Jan 20, 2021
सामाजिक

अंग.... झाकणारी साडी

Read Later
अंग.... झाकणारी साडी

रविवार म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस!!!कोणाचं काय तर कोणाचं काय.... कोणी नुसते लोळत पडतात तर कोणी भटकायला जातात..  पण असेही काही लोक असतात जे अगदी आदिवासी भागात जाऊन त्यांच्यासाठी कामं करतात. त्यांना विविध कला शिकवणे, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देणे अशा कामात स्वतःला रमवतात. थोडक्यात काय समाजकार्य करतात.

एकदा सोनाली आणि तिच्या पाच सहा मैत्रिणीनी अशाच एका आदिवासीपाड्यात जाण्याचे ठरवले. रविवारची सकाळ, अगदी सुंदर वातावरण आणि ही पूर्ण घोळका निघाला.highway सोडल्यावर अगदी खडबडीत रस्ता, गाडी तर कशीबशी पोचली तिकडे...... म्हणजे अजून थोडा रस्ता पार करायचाच होता. शेवटी गाडी तिथेच ठेवली आणि सगळे निघाले दांडियात्रा करत..... साधारण पाच किलोमीटर अंतर असेल.... काटेकुटे, रस्त्यावर मोठमोठे दगडधोंडे पार करत पोचले सगळे या पाड्यात.... अगदी मन हेलावून टाकणारं दृश्य बघत होते तिथे...कोणाच्या  पायात चप्पल नव्हत्या तर कोणाला अंगभर कपडे नव्हते... खायला प्यायला कसं काय मिळवायचे या प्रश्नाचं उत्तर त्या त्या दिवसापूरतं मिळवत होते. आपले बूट घातलेल्या पायात सुद्धा काटा जात होता आणि यांच्या मुलांचे कोवळे पाय आणि म्हाताऱ्यांचे झिजलेले पाय कसें सहन करायचे हे सगळं.....

सोनाली ला तिथे एक झोपडी दिसली, ती त्या झोपडीत गेली तर झोपडीत संपूर्ण कुटुंब होतं.... ती त्यांची माहिती मिळवायची म्हणून त्यांना काही प्रश्न विचारू लागली... तर तिच्या लक्षात आले दोन डोळे आतून तिला न्याहाळत होते. तिने तिला बाहेर यायला सांगितले पण ती नाहीच आली.... शेवटी समोर असलेला एक तरुण मुलगा उठून आत गेला, तिचा नवरा होता तो..... मग ती हळूच बाहेर आली.... का गं आत होतीस तू असं तिला विचारल्यावर ती म्हणाली, अंग झाकायला नीट कपडा नाही माझ्याकडे कशी येऊ बाहेर? हा आत आला की त्याचा कपडा मला देतो मग मी बाहेर येऊ शकते.... निशब्द झाले सगळेच.... डोळ्यात अश्रू... पण नुसते अश्रू येऊन काय....

सोनालीने स्वतःच्या  अंगावर असलेली उगाच style म्हणून घेतलेली ओढणी तिला दिली तर तिला अगदी पैठणी मिळाल्याचा आनंद झाला....आपल्याला पैठणी मिळुनही एवढा आनंद होणार नाही एवढा आनंद हिला झाला हे बघून सगळ्याचेच डोळे पाणावले.

एका साडीचे मोल काय असावे अशा या स्त्री करता हे आपल्याला खरंच शब्दात सांगता येणार नाही पण प्रत्येक कपडा हा मायेचा, आईच्या साडीसारखाच भासत असेल तिला.......

 

Circle Image

Trupti Likhite

Homemaker

I hav two daughters. Now wanted to explore myself