जब वी मेट

चांद आहे भरेगा फूल दिलं थांब लेंगे हुसन की बात चाली तो सब तेरा नाम लेंगे...

अभिने फोन ठेवला आणि भूतकाळातील आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून तरंगू लागल्या. किती छान दिवस होतेना ते, जेव्हा ती मला भेटली, आज किती दिवसांनी परत तिच्याशी बोलून खूपच छान वाटलं. तिच्या आवाजातला गोडवा अजूनही तसाच आहे. असं वाटतं की अजून कालचीच गोष्ट आहे, की ती मला भेटली. पण आज तब्बल १४ वर्ष झालीत आम्हाला भेटून. अभि स्वतः च्याच विचारत गुंतलेला होतं, त्याच्या चेहेऱ्यावर एक आगळं वेगळं गोड हसू येत होतं. तिच्या विचारांनी त्याला अजूनच छान वाटत होतं. त्याला त्यांची पहिली भेट आठवली. ज्यावेळी त्याने तिला पहिल्यांदा बघितले.

त्याने लगेच तिला कॉल केला, आणि रिंग जायच्या आत कट केला. त्याच्या सोबत त्याचा मित्र होता. तो हे सगळं बघत होता, त्याला ही नवल वाटत होतं की असं अचानक काय झालं आणि कोणाचा फोन होता ज्यानंतर अभिच्या चेहेऱ्यावरचे रंग एकदम खुलुंगेले. तो अभिची गंमत बघत होता. शेवटी नं राहून त्यांनी अभिला विचारलें, क्या बॉस किसका कॉल था जीसने तुम्हारा चेहेरा एकदम खीला दिया, क्या बात है?

मित्राच्या ह्या बोलण्याने अभि एकदम भानावर आला, आणि खळखळून हसला. काही नाही रे माझ्या मैत्रिणीचा फोन होता आज ३ वर्षांनंतर आम्ही बोललो, सो काही गोष्टी आठवल्या एकदम.

Ohhooo कोण कुठे भेटली काही तरी तर सांग ...अभिचा मित्र त्याला विचारत होतं. अभिला पण तिच्याबद्दल बोलायचं होतं मन मोकळे पणाने तिच्या आठवणीत रांगायच होतं.

अभि सांगू लागला, तू तो मूव्ही बघितला जब वी मेट? त्यात करीना आणि शाहीद कसे भेटत अगदी तसेच भेटलो आम्ही. अगदी फिल्मी भेट झाली आमची. ट्रेन मध्ये. .. खरतर त्या मूव्ही च्या आधीच आम्ही भेटलो, तो movie आमच्यावरच आहे अस वाटत मला. असो, तर सांगायचं असा की, आम्ही ट्रेन मध्ये भेटलो, मी एकटा आणि ती तिच्या फॅमिल सोबत होती.

तो प्रवास कायमचा लक्षात राहील आमच्या असा झाला. ट्रेन नी बरेचदा प्रवास केला पण असा प्रवास कधीच झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही.

सुरुवातीला मी तिला बघितलं नाही, म्हणजे जसे इतर लोक चढतात तसा असेल कोणी असं वाटलं, 3rd AC चा coach होता आमचा.

ती tarin मध्ये चढली तेव्हा तिची बॅग push करायला मी हेल्प केली, पण तिला बघितला नव्हतं. ट्रेन स्टेशन हून निघाली सगळे आप आपल्या जागी सेटल झाले . मी विंडो सीट वर होतो ती माझ्या समोरच्या विंडो सीट वर येऊन बसली शेजारी तिची बहिण होती. त्यांचं बोलणं चालू होतं, तेव्हा मी सहज तिच्याकडे बघितलं, आणि बघतच राहिलो. अगदी साधी पण सुंदर की तिच्यावरून नजर हलत नव्हती,.

आमचा प्रवास लांबचा होता त्यामुळे पुढील २२ तासात तिच्याशी आणि घरच्यांशी ओळख झाली.

