जबाबदारी

Thought

जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही... तो परिस्थिती वर अवलंबून असतो... खरचं परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते ... कोण कसे चांगले कोण कसे वाईट....ह्या जगात सगळे चांगले असतात हो ...वाईट कोणीच नसते ... फक्त परिस्थीती त्यांना तसे वागायला भाग पाडते.... खरच जीवन असेच असते का ???? काही लोक कितीही वाईट परिस्थतीत आपला स्वाभिमान सोडत नाही तर काही लोक छोट्या संकटाना भिऊन लाचार होता ....कारण त्याच्यावर परिस्थीतीच अशी आलेली असते की त्यांना जगता ही येत नाही आणि मरता येत नाही... असो... फक्त आलेल्या संकटाशी सामना करण्याची सगळ्याची तयारी असावी.... एकतर काय होईल हरेल किंवा जिकेल.... बघू आपले आयुष्य आपली काय परिक्षा काय घेते ते??? आयुष्यात कधी खचून जाऊ नका जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात निराशेचे प्रसंग येतील तेव्हा अश्या लोकांना बघा की त्याच्यावरील परिस्थिती ते कश्या प्रकारे मात करतात ...... देव होण्यासाठी दगडाला पण टाक्याचे घाव सहन करावेच लागतात....