Login

यात माझा काय दोष-अंतिम भाग

Physical problems are not in our hand

यात माझा काय दोष-अंतिम भाग

ही कथा काही लोकांना अर्धवट वाटली, या कथेचे जे शीर्षक होते ,त्याप्रमाणे फक्त तिच्या मनातला प्रश्न बोलून दाखवला होता ,मूल न होण हा एक सामाजिक प्रश्न आहे,त्याची खूप सारी कारणे असतात ,दोघांपैकी कुणामध्येही शारीरिक दोष असू शकतो,पण नेहमी अग्निपरीक्षा ही स्त्रीलाच द्यावी लागते ,जर एखाद्या स्त्री मध्ये दोष असेल तर पुरुषाचं दुसरं लग्न लावून दिले जाते.काही लोक म्हणतात,गेला तो जमाना ,पण अजुनही आजुबाजूला पाहिले ,तर अशा घटना समाजात घडत आहे,त्याला अजुनही आळा बसलेला नाही ,ही खूप दु:खाची गोष्ट आहे. शारीरिक दोष कुणातही असला तर,तो त्याचा दोष नसतो ,हेच लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला होता . कोणामध्येही शारीरिक दोष असू दे ,दुस-याने त्याला समजून घेतले पाहिजे ,त्या व्यक्तीला मानसिक आधार दिला पाहिजे ,यात त्या व्यक्तीची चूक नाही ,हे समजून सांगितले पाहिजे.

मुळात लग्न हे फक्त मुलांना जन्म देण्यासाठी नसतं,तर एकमेकांना सुखदु:खात साथ देण्यासाठी असतं ,हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.लग्न म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम असले पाहिजे ,त्यात वासनेला दुय्यम स्थान असले पाहिजे. शारिरीक संबंध जर प्रेमातून निर्माण झालेले असतील ,तर ते सुखकारक असतात ,नाहीतर दू:खाशिवाय काही मिळत नाही.

तसं पाहायला गेलं तर आयुष्य म्हणजे काय,माणूस म्हणून जन्माला  येतो ,लहानाचा मोठा होतो ,शिकतो ,नोकरी करतो ,मग लग्न होते ,मुलं होतात ,त्यांना मोठं करण्यात,लग्न लावून देण्यात म्हातारपण येतं ,मुलं नोकरी निमित्त दुस-या गावी जावून राहतात ,शेवटी उरतं कोण,नवरा बायको .

स्वत:ची मुलं जरी झाली ,तरी म्हातारपणी ती तुमच्या जवळ नसतात ,शेवटी नवरा बायकोच उरतात ,मग नाही झाली स्वत:ची मुलं तर ती जोडपी हा का विचार करत नाहीत की ,आपला जन्म चांगल काम आपल्या हातून होण्यासाठी झाला आहे. एकमेकांना दोष देत राहण्यापेक्षा,अनाथ मुलाला दत्तक घ्या ,जी स्वप्ने तुम्ही स्वतःच्या मुलासाठी पाहिली ,ती त्याच्यात साकार करा ,आईवडील होण्याचा आनंद लुटा . आता थोडा काळ बदलला आहे ,काही मुल न होणारी वीस टक्के जोडपी हा निर्णय घेतात आणि आयुष्याला नंदनवन बनवतात . मला तर ह्या लोकांचा कधी कधी हेवा वाटतो,कारण ह्या साठी खूप मोठं मन लागतं,कुणालाही हे साध्य होत नाही,मी तर म्हणेन हे देवाचे देवदूत असतात.

स्वत:च्या मुलाला कोणीही मोठं करतं ,प्रत्येक जणच ते करत असतो ,पण दुस-याच्या मुलाला आपलस्ं करून,त्याला आपलं मुल म्हणून वाढवायच्ं हे एक सामान्य व्यक्ती करुच शकत नाही ,हे फक्त एक असाधारण व्यक्तीच करु शकते. याची उदाहरण इतिहासात ही आहेत ,महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मूल नव्हते ,तर ज्योतिबा फुले यांनी दुसरे लग्न केले नाही ,ते किती तरी अनाथ मुलांचे आईवडील बनले आणि त्यांची भविष्ये बनवली. 

हे लिहिण्याचा एवढाच उद्देश आहे की ,तुम्हाला साधारण व्यक्ती बनायच आहे की असाधारण हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे,बघा पटतय्ं का लिहिलेलं.

जर लेख आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात 

🎭 Series Post

View all