जडणघडण भाग 2

The story continues with free behavior of Kirti and sensible reactions by Rohan

जडणघडण:- भाग २

नेहमीप्रमाणे कीर्तीसकाळी लवकर उठली,  रोज जॉगिंग ला जायची सवय असल्यामुळे आवरून मस्त तिचा ट्रॅक सूट घालून घराबाहेर निघाली.
 हेड फोन लावून थोडे अंतर पुढे आली...तिनेअजून हवा तसा स्पीड पकडला नव्हता.
 तेवढ्यात
तिला रस्त्याच्या कडेने रोहन वॉक करत असताना दिसला. त्याचे आणि तीचे एकमेकांकडे एकाच वेळी लक्ष गेलं आणि त्यांनी स्माईल देत "good morning" म्हटले.
"तू पण सकाळी उठतोस का?" कीर्ती ने विचारले.
"हो मला आधीपासून सवय आहे, आधी जिथे राहायचो तिथे मित्र होते मग आम्ही ट्रेकिंगला पण जायचो!" उत्साहात रोहन बोलत होता.
"वा! मी रोज जॉगिंग ला जाते, मग प्रॅक्टिस असते माझी टेबल टेनिस ची आणि मग कॉलेज. 
आता तर मला खूप फोकस करावे लागेल मॅचेस आल्यात जवळ" थोडं तंद्रीत ती बोलत होती आणि तो ऐकत होता.
"Wow, तू स्पेसिफिक गेम प्लेअर आहेस तर... ग्रेट!" 
"नुसतीच प्लेअर नाही तर नॅशनल प्लेअर!" ठसक्यात ती म्हणाली आणि स्वतःच हसली.
"तर मी एका नॅशनल प्लेअर सोबत आहे, अमेझिंग! आणि तू एका खेळाडू व्यक्ती सोबत आहेस , गुड ना?" तो म्हणाला तसं तिने टाळी दिली.
" काल काही बिनसले होते का तुझं?"अचानक तो म्हणाला.
"अरे आमची दिव्या म्हणजे पुस्तकी किडा! दरवर्षी पहिला नंबर, शांत, आईच्या मते गुणी मुलगी. मला नाही तिच्यासारखं वागता येत मग मला राग येतो कारण आई सारखी तिच्यासारखी वाग म्हणते." ती बोलली.
थोडं शांत राहून तो म्हणाला " तुझी बहीण का?"
"हो! आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहोत! पण स्वभाव खूप भिन्न आहेत. ती हुशार आणि अभ्यासू तर मला खेळांत आवड!

ती शांत तर मी बडबडी, तीला नोकरी करायची तर मला वेगळं स्वतःच काही. त्यामुळे आईची ती लाडकी आणि मी मुलासारखी वागते म्हणे." गप्पा मारत मारत त्यांचा वॉक सुरू होता.
ती फारशी ओळख नसूनही मोकळं बोलत होती त्यावरून ती खूप साधी आणि ट्रान्स्परेंट आहे हे रोहन ला जाणवत होते, तोही छान ऐकत होता.
"हम्म!पण यात वाईट काहीच नाही ग, उलट आपल्याला आवडते तसे करावे तसेच राहावे. नाही का?
ती हो म्हणाली...
 फ्रेंड्स?" हात पुढे करत तो अचानक म्हणाला.
"येस!" तिनेही दुजोरा दिला.
"चला तर मग भेटू नंतर पण तू काय करतो रे? मी नाही विचारलं ते" तिच्या बोलण्यावर हसत तो म्हणाला. "मी इंजिनिअरिंग केलं आहे  पण मला पण त्यात फारसा इंटरेस्ट नाही त्यामुळे वेगळे काही करावे हे मला पण मनापासून वाटते. सध्या मी एक स्पोर्ट्स क्लब जॉईन केलाय आणि मी एक स्विमर आहे.जास्ती नाही पण फक्त 4 वेळा मी नॅशनल मेडल मिळवलंय. आता त्यातच पुढे काही करता येईल का बघतोय" अगदी साधेपणाने तो म्हणाला.

