Dec 01, 2021
सामाजिक

जबाबदारी आणि कर्तव्य

Read Later
जबाबदारी आणि कर्तव्य

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

हे बघ....... ऐकून घेते म्हणून काहीच बोलायच नाही असं नाही.…...मी पण माणूसच आहे यंत्र नाही....... आज काय तो सोक्षमोक्ष लावतेच खुप झालं आता.........सगळ्यांसाठी मर मर करायचं सगळ्यांच्या आवडी निवडी मानपान सांभाळायचे.माझं कर्तव्य आहे मान्य आहे मला...... आणि मी अजूनतरी माझ्या कर्तव्यात कमी पडली नाही ,पण तरी सुद्धा एवढं घालूनपाडुन बोलतात.....जस काय लग्न करून लेकासाठी जोडीदार नाही तर फुकटात कामवाली बाई आणली आहे. प्राप्ती खूप चिडली होती, आणि परेश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण आज प्राप्ती ऐकायच्या काही मूड मध्येचं नव्हती. तिच्या चिडण्याचं कारणं रास्त होतं, पण तरी परेश तिला अडवत होता,कारण त्याला भरल्या घरात भांडणं नको होती. पण प्राप्ती काही केल्या ऐकेना.

प्राप्ती आणि परेश मेट्रिमोनि साईड वर भेटले. दोघाना एकमेकांचे स्वभाव पटले.आवडी निवडी माहीत झाल्या...... आणि वर्षभर एकमेकांना डेट करून अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. प्राप्ती सुर्वे लग्नानंतर प्राप्ती पवारांची स्नुषा झाली. सासरच्या घरी दीर,सासू सासरे आणि ही दोघे नवरा बायको. नणंद होती पण लग्न झालं होतं तीच. परेश चे वडील म्हणजे तुकाराम पवार एकदम देवमाणूस ज्वेलर शॉप बाहेर वॉचमन ची नोकरी करायचे. तस तर आधी ते एका डायमंड च्या कंपनीत नोकरी करत होते,पण म्हणतात ना इमानदार माणूस आणि त्याची इमानदारी.........त्याला सुखाने जगू देत नाही. काही लोकांचा भ्रष्टाचार त्यांनी मोठ्या साहेबांच्या निदर्शनास आणून दिला त्याचा बदला म्हणून ज्यांनी चूक केली त्यांनी परेश च्या बाबांना चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करायला लावली. सगळे पुरावे त्यांच्या बाजूनी होते, पण त्यांची काहीच चूक नव्हती म्हणून ते शांत होते. काही दिवसातच सगळे पुरावे हे बनावट असल्याचे सिद्ध झाले आणि परेशच्या बाबांची निर्दोष मुक्तता होऊन खऱ्या गुन्हेगारांना बेड्या पडल्या.

प्राप्ती सासऱ्यांची लाडकी होती अगदी मुलगीचं होती ती त्यांची. सख्खी आणि चुलत अस ते काही मानत नसतं, पण प्राप्ती त्यांना त्यांच्या पोटच्या लेकीच्या वरची होती.

सासऱ्यांना डायबिटीस असल्याने प्राप्ती त्यांची सगळी काळजी घ्यायची......त्यांचा डब्बा खाणं पिणं शिवाय घरातल्यांच्या आवडी निवडी सगळं सगळं अगदी मनापासून करायची.

एक दिवस वाण सामान भरून येत असतांना प्राप्तीला शेजारच्या उमा काकू भेटल्या.

काय गं प्राप्ती.......सामान भरायला वाटते आज....??उमा काकू म्हणतात.

अं...... हो काकू........पगार झाला नं परेश चा त्यांनीच दिलेत वाण सामान भरायला......प्राप्ती बोलते.

हो का.......!!!!! छान छान........चांगलं आहे.....अगं बाई......गुलाबजाम.....बासुंदी......... मज्जा आहे बुआ तुझ्या सासूची.....बरंच कायनुबायनू घेतलेलं दिसतंय.......गृहिणीने चार पैसे हातचे राखून ठेवावे........एवढा वर खर्च करू नये........नाही म्हणजे मला वाटलं म्हणून बोलले हां मी.........उमा काकू बोलतात.
 

