जडणघडण भाग 4

Kirti calls Rohan and cried a lot without mentioning anything which put Rohan into tension

जडणघडण:- भाग 4

गाडीतुन उतरताना कीर्ती च्या बाबांनी रोहन ला थँक्स म्हणाले.
"अहो काका मी तुमच्या मुलीला नाही तर माझ्या मैत्रिणीला सोडले, मग थँक्स कशाचं?" मिश्कीलपणे तो म्हणाला.
तेही हसत म्हणाले "  तू ही किर्तीसारखा चतुर आहेस... मी काय शब्दांची जुळवाजुळव नाही करू शकणार.... तू म्हणतो आहेस तर असेल ही तसे...."
रोहन घरात आला तसे "काय रे गेली का कीर्ती नीट? तिला सांगितले का पोचल्यावर फोन करायला?" त्याची आईने विचारले.
"हो ग ! माझी नाही ती अशी काळजी केली कधी ती?"

"अरे कितीही म्हणले तरी तू मुलगा आहेस मुलींची काळजी ही तुला नाही कळणार. आणि तुझी काळजी केली की नाही हे तुझ्या पाठी तुला कसे कळणार?" असे म्हणत त्या कामाला निघून गेल्या.

तोही आवरून त्याच्या क्लब ला निघून गेला. आता त्याचेही काम पण वाढलं होत आणि सोबत तो पण त्याची प्रॅक्टिस करतच होता.
कीर्तीचा पोहचल्याचा शॉर्ट कॉल येऊन गेला त्यावर सुध्दा तो समाधानी होता तिलाही पुढची पायरीची तयारी करायची होती त्यामुळे ती नंतर बोलेन म्हणाली.

संध्याकाळी तिच्याशी बोलायची सवय झाल्याने आज त्याला चुकल्या सारख होत होते, मग त्याने हेड फोन लावला आणि तो चालायला गेला येताना काका भेटले तसं थोडा वेळ त्यांच्याशी बोलणे झाले...

दुसऱ्या दिवशी अचानक त्याच्या आईने कीर्ती च्या घरच्यांना चहा नाश्त्याला बोलावले, रोहन थोडा चकित झाला पण काही बोलला नाही....
 तिचे आई बाबा दोघेही आले पण दिव्या आली नाही ती घरीच होती पण आली नाही. 
रोहन ला तिचे हे वागणे खटकले त्याला लगेच अवखळ कीर्ती आठवली की ती असती तर आधीच येऊन आईशी गप्पा मारत बसली असती पण दिव्या आलीच नव्हती....
 तो काकांशी बोलत होता तर कीर्ती ची आई त्याच्या आईशी.

कीर्ती ची आई बोलत होती पण फक्त दिव्या बद्दल त्यांनी एकदाही कीर्ती चा उल्लेख केला नाही याचे त्याच्या आईला नवल वाटले. 

इकडे रोहन आणि काकांच्याही गप्पा रंगल्या होत्या चांगला दीडतासभर वेळ कसा गेला कळलेच नाही. मग रोहन ची क्लब ची वेळ म्हणून ते आपल्याला मार्गी निघाले...

"रोहन अरे कीर्ती ची आई फक्त दिव्या बद्दल बोलत होती सतत त्यांनी एकदाही कीर्ती चा उल्लेख केला नाही!नवल वाटले मला आणि ती पण बघ, घरी होती तरी का आली नसेल?"

"सोड ग! त्यांचं त्यांना माहीत.... पण मला सुद्धा नाही पटले हे दिव्या चे वागणे बाकी काका मात्र कीर्ती चे खूप लाड करतात. 
चल मी निघतो" म्हणत तो निघाला...

इकडे कीर्ती ला फोन करायला वेळ मिळत नव्हता पण तिचे watts app मेसेज ने अपडेट्स रोहन ला सतत मिळत होते.तोही आपल्या परीने तिला गाईड करत होता आणि हाल हवाल विचारात होता....

बघता बघता तिला जाऊन 7 दिवस झाले होते पण या दिवसात काकांने बोलवूनसुद्धा रोहन त्यांच्या घरी गेला नाही. बाहेर दिसले तर तो बोलत असें पण घरात काही गेला नाही.
कीर्ती नाही हे त्याच्या आईलाही जाणवत होते, तिची बडबड, तिचे येणं जाणं हे त्यांना आठवत होते....
 त्याही तिच्याबद्दल रोहन कडून चौकशी करत होत्याच.
मधल्या दिवसांमध्ये रोहन ला दिव्या 2 वेळा दिसली होती पण त्यांचं बोलणं नव्हतंच..... दिव्या आपली आपल्याच जगात आल्यासारखी वावरत होती.
 तिने फक्त स्माईल दिली रोहन ला तर त्यानेही तेवढेच उत्तरादाखल करत तो मार्गी निघून गेला होता....

पुढे 2 दिवस रोहन च्या मॅचेस होत्या त्यामुळे तो खूप बिझी राहिला आणि त्याचा हवा तसा रिप्लाय काही कीर्ती ला गेला नाही त्यामुळे तिला काय झाले हे कळेना,  पण असेल काही असे म्हणत तिने लक्ष दिलं नाही....

आणि मग मात्र त्यानंतर तिच्या लागोपाठ मॅचेस जिंकण्याचे मेसेज येत असतानाच एके दिवशी रात्री तिचा फोन आला रोहन ला आणि ती डायरेक्ट रडायला लागली....
 तिला बोलताही येत नव्हते आणि  काही सांगताही गेट नव्हते....
कीर्ती चे हे असे रडणे रोहन ला तिच्या वागण्याबद्दल अपेक्षितच नव्हतं....
त्याचाही खूप गोंधळ उडाला आणि तो एकदम काळजीत पडला " "अग, कीर्ती बोल तर काय झालं? अशी रडत राहिलीस काही बोलली नाही तर मला कसे कळेल काय झालं ते? प्लीज शांत हो!"