ती मात्र अवाक होऊन ऐकत होती "ग्रेट यार! Nice meeting with you! म्हणजे मला माझ्या नव्या मित्राचा अभिमान आहे."
मग बाय म्हणत ते आपापल्या मार्गी निघाले. 
कीर्ती तशी बाबाची जास्ती लाडकी होती, घरी आल्याबरोबर तिने सगळं पाढा त्यांना सांगितलं तसे ते पण कौतुकाने "छान" म्हणाले.
तिने आवरले आणि तिच्या प्रॅक्टिस ला गेली पण ती आज रोहन च्या विचारात होती. इतका साधा, दिसायला चांगलाच होता, त्यात स्विमिंग चॅम्पियन मित्र मिळाला. 
तिला वाटले यांच्याकडून नक्कीच चांगले शिकायला मिळेल आणि खात्रीशीर पक्की मैत्री होईल.
दिव्या ला कीर्ती सारख वागता येत नाही याची खंत वाटत होती मनोमन तिचा मित्र परिवार बघून तिला बरेचदा हेवा वाटत असे. दिव्या मनातलं कोणाला सांगत नसे तिचा स्वभाव थोडा गप्प बसून आपले करवून घेणे असा होता त्यामुळे ती खूप सालस आहे असेच आईच मत होतं त्यामुळे आईची ती फार लाडकी.
नाही म्हणायला तिच्या आईची आणि रोहन च्या आईची थोडी तोंडओळख झाली होती.
रोहन वॉक वरून घरी आला तेव्हा त्याची आई वाटच बघत होती.
"अरे रोहन काय हे किती उशीर केलास? नवीन जागा, नवे शहर लोक आणि तू तर मी उठायच्या आत गेलास ते आता उगवतोस?" 
"अग काळजी करु नको मला एक दोस्त मिळाला आहे तो अचानक भेटला सकाळी मग गप्पा पण झाल्या आणि फिरणे पण. 
माझा मित्र माहीत का कोण ते?"
"कोण?" 
कीर्ती!" आणि तो हसायला लागला.
"अरे मित्र काय म्हणतोस मैत्रिण म्हण! आणि तशी चांगली वाटली मला ती. नीट लोक ओळखून मैत्री करणारा तू इतक्या कमी वेळात बरं रे तुला पटलं इतक्या लवकर की मैत्रीण झाली पण तुझी ती!"
"अग खरं सांगू तर, मला पण नवल वाटत आहे पण ती मला निर्मळ वाटते. साधी आहे आणि मुख्य म्हणजे माझ्यासारखी खेळाडू जी नॅशनल ला जातेय पुढल्या महिन्यात." तो म्हणाला.
"बरंय! सारखी आवड म्हणून पटलं " म्हणत त्या किचन मध्ये गेल्या आणि रोहन चा चहा घेऊन आल्या.
"बरं चल मी आवरतो! जरा बाजारात जातो... उद्यापासून जॉईन करायचं आहे मला माझं क्लबला काही सामान हवय ते आणतो तुला काही हवाय का?"
मानेनेच नको म्हणत त्या कामाला लागल्या तर रोहन आवरायला गेला.
"अरे यार कीर्ती चा मोबाईल नंबर घ्यायचा राहिला" म्हणत तो बाहेर पडला तर समोर दत्त म्हणत कीर्ती भेटलीच  तिच्याच घराच्या गेटवर!
"उद्या ज्यांची कीर्ती पूर्ण देशात पसरणार आहे, त्या मॅडम चा मला नंबर मिळू शकेल का मॅडम?" रोहन ने तिला अगदी खोडकर पद्धतीने विचारले...
"एका राष्ट्रीय जलतरणपटू ला माझा नंबर देणे हे माझे अहोभाग्य नव्हे का?" 
तिच्या बोलण्यावर रोहन खदखदून हसला...
दोघे एकमेकांना नंबर देत असताना तिच्या घरातील एका खोलीचा पडदा अलगद बंद होत होता....

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all