अहो काकू.....उद्या सुजित भाऊंच्या ऑफिस मध्ये हवे होते म्हणून घेतलं आहे गुलाबजामचं पॅकेट आणि बासुंदी परेश ला फार आवडते........प्राप्ती बोलते.

हो का.........नुसतं परेशनेचं नाही तर सुजित आणि तुझ्या सासू सासऱ्यांनी पण नशीब काढलं हो....... नाय तर आमची सुनबाई......स्वतःच आणि नवऱ्याचं करून बाजूला होते.....काय....... त म्हणे ऑफिसमध्ये खूप तणाव येतो.......जसं काय दुसऱ्या बायका जातच नाही ऑफिसला.......उमा काकू म्हणतात.

अहो काकू खरचं ऑफिस मध्ये असेल हो कामाचा लोड....... कोणी मुद्दाम का अस वागेल.......तुम्ही समजून घ्या थोडसं..... प्राप्ती उमा काकूंना बोलते.

बरं चल माझं पुराण सोड बाकी काय चाललंय........कालचं तुझी सासू बोलत होती आमची प्राप्ती घरात काही करत नाही.......नवरा घरी असला की मात्र सगळी काम करते ती पण अगदी झटपट..........मग बसते गूलुगुलू बोलत.....मी म्हंटल त्यांना असुद्या हो पण सगळं करते ना ते महत्वाचं.........उमा काकू सांगतात.
 

प्राप्ती त्यांच्या या बोलण्याकडे फार लक्ष देत नाही कारण प्राप्तीला तिच्या सासूचा खोटं बोलण्याचा स्वभाव चांगलाच माहीत होता........

प्राप्ती घरी येते बघते तर ती येईपर्यंत किचन ओटा .......चहा आणि बिस्कीटाचे रिकामे पुडे..... त्यातच तो जिकडे तिकडे पसरलेला बिस्कीट आणि चिवड्याचा चुरा.......सगळा ओटा नुसता मुंग्यांनी भरला होता..........प्राप्ती जरा भुवया ताणते आणि हातातल्या पिशव्या खाली ठेऊन आधी ओटा स्वच्छ करून घेते.

सुजित चं ऑफिस जवळ असल्याने संध्याकाळी चहा घ्यायला तो घरीच येत असे. त्याचाच एवढा पसरा झाला होता........

प्राप्ती सगळं सामान भरून स्वयंपाकाला लागते. संध्याकाळी पण जेवण लवकर उरकून प्राप्ती झोपायला जाते........कामाच्या व्यापात सगळं आवरून झोपायला यायला नेहमी उशीर व्हायचा आणि नेमकाच परेश चा त्या दिवशी मूड झालेला असायचा.आज पण तेच झालं.परेश प्राप्ती ची वाट बघत बेड वर आडवा झाला होता.जशी प्राप्ती अली तसं त्याने तिला प्रेमाने जवळ घेऊन तिला फुलवू लागला, पण एरव्ही प्रतिसाद देणारी त्याची जानू आज कुठे तरी हरवली होती. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्न आणि मनाची घालमेल त्याला कळत होती.

राणीसरकारचा आज मूड नाही वाटते जवळ यायचा.परेश बोलतो....

अस नाही रे.......पण........

पण काय........

काही नाही सोड......

नाही सांग......काही तरी झालं असणार.......बोल......काय झालं सांग.....

प्राप्ती सगळं  सविस्तरपणे परेश ला सांगते.....

हे बघ आई जे बोलली त्या साठी मी तुझी माफी मागतो. आणि स्वभावावर काही औषध आहे का सांग.......मला माहित आहे ना माझी राणी कशी आहे..... मग झालं......... आई बाहेर काय सांगते आणि बाहेरची लोक काय बोलतात हे तेवढयापुरतंच ठेवायचं......... आणि आपलं ठरलं आहे ना जास्त विचार करून त्रास नाही करून घ्यायचा मग सोड तो विषय..........सध्या आपण आपल्या या नवीन म्हणजे........आज काही तरी वेगळं हां....... काय.......चालेल ना...... परेशच्या बोलण्याने प्राप्ती शांत होते आणि लाजून च त्याच्या कवेत शिरते........
दोघेही प्रणयसुख घेऊन एकमेकांच्या कुशीतचं विसावतात.

