जडणघडण अंतिम भाग

The friendship of Rohan and Kirti continued with support of her father and his mother.

जडणघडण :- अंतिम भाग

आता काका आणि रोहन ची पण छान गट्टी जमली होती आणि कीर्ती आणि रोहन च्या आईचं तर आधीपासूनच छान जमत होते.
काही वेगळं खायला केलं तरी लगेच कीर्ती ला निरोप यायचा, शॉपिंग ला जायचं असेल तरी त्या कीर्ती ला घेऊन जात. रोहन आणि कीर्ती तर एक दिवस जात नसे की त्यांच्या संपूर्ण दिवसाचा आढावा शेअर होत नाही असे.
पण या सगळ्याचा अर्थ तिच्या आईने वेगळाच घेतला होता. संशयी नजरेने कायम रोहन कडे बघणे, मुद्दाम कीर्ती आणि तो बोलत असेल तर तिथून जाणे हे नेहमीच झाल होते. 
रोहन च्या हे लक्षात आल्यावर त्याने हे त्याच्या आईला पण सांगितले.
त्या म्हणाल्या "रोहन तुझ्या मनात किर्तीबद्दल असे काही आहे का?"
"काहीही काय आई!मी काय किंवा कीर्ती काय कधीच असा विचार केला नाही. आम्ही खूप छान मित्र आहोत. भविष्य काय ते ना तुला माहीत ना मला! मग त्याच त्यालाच ठरवू देत ना आपण कशाला आतापासूनच अकलेचे तारे तोडायचे?"

"मला हे माहीत होतं!कीर्ती तर खूप अल्लड आहे, जर तुमच्या मनात आले काही नाही तर कशाला त्यांना महत्व द्यायचे? कोणाच्या चुकीच्या विचारांसाठी आपण आपले नाते गमवायचे नसते. मला काहीच हरकत नाही कुठल्याही गोष्टीला! आज मैत्री आहे आणि काळाने पुढे नात झालं तरी मी तुझ्या सोबत आहे."

रोहन आता रिलॅक्स झाला, आई चूक समजत नाही याचं त्याला खूप समाधान वाटत होतं.

एके दिवशी कीर्ती धावतपळत रोहन कडे आली..."रोहन अरे पुढल्या विक मध्ये आमची एक्झाम आहे, मला तर आता टेन्शन आलंय!"
"हे बघ, तू जसा विचार करशील तसे होईल बघ. तू कॉन्फिडेंट राहिलीस तर जे वाचशील ते आठवेल नाही तर सगळं भीतीने विसरशील!"
"काहीही म्हण मित्रा तुझ्यासारखा गाईड नाही बघ. मी लकी आहे खूप की तू माझा मित्र आहेस." म्हणून ती अभ्यास करायला घरी निघून गेली..

ती घरात शिरली तसं तिच्या आईने जोरदार आवाजात तिला विचारले... "हे काय थेर चालली आहेत तुझी? त्या टवाळ मुलासोबत हिंडते काय... त्याच्या घरी जाते काय...सारखे चाललंय काय हे? मला नाही चालणार हे असले उद्योग! मुलगी आहेस जरा नीट वाग! लोक नाव ठेवतील तुला आणि तुझ्यामुळे आम्हाला!"

हे ऐकून मात्र कीर्ती ची सटकली "उद्योग म्हणजे काय म्हणायचं तुला? तुझ्यासारखे सडके विचार तूच कर मला ते जमणार नाही. आमची खूप चांगली मैत्री आहे आणि फालतू उद्योग करायला आम्हाला वेळ नाही.

"दिसतच आहे ते! खेळाच्या नावाखाली आधीच उनाडक्या आता तर काय तो उनाड मुलगा पण भेटला!"

"खबरदार रोहन ला काही बोलशील तर!" कीर्ती ओरडली. 
तसे तिच्या आईने तिला एक लगावली.

