Aug 09, 2022
प्रेम

जडणघडण भाग 5

Read Later
जडणघडण भाग 5

जडणघडण:- भाग 5

साधारण अर्ध्या तासात कीर्ती सगळं आवरून सामान गोळा करून बॅगा ओढत खाली आली. तोवर रोहन ने सगळे सर्च करून त्यांचे लेट नाईटचे तिकीट बुक केलं होते... तशीही संध्याकाळ तर होत होतीच आणि इथे कुठे मुक्काम करायचा आणि सकाळी जायचं  यापेक्षा त्याला हाच पर्याय योग्य वाटला....
कीर्ती ला समोरून सामान ओढत आणताना पाहून तो धावला, "अगं हे काय! मला कॉल करायचा ना! सगळं एकटीने ओझं आणलं!"
"अरे तू काय मला कच्ची समजतो की काय? स्पोर्ट्स वाली आहे मी! सामान उचलणं तर हातांचा मळ  आहे माझ्या" कॉलर टाईट करत फुशारक्या मारत ती म्हणाली.

तसे "हो मॅडम, चुकलं माझं. एवढी हिम्मत माझी की तुला काही म्हणेन " तोही तिला चढवत म्हणाला तसं ती खळाळून हसली आणि ते पाहून तो सुखावला....

"बरं ऐक, आता 5 वाजायला आलेत आणि कुठे मुक्काम करावा कळत नव्हते त्यात तू सोबत म्हणून मी आपले आजच्या फ्लाईटचे बुकिंग केलंय. 
रात्री 12.30 ला आपली फ्लाईट आहे आणि घरी पोचायला किमान 3 ते 4 होतील चालेल ना तुला?" रोहन म्हणाला.
"रोहन तू योग्यच विचार करशील मला माहित आहे आणि रात्रीचा प्रवास आहे तर तू सोबत आहेस ना, मग कशाची भीती! चल समान आपण इथे लगेज रूम ला ठेऊ आणि वेळ आहे आपल्याकडे तर जरा मस्त फिरू आणि खाऊन घेऊ वेळेत काहीतरी,मग नंतर प्रॉब्लेम नको." कीर्ती म्हणाली....
"येस! गुड आयडिया!" म्हणत त्याने सामान घेतले तसं तिने विचारलं की "तुझी बॅग कुठेय?"

"कसली बॅग? तुझा कॉल आला तर क्लब ला नुकताच पोचलो होतो. तुझा आवाज ऐकला खूप काळजी वाटली मला राहवलं नाही म्हणून होतो तसाच बॅक पॅक  तिथेच ठेऊन निघालो!"
तिला वाईट पण वाटलं आणि आनंद पण की तिच्यासाठी तो धावतपळत आला "सो स्वीट" त्याचा गाल खेचत ती म्हणाली. 
तोही फक्त हसला.
" तू घरी कळव ना कीर्ती, की तू येत आहेस असे..."
"आता राहूदे...चाललोय ना आपण मग गेल्यावरच सांगेन"

त्यांनी तिथल्या लगेज रूम ला समान ठेवले आणि तिथे जवळपास काय आहे पाहायला याची चौकशी करून फिरायला गेले. 
रेग्युलर गप्पा टप्पा झाल्या ज्या मागील खूप दिवसाच्या पेंडिंग होत्या आणि मग तिथल्याच एका छान ठिकाणी त्यांनी तिची फेवरेट बटर पाव भाजी आणि त्याचे आवडते हक्का नूडल्स खाल्ले त्यावर मस्त आईस्क्रीम खाल्लं जणू पिकनिक लाच आले. 
ती आता नॉर्मल झाली होती
तोवर 10 वाजलेच होते...
त्यांनी तिचे सामान लगेज रूम मधून घेतले आणि ते एअरपोर्ट कडे निघाले. 
तिथे फॉर्मलिटी पूर्ण केल्यावरही बराच वेळ असल्याने ते गप्पा मारत बसले होते...

तिथे दोघांच्याही घरी काहीच कल्पना नव्हती, बाबा बाहेरगावी म्हणून तिने फोन केला नाही तर आई काळजी करेल म्हणून त्याने मी कामानिमित्त बाहेर आहे आणि यायला पहाट होईल इतकेच सांगितले होते.
फ्लाईट वेळेत होती त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही, हसत बोलत प्रवास पार पडला...
तिचे लगेज पीक अप करून त्यांना एअरपोर्ट मधून बाहेर पडायला 3 वाजले. 
त्याने लगेच कॅब बुक केली आणि ते निघाले. 45 मिनिटात ते त्यांच्या घरासमोर आले, तिच्याकडे सामान बरेच असल्याने तो तिच्या सोबत तिच्या घरी आला... 

तिने बेल वाजवली पण लवकर रिप्लाय नाही आला मग पुन्हा दोन चार वेळा वाजवली तेव्हा तिच्या आईने दार उघडले.
दारात कीर्ती आणि रोहन ला बघून तिला नवल वाटलं कारण येण्याबद्दल तिने काहीच कळवले नव्हते....
 सोबत रोहन ला बघून तिचे हावभाव मात्र खूप बदलले ते विचित्र बघणे रोहन ने बरोबर टिपले...
 कीर्ती ला मात्र काहीच कळले नाही.