सकाळी नेहमी सारखीच सगळी काम आवरून प्राप्ती तिच्या मैत्रिणीकडे जाणार असते तसं ती सासूबाईंना सांगूनच निघते. प्राप्ती घरातून बाहेर पडते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येत की मैत्रिणीसाठी लाडू बनवलेत तो डब्बा ती किचन मध्येच विसरली म्हणून ती पुन्हा घरात येते.

प्राप्ती घरात येते तेंव्हा सासूबाईंनी लेकीला फोन केलेला असतो.एरव्ही तर ओरडत असतात मला मेलीला कोण लावून देणार फोन.......... मला कुठे येत वैगरे, पण आज त्यांनी स्वतःहून फोन लावला होता. प्राप्ती डब्बा घेऊन निघतच होती की तिच्या कानावर काही शब्द पडले आणि ती जागीच थांबली.सासूबाईंच्या फोन चा आवाज नीट नसल्याने त्यांनी फोन स्पीकर वर टाकला होता.त्यामुळे दोघींचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं....

 

आता काय सांगू तुला.........लेक अगदी बायकोचा बैल झाला आहे........तिच्यासाठी सगळं करतो पण घरात काडीचं म्हणून काही करत नाही...... आई ला काही पैसे द्यावे,किंवा आणखी काय हवं......नको.... बघावं... काही...... नाही आणि ही बया.......... स्वतःपुरत आणि नवऱ्यापुरत बनवून बाजूला होते.कधी माझे कपडे धुतले तर धुतले नाही तर ते तसेच पडून असतात,मग काय धुते मीच.........तिला काही बोललं की तुझ्या बापाला राग येतो ना........काय???? तर म्हणे माझ्या घरची लक्ष्मी आहे ती.......तिला काही नाही बोलायचं......."प्राप्तीची सासू"
 

अगं....... पण तू बोलायचं ना तिला....... काही काम करत नाही तर.......आयत बसून काय फक्त गिळणार का मग महाराणी.........इकडे बघ, मी मर मर करते घरात, पण तुझ्या जावयाला.......जरा..........म्हणून किंमत नाही गं....... माझ्या त्यागाची.......एवढं करून पण मला बोलतात ही लोक........आणि तुझी सून.......मज्जा आहे बुवा तिची........पप्पांना म्हणावं जास्त डोक्यावर बसवू नका नाही तर मिर्या वाटेल एक दिवस डोक्यावर बसून. "मीनाक्षी"(प्राप्तीची नणंद)

जाऊदे गं....... उगाच भांडणाला कार नको म्हणून सहन करते.......आता पण बघ........सगळ्या घराचा पसारा तसाच ठेऊन गेली आहे मैत्रिणीकडे....... काय तर म्हणे तिला लाडू खावेसे वाटताहेत म्हणून.......जशी काय हिच्या माहेरची माणसं किराणा भरतात ना......"प्राप्तीची सासू"
 

परेश च्या कानावर घाल जरा हे सगळं.........बायकोच्या प्रेमातून जरा बाहेर या म्हणावं.....झाली लग्नाला आता पाच वर्षे......."मीनाक्षी"

हम्म.........चल मग ठेवते हो.........करेन मग फोन आता जरा घर आवरून घेते........"प्राप्तीची सासू"

अगं...... राहूदे तू........आराम कर जरा.........ती आली की करेल सगळं........तू कशाला करत बसतेस......"मीनाक्षी"

भरला संसार असा घाण ठेवायला मला नाही बाई आवडत.….......म्हणून करते हो मी.........."चल मग ठेऊ का आता........"प्राप्तीची सासू"
 

हो चल........ काळजी घे.........ठेवते हं फोन........"मीनाक्षी"
 

हो हो.....तू पण काळजी घे........"प्राप्तीची सासू"

माय लेकींच संभाषण ऐकून तर प्राप्ती जवळजवळ संतापलीच........