"रोहन! मी ! मी! मला मला..... "असे करत ती पुन्हा रडायला लागली.
"तू कधी येत आहेस?" तो म्हणाला.
"मी नाही येणार! मला नाही यायचे!" असे म्हणत ती फक्त रडत होती.

रोहन ला आता मात्र खूप काळजी वाटायला लागली! काय झालं हे तिला कळेना!  बरं तिच्या घरी तरी कसं विचारणार? 
तिचे बाबा गेले होते बाहेरगावी 2 दिवस आणि घरात आई आणि दिव्या या दोघीं बरोबर त्याचे खूप बोलणे नसे.

शेवटी तो म्हणाला " ठीक आहे नको येऊस.....  मी नंतर फोन करतो." आणि त्याने फोन ठेवला....

रोहन ला काही सुचत नव्हते..त्याने नेट वर जाऊन तिच्या कॉम्पिटीशन च्या लोकेशन ची पूर्ण माहिती घेतली...आईला सांगितले कर्क काय क्साली आहे ते आणि त्याने सरळ एअरपोर्ट गाठले...
जाणाऱ्या लगेच च्या विमानाने कीर्ती होती त्या ठिकाणी तो पोहचलासुद्धा...
स्पर्धेच्या पत्त्यावर डायरेक्ट गेला तेव्हा सकाळ होत होती...
 तिथे त्याने तिची चौकशी केली आणि तिच्या रूमवर गेला. आणि त्याने दरवाजा नॉक केला....

दार उघडले तर रडून रडून डोळे सुजलेली कीर्ती समोर होती आणि असे रोहन ला अचानक समोर बघून ती त्याच्या गळ्यात पडून पुन्हा रडायला लागली....

कसंबसं तिला थोडं शांत करत रोहन ने खाली हॉटेल ला आणले...
ऑम्लेटस, टोस्ट बटर आणि कॉफी मागवली...

"बोल काय झालंय तुला? तू अशी रडूबाई नाही आहेस!एक स्ट्रॉंग मुलगी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे."

"रोहन मी हरले! फायनल पर्यंत पोचले आणि शेवटची मॅच हरले. मला जिंकायचं होते...आणखी पुढे माझे सिलेक्शन व्हायला हवं होते मला....
 मला पुढे इंटरनॅशनल ला खेळायचं होत! सगळं गेले... मी हरले!" म्हणत ती पुन्हा रडायला लागली...

आता त्याला कळले नक्की काय झालं ते!
आणि हे ऐकल्यावर तो जोरजोराने हसायला लागला...
त्याचे हसणे पाहून ती त्याच्याकडे थक्क होऊन पाहत राहिली..

"तू हसतो आहेस..."
"मग काय करू?"
"मी हरले ना रोहन,...आणि तू हसत आहेस"
" तू पूर्ण प्रयत्न केलास कीर्ती! म्हणून तू फायनल ला पोचली...आणि त्यात काय झालं पुढल्या वर्षी सिलेक्ट होशील आता आणखी जोर लाव आणि प्रॅक्टिस कर....
 हे बघ आयुष्य इथे संपत नाही आणि जग सुद्धा! 
आपण हिम्मत हरण्यापेक्षा जास्ती मेहनत करायची आणि अपयश भरून काढायचं! काका आहेत मी आहे तुझ्या सोबत. आपण नक्की मेहनत करू आणि जिंकून दाखवू."
"पण...."
"पण काय त्यात..! चल खाऊन घे... एवढया लांबून मी आलो आहे मला पण खायला दे आणि तू पण घे..."

त्याच्या बोलण्याने तिला जर बरं वाटलं त्याच्या आग्रहाखातर तिने थोडं खाल्लं आणि कॉफी प्यायली...

आता तिच्या काहीतरी लक्षात आलं आणि ती एकदम "अरे पण तू इथे कसा काय आलास?" तिला खूप आश्चर्य वाटत होतं.
काय सांगावे हे त्याला कळेना शेवटी ...उगाच थाप मारत तो म्हणाला,  " अग माझं काही काम होत त्यामुळे मी काल संध्याकाळीच इथे आलो होतो... म्हणून आज सकाळी भेटायला आलो."

"रोहन खोटं बोलू नकोस! तुला बोलता येत नाही."
त्यावर तो टोस्ट च्या मागे चेहरा लपवून हसायला लागला...

"रोहन, इकडे बघ..खरं सांग मला...!"
"माझी वेडी मैत्रीण कुठे पळून गेली असती तर? मी कुठे शोधले असते? म्हणे मी येणार नाही,  मला यायचं नाही मग काय करणार मी? म्हणून आलो." तो बोलला तसं ती ओशाळली...

"सॉरी! मी पुन्हा नाही असं वागणार! आणि थँक्स तू आलास! खूप सरप्राइस मिळाले पण छान पण वाटत आहे मला."..

"बरं मग मॅडम कधी निघायचं की तू दुसरीकडे जायला काही बुकिंग करून ठेवलं आहेस? नाही तू येणार नाही म्हणालीस मग इथून पुढे काश्मीर ते कन्याकुमारी असा काही प्लॅन बनवला आहे का विचारावे?" तिला चिडवत तो म्हणाला...

तसं ती उठून त्याला मारायला धावली आणि तिला तसं बघून तो ही पळायला लागला...

ती रूमवर आवरायला गेली आणि इकडे हा पुढची फ्लाईट केव्हा आणि त्याच बुकिंग करायला व्यस्त झाला...
तिला आता परत घेऊन जाण्याची एक छोटीशी जवाबदारी त्याच्यावर होती ना...

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all