"हे काय इतक्या रात्री आणि तेही ह्याच्या सोबत तू काय करतेय?" तिच्या आईने वैतागत विचारले.
"आई हा मला घ्यायला आला होता, आम्ही आताच तर येतोय न तुझ्या समोर" असे म्हणत कीर्ती आत शिरली आणि रोहन ने बॅग फक्त घरात ठेऊन लगेच मागे फिरला...काकूंना आणि कीर्ती ला "येतो " म्हणत त्याच्या घराकडे निघाला.

रोहन ने त्याच्या घरची बेल वाजवली तर आई जागीच असल्याने लगेच दार उघडले.
"अरे किती उशीर रोहन? काळजी वाटत होती मला!"
त्याने आत येऊन हात तोंड धुतले अणि आणि "आई कॉफी दे ना" म्हणत धाड तिने सोफ्यावर अंग टाकले...

तो दमलेला दिसत होता त्यामुळे जास्ती न बोलता त्यांनी त्याला लगेच कडक कॉफी दिली आणि त्याच्या समोर बसल्या...
कॉफी चे 2 घोट पिऊन त्याला जर बरं वाटलं आणि मग त्याने सुरवातीपासून सगळं आईला खरं काय ते सांगितले.
त्यांना पण ते ऐकून खूप नवल वाटलं की हा एका फोनवर तिथे गेला सुद्धा आणि तिला घेऊन पण आला...
पण त्याचा चांगुलपणा पाहून कौतुक पण वाटले....
"तर सगळे ठीक आहे रोहन, पण तिच्या घरच्यांना हे नाही आवडले तर...!"
"बघुयात..." असे म्हणून तो झोपायला गेला..

त्याच हे असं जाऊन कीर्ती ला घेऊन येणं,  तिच्या आईला आणि दिव्या ला अजिबात आवडले नाही. 
त्यांची याबाबत खुसफूस सुरू होती आणि कीर्ती मात्र याबद्दल अगदी अनभिज्ञ...

याला दोन दिवस झाले असतील  तर तिची आई रोहन बाहेर जाताना बघून त्याच्याशी बोलायला आली...
ती कीर्तीच्या अनेक कम्प्लेन्ट्स करत होती तर दिव्याचे भरभरून कौतुक चालू होते.... 

रोहन काहीच बोलला नाही पण त्याला मनातून नवल खुप वाटत होतं की एकाच आईच्या दोन्ही  मुली पण असा कसा तो फरक करतात....

पण शेवटी त्याच्या संस्कारांनी त्याला एकच सांगितले की त्यांची 'जडणघडण'च तशी त्याला कोण काय करणार.
त्याला कीर्ती आणि तिच्या बाबांबद्दल खूप आदर होता तर तितकाच संमिश्र भाव तिच्या आईबद्दल वाटत होता....
आपल्या आईने आपल्याला कसे वाढविले... आपल्याला कसे संस्कार लावले आणि आयुष्याची कशी उत्तम जडणघडण केली याबद्दल त्याला आईचे खूप कौतुक वाटले...
त्याला कळून चुकले की एकाच घरात राहून सुद्धा प्रत्येकाचे आयुष्य कसे वेगळे असते...
त्याच दिवशी कीर्तीचे बाबा गावावरून आले आणि त्यांना सगळा किस्सा कळला...
ते लगेच रोहन ला भेटायला गेले...रोहन क्लब ला निघणार होता तेवढ्यात ते तिथे पोचले...
"रोहन, मला कळलं तू काय केलेस ते...!"
त्याने फक्त मान हलवली...
ते त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेऊन त्यावर आपला हात ठेवला आणि म्हणाले,
"खूप सारे थँक्स.."
"अहो काका, थँक्स काय! ती तुमची मुलगी नाही फक्त तर...
"तुझी मैत्रीण पण आहे..." त्यांनी वाक्य पूर्ण केले..
यावर ते दोघेही मोठ्याने हसले..
"काकूंना नाही आवडले पण हे काका..." रोहन हळूच म्हणाला
"तिला काहीच आवडत नाही...तू जास्त विचार करू नकोस.."
"सगळ्यात आश्चर्य म्हणजे किर्तीला तिच्या आईचे हे वागणे लक्षातच येत नाही काका"
"अरे अशीच आहे माझी पोर..खूप गुणांची! कोणातही काही दोष तिला दिसतच नाही..खूप अल्लड आहे ती..म्हणूनच माझा जीव अगदी वरखाली होत असतो तिच्यासाठी.."
त्याने फक्त त्यांच्या खांद्यावर हात ठेवला...

"काय रे दिव्या काही बोलते का तुझ्याशी का नाही?"
"नाही..ती माझ्याशी काहीच बोलत नाही.."
"चालायचंच..."
"काका, काही बोलू का? रागावणार नाही ना?"
"अरे बोल ना..."
"भारी आहे तुमची फॅमिली बर का...! एक एवढे दिलखुलास तुम्ही..दुसरी एवढी अल्लड मुलगी...तिची बहीण एकदमच रिजर्व आणि आई म्हणजे....."
"हां ..बोल बोल..आई म्हणजे..."
"नको नको..राहूदे!
"का रे...का? बोल की.."
"नको काका...एवढे पुष्कळ आहे..." तो हसत म्हणाला आणि त्यावर ते ही त्याला टाळी देऊन हसायला लागले...

क्रमश:-
©®अमित मेढेकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!