सासुबाई फोन वर बोलून झाल्यावर मागे फिरून बघतात तर काय??????? प्राप्ती त्यांच्या मागेच उभी होती......

प्राप्ती रागातच विचारते.......

काय हो आई........कुठे तुम्हाला पसारा आवरायला ठेवलाय मी.......हां........ कशासाठी एवढं खोटं बोललात.........काय एवढी काम असतात तुम्हाला.......सकाळचा चहा ते रात्री जेवणाचं ताट सगळं आयत हातात मिळत तुमच्या आणि काय तर म्हणे मी नुसती बसून असते.........आणि हो माझ्या मैत्रिणीसाठी लाडू बनवून नेत होती ते माझ्या पैशातुन....... घरात नुसती बसून नसते मी...… लॅपटॉप वर ऑनलाइन पेंटिंग आणि स्मोकिंग चे क्लासेस घेते ना त्याच्यातून......माझ्या..... स्वकमाईतून घेते....... आणि जरी परेशच्या पैशातून केलं काही..... तर काय बिघडलं हो.........नवरा आहे तो माझा......."प्राप्ती"
 

हे बघ.......तोंडाला आवर घाल जरा........ सासू आहे मी तुझी लक्षात असुदे.........आई बापानी हेच शिकवलं का तुला........."प्राप्तीची सासू"

आई बापावर जाऊ नका माझ्या........ आणि खूप काही शिकवलं नसलं ना तरी उगाच खोटं बोलू नये एवढं नक्कीच शिकवल आहे. जाऊदे जाऊदे करत होती........ पण तुम्ही तर अतिच करायला लागलात........ जे काही आहे ते स्पष्ट बोला ना.....काय ते एकदाच क्लियर होईल......."प्राप्ती"

तू कोण सगळं क्लियर करणारी.......हे घर माझं आहे तुम्ही माझ्या घरात राहता समजलं ना........माझ्या घरात झुकूनच रहायचं....बाहेरून आलेली तू मला अक्कल शिकवतेस काय गं........"प्राप्ती ची सासू"
 

अहो आई......सासू झालात म्हणून तुम्ही पण दुसऱ्याच घरातून आलात आणि मग या घरच्या झालात हे विसरू नका......."प्राप्ती"

प्राप्तीचे शब्द तिच्या सासूबाईंना जास्तच टोचले तश्या त्या तिच्या अंगावर धावून गेल्या........प्राप्तीने त्याचा हात पकडून झटकून दिला...

माझ्यावर नाही हां हात उचलायचा........शांत आहे तोपर्यंत ठीक आहे......"प्राप्ती"(एवढं बोलून तिच्या खोलीत निघून जाते.)

संध्याकाळी सुजित,परेश आणि प्राप्तीचे सासरे आळीपाळीने घरी येतात.... घरात एकदम भयाण शांतता असते. प्राप्ती किचन मध्ये स्वयंपाक बनवत असते.

सगळे फ्रेश होऊन चहा घेतात आणि न राहवून शेवटी प्राप्तीचे सासरे त्यांच्या अर्धांगिनी ला काय झालंय ते विचारतात.

परेश आणि सुजित पण तिथेच असतात.घडला प्रकार प्राप्तीची सासू अगदी मीठ मसाला लावून सांगते......तीच म्हणणं ऐकून झाल्यावर परेश प्राप्तीला आवाज देतो.....तशी प्राप्ती बाहेर येते.

काय झालं प्राप्ती.......आई काय म्हणते......."परेश"

त्यांनी जे सांगितलं ते सगळं मी ऐकलं आहे पण आईच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा.एवढं बोलून प्राप्ती पुन्हा किचन मध्ये जाते......

बघितलं कशी उर्मठ पणे उत्तर देते........."प्राप्तीची सासू"

प्राप्तीचे सासरे त्यांच्या बायकोची समजूत घालून....... प्राप्ती लहान आहे......तू तिला समजून घे......... आणि लहानांचं काय मनावर घ्यायचं.  अस बोलून ते तिला शांत करतात.

सगळे जेवून झाल्यावर प्राप्ती सगळं आवरून रूम मध्ये येते,तर परेश गॅलरीत उभा असतो. प्राप्ती त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते.

