जाऊबाई पसंत आहे

Jaubai Pasant
हेमा आपल्या सासरी खूप छान नांदत तर होतीच पण तिच्या गुणांनी ती सगळ्यांचे मन जिंकत होती,....

सासर मोठे तलेवार तर नव्हते पण मोठे शेतकरी कुटुंब होते

त्यांचे घर म्हणजे सगळ्या पंचक्रोशीत नावाजलेले होते
मोठा थाट पण तो थाट होता तो त्यांच्या एकत्र मन मिळवू कुटुंबा मुळे.


त्यांच्या  कुटुंबात एकी  होती, माया, आदर  सन्मान , बांधिलकी, मूळ चार जावा त्या चार जावांचे
एकमेकींशीवाय पान हालत नसत, त्या चार जावांचे ,3 तिने मुले ,आणि घरात 2 मुली ,आजे आजे सासू, सासरे ,काम करणारे गडी, एक आत्या, असे एकूण 22 जणांचे कुटुंब आनंदात नांदत होते.

काही वर्षांनी सगळ्यांना सुना आल्या आणि मग हळूहळू सगळे मन नसून ही वेगळे झाले, तर सण समारंभात परत एकत्र येत....

मोठ्या जावेची सून हेमा ,खूप लाघवी ,गुणांची ,मोठे घर ,त्यात खूप सारी आपली माणसे असावी ,दिर,नणंद, जावा, सासू सासरे ,आणि नाव लौकिक असावे असे सासर तिला मिळावे अशी तिची इच्छा तर नव्हती पण मिळाले आणि त्यात ती रमत गेली.........गोडी लागली ह्या परिवाराची..... म्हणजे जी नवीन सून येईल तिला गोडी लागावी ह्या सासरची हीच ह्या घरची रीत आहे......


जी जितकी जास्त ह्या घरात रमते त्याला ती तितक्या लवकर आपलेसे करते.... सुरवातीला त्रास होतो पण ती सून सून नाही तर लाडकी भाभी होऊन जाते..... मग दिराकडून चेष्टा, मस्करी, गम्मत जम्मत ,रुसवे फुगवे हे होत जाते..... तशीच हेमा ही रमली होती.....इतकी की माहेरी जाण्याची तयारी करताना अश्रू येत....सासर सोडतांना पाऊल जड होत......

हेमाला आता सगळे म्हणू लागेल होते,,,, हेमा बघ बाई आता घरच्या रीती प्रमाणे तुलाच तुझ्या छोट्या दिरासाठी बायको आणायची आहे.....तुझ्या पसंतीची .....एकदम तुझ्यासारखी..... तुझ्या पाऊलावर पाऊल टाकणारी....
बघ तुला सगळ्या जबाबदाऱ्या निभावता येतात ,आणि तू पास ही होतेस ....बघू तू इथे पास होतेस का ते.....


हेमा आपली जसे हे ऐकले तसे तिला टेन्शन आले होते...
सगळ्या जबाबदर्यात ही सगळ्यात कठीण आणि मोठी जबाबदारी यांनी माझयावर सोपवली आहे.... मला माणसांनी पारख तर नाही आणि दिराची इच्छा आणि इतर सगळ्यांनी ची इच्छा आहे की मी माझी जाऊ निवडावी....
आणि ती माझ्या सारखी असावी......निदान थोडी तरी.

तिच्या मनात आता शोध सुरू झाला होता.... तिला तिच्या नात्यातल्या किती तरी मुली नजरेत दिसत होत्या.... मामाची... आत्याची....मावशीची....... काकाची..... कुठल्या कुठल्या मुली तिला नजरेत दिसत होत्या....
सगळ्या सुंदर शिकलेल्या.... हुशार...... दिराला शोभेल अश्या.....

पण तिला हे कळत होते की, दिसायला नसली बरी तरी चालेल पण मनात भरणारी कोण असावी अशी जी समोर आहे आणि मी बघू शकत नाही.....जिला माणसे आणि त्यांचे मन राखता येईल .....

तिला तिच्या बहिणीची ही हे स्थळ योग्य वाटत होते... तिला खूप आनंद झाला होता, माझी बहिण आली तर ती ही माझ्या म्हणण्या प्रमाणे नांदेल,तिला माझे ऐकण्याची सवय आहे, ती योग्य असेल माझ्या मते.....पण तिला वाटले सख्या बहिणी सख्ख्या जावा जावा नको, उगाच मनात तुलना केली जाईल,भेद भाव केला गेला तर मी तिच्या मनात वाईट ठरायचे.

ती एकदा मामाच्या घरी गेली सहज आणि तिच्या समोर मामाची मुलगी आली,हेमाने तिला खूप लहान असतांना पाहिले होते.... आता ती मोठी झाली होती..... मामा ने तिला खूप चांगले संस्कार दिले होते,.... पण फक्त एक गोष्ट कमी होती ती म्हणजे मामा खप गरीब होता.... मुलगी साधारण होती ... मामाची मुलगी तिला जरी आवडली होती तरी गरिबी मुळे तिला आड काठी करावी लागली........ मानत तर मामाची मुलगी करावी पण ..मामाची गुणी होती.... थोड्या वेळ तिने गप्पा मारल्या... आज पर्यंत कोणी तिला इतके समजून घेतले नाही जितकी मामाची मुलगी तिला तिच्या जीवनात आलेल्या सुख दुखाबद्दल,तिला काय आवडते नाही आवडत ह्या बद्दल विचारत होती.... तिला बघून वाटले नुसते घर गरीब आहे म्हणून मी हिला टाळत आहे पण बाकी तिच्या माझी जावं होण्याचे सर्व गुण आहे....

जितका वेळ ती मामाकडे होती, तो सगळा वेळ ती राधा ला समजून घेत होती... ती म्हताऱ्या आजीची काळजी घेत होती... आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करत होती... आणि सगळे आवरून ती तिचा अभ्यास ही करत होती..


एकाकी कडे तिची स्वतःची बहीण जाऊ करावी की मामाची मुलगी हा प्रश्न पडला होता.....

तिने विचार केला ,गरिबी एकवेळ चांगुलपणामुळे निभावून नेता येते,पण मुळ स्वभाव जर अति आगाऊ असेल तर त्याला औषध नसते..... राधा जाऊ म्हणून आली तर हे मोठं घर सांभाळून घेऊ शकते आणि माझी बहिण आली तर तिचे लाड पुरवण्यातच माझे आयुष्य जाईल, तशी ही सुंदर असणे,श्रीमंत असणे हे श्रीमंत मनाला कधी ही challenge करू शकत नाही...


तिने ठरवले होते....राधा मध्ये आपली जाऊ असावी ,जी सगळे घर जोडून ठेवू शकते ....मी माझी निवड आणि जबाबदारी पार पडली आहे ...आता दिर आणि घरचे जे म्हणतील ते...?

तिने 15 दिवसांनी घरच्यांना तिने घेतलेल्या जबाबदारीचा result सांगितला..... मुलगी कोण कशी हे ही कळवले

सगळ्यांना आता वहिनीच्या निर्णयाची आणि मुलगी बघण्याची उत्सुकता लागली होती

त्यांनी मुलगी बघण्याचा निरोप मुलीच्या घरी कळवळा..

त्यांना मुलगी खूप आवडली होती....आणि हेमाची पसंत ही...