संधी साधून तिला माझा ईमेल आयडी दिला. ती ईमेल करेल की नाही ह्या विचारात पुढचे पंधरा दिवस गेले, आणि तिचा ईमेल आला, त्यानंतर आम्ही फोन वर बोलू लागलो.

Ohhooo म्हणजे love at first sight, अभिचा मित्र म्हणाला.

तसं समज हवे तर, तसच काहीस वाटत होतं आम्हाला.

पुढे काय झाले? मित्राने विचारले.

त्यानंतर महिना भारतच आम्ही भेटलो, तेव्हाच तिने काही गोष्टी सांगितल्या. तिने सांगितलं की आपल्याला मैत्री पेक्षा जास्त काहीतरी वाटतं एकमेकांबद्दल, पण तुला माहित आहे की आपण पुढे जाण्यात काही अर्थ नाही, आपलं लग्न होऊ शकत नाही. त्यामुळे पण आपल्या नात्याला मैत्रीचं नाव देऊ.

ती नेहमी म्हणायची, की आपल्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावी की जिच्या नुसत्या नावाने, आठवणीने, आपण आपली सगळी दुखः विसरून जाऊ, आपल्या चेहेऱ्यावर नकळत छानशी smile यावी, मग ती व्यक्ती आपल्या जवळ असो वा नसो. तुझ्यात मला ती व्यक्ती दिसते, त्यामुळे पण मित्रच चांगले आहोत. कमीतकमी भविष्यात आपण कधी समोर आलो तर मोकळे पणानी एकमेकांची विचारपूस तरी करू.

मला पण तीचं बोलणें पटले. नंतर आम्ही दोघे ३-४ वेळाच भेटलो. पण आम्ही फोन वर मात्र खूप बोलायचो, सगळ्या गोष्टी शेअर करायचो.

पण खरं सांगू फक्त मैत्री पलीकडे काहीतरी होतं आमच्यात जे आम्ही कधीच सांगितलं नाही जो पर्यंत तिचं लग्न ठरलं नाही.

काही वर्षांनी तिचं लग्नं ठरलं. त्यावेळी मात्र मी माझ्या आणि तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली, ते ही मनात कोणती खंत नको म्हणून.

आज पण आम्ही चांगले मित्र आहोत, त्यावेळी आम्ही आमच्यावर बंधनं घातली नसती तर कदाचित आम्ही सोबत असतो, किंवा नसतो ते मला माहित नाही, पण एक सांगतो, ती जे म्हणते की एक तरी व्यक्ती असावी की जिच्या नुसत्या नावाने, आठवणीने, आपण आपली सगळी दुखः विसरून जाऊ, आपल्या चेहेऱ्यावर नकळत छानशी smile यावी, मग ती व्यक्ती आपल्या जवळ असो वा नसो. अशी ती आहे माझ्यासाठी आणि कदाचित मी तिच्यासाठी.

बाकी मला कोणत्याच गोष्टीची खंत नाही.

मी तिला एक गाणं नेहमी म्हणायचो

चांद आहे भरेगा

फूल दिलं थांब लेंगे

हुसन की बात चाली तो

सब तेरा नाम लेंगे...

ह्यावर ती खूप हसायची.

अभि तिच्याबद्दल इतक सांगितलस तिच नाव नाही सांगितलस पण. अभिचा मित्र म्हणाला.

त्यावर अभि हसून म्हणाला, ते गुपित आहे... फक्त इतकच सांगतो, मैत्रीची मिसाल आहे ती, भर उन्हात गारवा देणारी सावली आहे ती, छान आठवणींचा वर्षाव आहे ती.

असं म्हणत अभिने फोनवर एक मेसेज टाईप करून सेंड केला.

चांद आहे भरेगा

फूल दिलं थांब लेंगे

हुसन की बात चाली तो

सब तेरा नाम लेंगे...

तिला तो मेसेज मिळाला आणि ती खळखळून हसली.

समाप्त....