काय कमी करते रे मी घरात.......सगळ्या गोष्टी तुमच्या आवडी निवडी बघून करते,तरी पण हे अस खोटं ऐकावं लागत.......तुला काय वाटत.....… आत्ता आईंनी जे सांगितलं ते सगळं खरं होतं....."प्राप्ती"

परेश तिच्या दोन्ही खांद्याना पकडून तिला स्वतःकडे वळवतो...... हे बघ राणी मी तुला मागे पण सांगितलं होतं इग्नोर कर तू......ठरलंय ना आपलं तसं....... सुजित काय करतो घरासाठी...... काहीच नाही नुसतं आपलं शॉपिंग बस्स.......पण तरी आई बाहेर सांगते घरात सगळं सुजित बघतो........ठीक आहे ना......कोण काय करत आणि काय बघत हे कधी ना कधी सगळ्यांना कळणारच आहे मग कशाला द्यायचं आपण लक्ष......."परेश"

हो रे.....पण एवढं करून सुद्धा कोणी अस बोललं तर राग येणारच ना......मागे पण काय बोलल्या ऐकलं होतं ना तू........काय तर म्हणे तू त्याची हक्काची बायको आहेस मग तू करणारच ना मी कशाला उठू त्याला डब्बा द्यायला.........मग हीच गोष्ट गेल्या पाच वर्षात सुजित भाऊंना डब्बा देत होती तेंव्हा नाही आठवली का.....तुला बनवून द्यायचा विषय काढला तेंव्हा बरी आठवली....बर ते पण जाऊदे............. आताच दोन महिन्यांपूर्वी आई बाबा आणि सुजित गावाला गेले होते ना महिनाभर तेंव्हा सुजित भाऊंना पंधरा दिवस आधी मुंबईत पाठवलं ना........ मग तेंव्हा पण नाही आठवलं का त्याची हक्काची बायको याला का जेवण देईल वैगरे…....."प्राप्ती"

अगं सोड ना त्या गोष्टी.......तुला जे रागवायच आहे ना माझ्यावर रागाव ......मला माहित आहे दिवसभर घरातली काम करणं काही खाऊ नाही..... आम्हाला निदान संडे ला सुट्टी तरी असते पण तुम्हा बायकांना त्या दिवशी डबल काम असतं.…......तुझी चिडचिड कळते मला पण तरी...... ऐक माझं नको वाद घालू तिच्याशी........मी आहे ना तुझ्यासोबत.........."परेश"

हम्म.........पण तरी अरे......"प्राप्ती"

शु.........….आता पण बिण काही नाही समजलं.........आता फक्त मिठी आणि ती पण घट्ट वाली मला जशी आवडते अगदी तशी......"परेश"

प्राप्ती पण त्याच्या कमरेभोवती दोन्ही हाताचा विळखा घालते आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत होते.....

दुसऱ्या दिवशी प्राप्तीची सासू सकाळी देवळात जाते आणि तिच्या सासऱ्यांना सुट्टी असते....... प्राप्ती त्यांचा नाश्ता गोळ्या सगळं देऊन परेशची ऑफिस ची तयारी करत असते. सगळं झाल्यावर परेश नाश्त्यासाठी बसतो तर तेवढ्यात त्याचे बाबा येतात.....

प्राप्ती.......बेटा मला पण चहा देतेस का????"प्राप्तीचे सासरे"

अहो.......देते का काय विचारता बाबा????.......बसा तुम्ही.......आणते मी......"प्राप्ती"

प्राप्ती चहा सोबत खारी बिस्कीट सुद्दा आणते आणि सोबतच स्वतःसाठी पण एक कप चहा घेते....

तिघेही एकत्र चहा घेत असतात.