त्या आवाजाने तिचे बाबा बाहेर आले, कीर्ती गाल चोळत पण डोळ्यातून आग ओकत बघत होती.
 नेहमी शांत असणारे तिचे बाबा आता मात्र खवळले होते "तोंड सांभाळून बोल कीर्ती बद्दल आणि रोहन बद्दल सुद्दा! तुझ्यापेक्षा जास्तीच संस्कारी आहेत ते!
 तो दिव्या ला भाव देत नाही तुला महत्व देत नाही म्हणून वाट्टेल ते बोलायचं अधिकार कोणी दिला तुला?
मुलींच्या लहानपणापासूनच पाहत आलो आहे मी , स्वतःच्या सख्ख्या मुलींमध्ये भेदभाव करायला कसा जमतो तुला?

आणि एक लक्षात ठेव,  तुझ्यापेक्षा जास्ती मुलं पहिली आहेत मी बाहेर आणि म्हणून सांगतो खूप चांगला मुलगा आहे तो. 
राहीले त्याच्या सोबत असण्याचं तर ते मैत्री चे छान नाते आहे...

 त्यांच्या मनात जे नाही ते तू भरवते आहेस आणि त्या ही पुढे सांगतो की मला तो मुलगा खूप आवडतो आणि मी बघेन माझ्या कीर्तीचे आयुष्य आणि त्याच काय करायचं ते. 
हात लावलास पुन्हा तिला तर मी पण मर्यादा विसरेन! 

कीर्ती चल ग...आणि हो तू जे जस वागते तसंच वाग बघू कोण काय बोलते आणि करते... मी तुझ्या सोबत आहे."

असं बोलून ते किर्ती ला हाताला धरून बाहेर निघून गेले.

 बाबांचे हे असं रुद्र रूप पहिल्यांदाच बघितल्याने तिची आई अवाक झाली आणि मटकन खालीच बसली आणि घाबरून हे बघत असलेली दिव्या गपचूप रूम मध्ये निघून गेली...

किर्तीला घेऊन ते रोहन च्या घराकडे गेले...
तिच्या बाबांनी रोहन ला  कार काढायला लावली "लांब फेरी मारून येऊ चाल आज आणि हो आईला सांग तू जेऊनच घरी येशील."
रोहन ला थोडी कल्पना आली होती कारण बाहेर असणाऱ्या त्याने बऱ्यापैकी ऐकले होते, काहीच न बोलता त्याने जे सांगितले तसे केले आणि ते निघाले...

सगळं शांत शांत होत तेच म्हणाले "रोहन मला तुझ्याशी बोलायचं आहे!"
" काका मी ऐकले आहे सगळे! मला नकोय की माझ्यामुळे तुमच्या घरी भांडण व्हावे, सॉरी काका!"
" अरे तू नाही तर मी सॉरी बोलतो तुला! हे बघ तूला तुझ्या आईने खूप छान घडवले आहे. तुझे संस्कार, बोलणे, कृती सगळे काही वागण्यात कळते. 
अरे घरातले नाही करणार इतक्या काळजीने तू लगेच गेलास... कीर्ती ला परतच आणले...एवढेच नाही तर तिचा कॉन्फिडन्स पण परत मिळवून दिलास. 
असा मित्र मिळणे कठीण असते आणि राहीले तुझ्या काकूचे तर आता तिची हिम्मत होणार नाही काही बोलायची!
 मला उलट वाईट वाटेल जर तू आजचे काही मनावर घेतलेस तर. तुमची मैत्री अशीच अबाधित राहो आणि मी तुमच्या सोबत आहे बघू कोण तुम्हाला नाव ठेवत ते..."

