथ देण्याची ग्वाही देत असते.

रुपाली थोरात