परेश......तुझ्या घराचं काम कुठपर्यंत आलंय.....!!!!जर झालंच असेल तर तुम्ही आताच तिकडे शिफ्ट व्हावं अस मला वाटतंय........"प्राप्तीचे सासरे"

अहो पण त्याची आत्ताच गरज नाही आहे....…"परेश"

आताच गरज आहे........ याआधी पण मंदा नी खूप काही चुकीच्या गोष्टी प्राप्तीबद्दल सांगितल्या आहेत आणि विनाकारण तिला कोण काही बोललेलं मला चालणार नाही...... मंदाचा स्वभाव कसा आहे ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही.तिच्या स्वभावाला काळ हे एकच औषध आहे........ म्हणून सांगतोय ऐका माझं........."प्राप्तीचे सासरे"
 

बरं..... ठीक आहे....... तसं तर सगळं काम झालंच आहे पण मी बोलून घेतो आजच......चला येऊ मी........बाय......."परेश"
 

संध्याकाळी परेश येतो आणि जेवण झाल्यावर घराचं काम पूर्ण झालं असल्याचं सांगतो आणि बिल्डरने राहायला आलात तरी चालेल अस म्हंटल आहे.......हे बाबांना सांगतो......

बाबा पण दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्राप्तीला नवीन घराच्या खरेदीसाठी मदत करतात. इकडे सासूबाईंना बाहेरून भनक लागते........पण नवराचं त्यांना मदत करतोय म्हंटल्यावर त्या गप्पचं राहणं पसंद करतात....

नवीन घराची पूजा आणि गृहप्रवेश आई बाबांच्या हातून करवून घेऊ अस प्राप्ती सांगते.....ठरल्या प्रमाणे सगळं होऊन दोघे राजाराणी नवीन घरी त्यांचा संसार नव्याने फुलवतात.......
 

आठ दिवसांनी सुजित काव्या(गर्लफ्रेंड)सोबत लग्न करून डायरेक्ट घरी येतो......त्याला असं अचानक लग्न करून आलेलं बघून सगळेच अचाट पडतात. काव्या.......सुजित पासून गरोदर होती. तिला तिसरा महिना लागला होता. हे तिच्या घरी कळताच त्यांनी तिला घराबाहेर काढले.एक रात्र काव्या मैत्रिणीकडे होती, आणि दुसऱ्याच दिवशी सेटिंग करून कोर्ट मॅरेज केलं होतं दोघांनी.

आता लेकाने दिवे लावलेचं आहेत म्हंटल्यावर कोण काय बोलणार.........पदरी पडलं नी पवित्र झालं अशी गत होती.

काव्या जरा चलाखचं होती.तिला सासुसासरे सोबत नकोच होते. आठ दिवसही झाले नव्हते की हिचे नखरे सुरू झाले होते.....नेहमी आईच्या मागे पुढे करणारा सुजित आता बायकोच्या पाठी वेडा झाला होता......काव्या दिसायला देखणी होती.जणू काही देवाने खूप...... वेळ घेऊन तिला खास वेगळं अस बनवलयं....... निळे पाणीदार डोळे,भरगच्च पापण्या,काळ्या भोर भुवया,कमरे एवढे केस ते पण एकदम मऊ आणि सरळ,कमनीय असा बांधा,सरळ नाक,उंच बोटं त्यात तीची इंचभर वाढलेली नख.........एवढी सुंदर बायको असताना कोणाचं लक्ष दुसरीकडे जाईल. भावाने लग्न केलं म्हणून बहीण पण भावजय ला भेटायला आली. गरोदर आहे म्हणून  आंबटगोड असे काही पदार्थ घेऊन आली. पण बहिणीकडे सुजितच लक्षच नव्हतं....... त्याच लक्ष आपलं बायकोला काय हवं नको त्याकडेच फक्त........तरी मीनाक्षी बोललीच आईला.....

हिच्या पेक्षा प्राप्ती लाखो करोडो पटीने उत्तम आहे........ही तर खोलीतून बाहेर निघायचं नावचं घेत नाही...........मी आली की प्राप्ती नुसती माझ्या मागे पुढे असते सारखं आपलं ताई हे देऊ का??? ते करू का???????नवरा तरी नाही करत बसत निदान आणि हा तर, नुसता आपला बायकोच्या पाठी गोल गोल फिरतोय भवऱ्यासारखा.........जशी काय जगात याचीच बायको तेवढी अप्सरा आहे........हम्म...मीनाक्षी नाक मुरडतचं बोलते...
 