त्यांचा तो अविर्भाव बघून कीर्ती पण हसायला लागली आणि रोहन ला मनापसून आनंद झाला, कारण कीर्ती ला त्याला गमवायचे नव्हते. 
तो म्हणाला "काका आमची मैत्री खरच निर्मळ आहे आज तरी आमच्या मनांत असे काही नाही. 
अजून मला करिअर करायचे आहे कीर्ती ला खूप मोठी खेळाडू व्हायचे आहे त्यामुळे या विचारला आता तरी जागा नाही. भविष्यात काय ते काळाला ठरवू देत पण हो कीर्ती मला खरच खूप महत्त्वाची आहे....
तुम्ही सोबत आहेत यापेक्षा अजून आनंदाचे दुसरं काही नाही...
आणि हो जे तुम्ही म्हणालात तेच आईच मत आहे. 
ती सुद्धा कायम माझ्या आणि कीर्तीच्या मैत्रीला पाठिंबा देणारच आहे, थँक्स काका!"

कीर्ती आनंदुन बाबांच्या गळ्यात पडली आणि लगेच तिने रोहन ला हायफाय दिली. 
एव्हाना ती लोक शहरापासून बरीच लांब आली होती, तिथेच एक छानसं रेस्टॉरंट पाहून त्यांनी रोहन ला गाडी थांबवायला सांगितली...

"चला मुलांनो आज तुमच्या मैत्रीचं सेलिब्रेशन करू यात आणि हो आजपासून दोघे नाही तर मी पण तुमचा मित्र बरं का!" ते म्हणाले.
"येस काका!" रोहन ने असे म्हणून त्यांना हग केले.

कीर्ती आता बरीच नॉर्मल आली होती आणि रोहन तर अतिशय मॅच्युअर्ड होता...
आत जाऊन  त्या दोघांसाठी कॉफी तर त्यांच्या स्वतःसाठी चील्ड कोका कोला मागवला..! 
नंतर मग तिच्या बाबांनी, ग्रीन थाई करी, जासमीन राईस, अवोकडो करी, स्पिनॅच बटर कटलेट्स, कॉटेज चीज पराठा आणि स्माईली फ्राईज मागवल्या...
 सगळ्यांना जेवण एकदम आवडले..  मस्त गप्पा मारत जेवण आटोपले आणि त्यावरून  मघाई मसाला पान वगैरे खाणे सुद्धा झाले जे कीर्ती ला फार आवडत होते.

रोहन मनातल्या मनात विचार करत होता की कसं एकाच घरात चार व्यक्ती पण जडणघडण म्हणाला तर दोन प्रकारची.
एक पार्टी कीर्ती आणि बाबा तर दुसरी दिव्या आणि तिची आई!

 तो आणि त्याची आई हे तर एकच असल्यासारखे एकमेकांचे जग होते!

"दोघेही झाले गेले विसरून जा आणि जसे आहेत तसेच आनंदी छान असा!" तिचे बाबा म्हणाले.

"हो काका,माझ्या मनात काहीच किल्मिश नाहीय ! तुझ्या पण नाही आहे ना?" कीर्ती कडे बघत तो म्हणाला.
"येस बॉस!" ती नेहमीच्या अंदाजात म्हणाली. 

त्यांना नॉर्मल बघून तिच्या बाबांना जर बरं वाटलं, रात्री बरेच उशिरा ते घरी परतले...

दुसऱ्या दिवशी पासून जे जसे होते तसेच सुरू झाले दोघांचा मॉर्निंग वॉक ,तिची प्रॅक्टिस, त्याचा क्लब आणि त संध्याकाळी गप्पा कधी काम असेल तर सोबत जाणे , कीर्तीचा त्याच्या घरातील वावर.
 
सगळे पूर्ववत सुरू होते आणि काळ पुढे जात होता त्यांच्या स्वप्नाच्या पुर्ततेच्या दिशेने आणि त्यांना भक्कम पाठबळ होते ते तिच्या बाबांचे आणि रोहन च्या आईचे सुदधा.

कारण या  दिशेने त्यांची चालू असलेली वाटचाल ही त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी जडणघडण होती जी त्यांच्या भविष्यात सतत डोकावणार होती!

समाप्त!
©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all