बाबा मायलेकीचं बोलणं ऐकून हसत असतात. त्यांना हसताना बघून दोघी पण रागातच त्यांच्याकडे बघतात.

अगं...... अशी काय रागात बघतेस.......माझ्या लक्ष्मी ला घरातून बाहेर निघायला भाग पडलं तुमच्यामुळे...... हां....... आता....... बाहेर पडायला मीच सांगितलं होतं.........पण त्याला जबाबदार कोण???? तुम्ही........!! आणि जिला करून सवरून बोलत होतात आता ती चांगली वाटतेय होय तुम्हाला............वाह रे वाह......."प्राप्तीचे सासरे"

दोघी पण खाली मान घालून गप्प होत्या.......

संध्याकाळीचं मीनाक्षी तिच्या मुलांना घेऊन प्राप्ती कडे गेली.पाठोपाठ सासुबाई पण गेल्या आणि नुसत्या गेल्याच नाही तर स्वतःची बॅग भरून निघून गेल्या........
 

प्राप्ती.......बाई.......मला माफ कर.......मी खरचं चुकले.......सगळं करून देखील मी तुला नेहमी वाईटच बोलत होते.......माझं चुकलं पोरी......
मला सासुपणा मिरवायचा होता.......मी कशी कर्ती आणि तू कशी नाकर्ती हेच दाखवायचं होतं ,पण मी कधी काही केलंच नाही आणि वर तू केलेल्या गोष्टींच श्रेय पण तुझ्या मागे......स्वतःलाच घेत होते,पण आता...... मी सगळं करून पण सुजित ला माझी किंमत नाही. एवढं करून पन त्याची बायको जे सांगेल ती पूर्व दिशा समजणार सुजित समोर आला तेंव्हा मला माझी चूक समजली........मला माफ कर........."प्राप्तीची सासू"(प्राप्ती पुढे हात जोडून विनवणी करत होती.)

अहो आई.......माफी मागून मला लाजवू नका......खर तर मला पण माफ करा......मागच्या वेळी खूप उलट सुलट बोलले तुम्हाला........"प्राप्ती"

दोघी पण एकमेकींना भेटून राग आणि गैरसमज दूर करून घेतात.......

चलो अंत भला तो सब भला.........परेश बोलतो आणि सगळे हसू लागतात........सासू,सून आणि नणंद तिघी मिळून स्वयंपाक करतात........आणि तिघी मिळूनच सगळं आवरतात........

मध्यरात्री कधी तरी परेश च्या बाबांना जाग येते तर प्राप्ती हॉल मध्ये सोफ्याला डोकं टेकवून सिलिंक कडे बघत विचार करत असते.

कसला विचार करतेस बेटा........ तुझ्या सासूचा ना........नको एवढा विचार करू.......ती बदलणं निव्वळ अशक्य आहे, पण तरी हे जे चाललयं ना.....ते जेवढे दिवस चालतंय चालू द्यायचं.........फक्त यावेळी खम्बीर हो....…उलट बोल असं नाही म्हणत मी, पण कधी तरी आपल्या चांगल्या साठी आपल्या मनासाठी आरे ला कारे करायला शिक....... तिला जपण्याच्या नादात स्वतःच अस्तित्व हरवू नको ती कधीच नाही सुधारणार पण तू स्वतःमध्ये बदल कर........जबाबदारी आणि कर्तव्यासोबत स्वतःच्या आवडी निवडी पण जपत जा बेटा......"प्राप्तीचे सासरे"
 

खरं सांगू का बाबा........तुम्ही माझे सासरे नाही...... खरचं बाबा आहात........"प्राप्ती"

परेश चे बाबा हसून तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि प्राप्ती ला झोपायला सांगून त्यांच्या खोलीत निघून जातात.... 

समाप्त.......

(वरील कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. प्राप्तीच्या सासऱ्यांसारखे सासरे सगळ्याच मुलींना मिळावे म्हणजे कुठल्याच बापाला लेकीच्या भविष्याची चिंता नाही वाटणार......तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा.कथा शेअर करतांना लेखिकेच्या नावासहित करावी.)
धन्यवाद????????????............. 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading