
त्यात तिची तरी काय चूक
संगिता आपल्या आजी आजोबां सोबत राहत होती, आईला नव-याने सोडून दिलं,त्यामुळे आई आणि ती दोघी आजी आजोबांसोबत राहत होत्या . संगिताची आई एका हॉटेलमध्ये पोळ्या करायच्या कामाला होती ,आजी आजोबा शेतात राहत होते,रोज यायला जायला लांब होते ,म्हणून आई तिथेच राहायची ,आठवड्यातून एक दिवस राहायला यायची ,त्यामुळे संगिताला आजी आजोबांचा जास्त लळा होता ,ती चौदा वर्षांची झाली असेल ,तशी न्हाती झाली ,त्यांच्या घराच्या जवळ शरद नावाचा मुलगा होता,त्याला ती आवडू लागली होती,हे तिच्या बाबांच्या लक्षात आलं.पोरीची जात म्हणजे काच , एखादा तडा गेला तर आयुष्याचे मातेरे ,म्हणून ते तिच्यावर नेहमीच लक्ष ठेवून असायचे. त्यांच्या दूरच्या नातेवाईकाने एक स्थळ आणले होते ,घरचं सगळं खूप चांगलं ,जमीन जूमला भरपूर होता,फक्त मुलगा काही काम करत नव्हता. बाबांनी विचार केला,पोरीचं नशीब चांगले आहे,मुलगा काम करत नाही म्हणून काय झालं,आपली पोरगी सगळं सांभाळून घेईल.
तिला पाहायला पाहुणे आले,त्यांनी तिला पसंत केलं ,तिने तर मुलाला पाहीलं पण नव्हतं,पण आजोबा म्हणाले ,मुलगा चांगला आहे,त्यांनी आजोबांना त्यांच्या घरी सगळं बघायला बोलावलं ,आजोबा गेले .त्यांचा मोठा बंगला होता ,त्यांची मुलगी पुण्याला शिकायला होती आणि त्यांनी सांगितल ,आम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही ,तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी घेऊन या . आजोबांच मन भरून आलं,ते आजोबांना म्हणाले ,आजचा दिवस रहा ,आम्ही उद्या मुलीच्या साड्या घेऊन देतो ,म्हणजे तिला ब्लाऊज शिवायला देता येतील. तसं आजोबा ,बरं म्हणून थांबले ,त्यांनी ब्राह्मणाला विचारून मुहूर्त काढला ,तो पंधरा दिवसांनंतर निघाला.
आजोबा म्हणाले ,ठीक आहे. ते साड्या घेऊन गेले ,लग्नाची तयारी दोन्ही घरी चालू होती,बघता बघता लग्न झाले.लग्नानंतर सात आठ वर्ष सगळं व्यवस्थित चालू होतं,दोन मुली झाल्या होत्या ,पण सगळं चांगल असं कसं होईल,आता तर ती भर यौवनात आली होती,एक दिवस तिच्या नव-याचा अपघात झाला आणि तो अपंग झाला,त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते. घरात सगळं आलबेल होतं , कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती ,मुली आता शाळेत जात होत्या,सगळ्यांना तिचं किती छान चालू आहे, असं वाटत होतं ,पण ती मात्र रात्री जागून काढायची ,कशी तरी मनाची समजूत घालत होती ,पण शरीराची भूक तिला नेहमीच अस्वस्थ करायची ,मग रात्री उठून थंड पाण्यात शॉवर खाली जाऊन उभी राहायची आणि स्वत:ला शांत करायची. सासू सासरे तसे तिला खूप जीव लावायचे ,मुलींकडे आणि सासू सास-यांकडे पाहून दिवस जगत होती ,पतिव्रतेसारखी नव-याची सेवा करत होती.
आजोबांची तब्ब्येत ठिक नव्हती म्हणून ती त्यांना भेटायला चालली होती, बस मधून उतरल्यानंतर मळ्यात चालत जावे लागे ,ती चालत होती तर मागून शरद आला ,त्याने मोटारसायकल थांबवली आणि म्हणाला ,चल सोडतो तुला .
तीही बसली ,कारण ओळख होती ,त्याने तिला घरी सोडले.
आजोबांना भेटली ,आजीने शेतात जाऊन मेथी आणायला सांगितली ,म्हणून ती शेतात गेली ,तिथे बाजुच्या वावरात शरद दिसला ,त्याने कसं चाललंय हे विचारलं,तसं तिने दोन मुली आहे ,सासू सासरे चांगले आहे पण नवरा जागेवर आहे ,असं सांगितल ,तसं त्याचे डोळे चमकले आणि त्याला काय झालं माहित नाही,त्याने अचानक त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकवले,तीही पुरुषी स्पर्शासाठी आसुसली होती ,तिने प्रतिकार केला नाही,झुडपात जाऊन दोघे एकमेकांत कधी विलीन झाले हे तिला कळलच नाही, थोडया वेळाने तिच्या लक्षात आले,आजी वाट पाहत असेल ,तिने पटकन स्वतःचे कपडे व्यवस्थित केले आणि निघाली.दोघांनी एकमेकांकडे समाधानाने पाहीलं .शरदने विचारलं ,कधी जाणार आहेस.
ती म्हणाली,आहे दोन दिवस,त्यावर तो म्हणाला ,उद्या ये शेतावर ,मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती ठीक आहे,म्हणून घरी जाते. आजी विचारते ,बराच उशीर झाला.
ती म्हणते ,हो ,शरद भेटला ,मावशी भेटली मग बोलण्या बोलण्यात उशीर झाला. आजी तिच्याकडे पाहत म्हणते,हे तुझ्या डोक्यात गवत कसलं आहे .आजीशी बोलताना नजर चोरत ती म्हणाली ,अगं कुठेतरी झाडात केस अडकली असतील. बरं बरं असं आजी म्हणाली ,दोघींनी मिळून जेवण बनवले ,रात्री झोपताना,दुपारचे ते क्षण आठवून तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती,आताही तो तिच्या जवळ असावा ,असे तिला वाटत होते,कधी एकदा उद्याची सकाळ होते ,असं तिला वाटतं असतं.दुस-या दिवशी सकाळी,ती शेताला पाणी भरण्याच्या निमीत्ताने जाते ,शरद तिथे आधीच होता .
शरद-तुला एक सांगू,मला तू आधी पासूनच आवडायची ,पण तुझं लग्न करून दिले,मग मला काही बोलताच आले नाही , काल मी तुझ्याशी असं वागायला नको होतं
संगिता-मी त्या बद्दल तुला दोष देणार नाही ,कारण मी पण तुला विरोध केला नाही
आता संगिता पुढाकार घेत,दोघे पुन्हा एक होतात.
शरद- तुला जर तिथे राहायचं नसेल ,तर तू घटस्फोट घे ,मी तुझ्याशी लग्न करतो.
संगिता-मला विचार करायला थोडा वेळ दे
शरद-तुला हवा तेवढा वेळ घे ,मी नेहमीच तुझ्यासाठी इथं आहे.
दुस-या दिवशीही ती असचं कारण काढून शेताला जाते आणि शरद बरोबर आपला वेळ घालवते ,उद्या तिला सासरी जायचं असतं,तिला शरदला सोडून कुठेही जायची इच्छा नसते ,पण सासू सासरे आणि मुली कधी येतेय ,म्हणून फोन करून विचारत असतात,म्हणून ती सासरी जाते . रोज रात्री शरद बरोबर घालवलेले क्षण तिला आठवायचे ,मग दोघं रात्री व्हाटस अप वर गप्पा मारायचे,मुली आणि घरातले सगळेच झोपलेले असायचे,आता तिला शरद मुळे परत माहेरी जाण्याची ओढ लागली होती,काही ना काही निमीत्त काढून ती महिना ,दोन महिन्यानी माहेरी जाऊन दोन तीन दिवस राहू लागली,
सास-यांना तिच्यातील बदल जाणवला, त्यांनी बाबांना फोन करुन लक्ष ठेवायला सांगितले ,बाबांनी दोघांना रंगेहाथ पकडले.
बाबा-मला तुझ्या कडून ही अपेक्षा नव्हती
संगिता - शरदचं माझ्यावर प्रेम आहे ,मला त्याच्या बरोबर लग्न करायचं आहे
बाबा -ठिक आहे ,शरद ही तिकडचं सगळं सोडून तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ,तू तुझ्या बायकोला सोड ,मी तुम्हा दोघांच लग्न लावून देतो.
शरद-मी माझ्या बायकोला नाही सोडू शकत ,मला दोन मुलं आहेत,त्यांच काय होईल,ते तर संगितानेच मला यात ओढलं,माझं तसं काही नाही.
संगिता- शरद तूच तर म्हणालास ना की,तू माझ्याशी लग्न करशील
शरद- तू मला आधी पासून आवडायचीस आणि त्या दिवशी तू मला प्रोत्साहन दिले,म्हणून सारं घडलं आणि मला वाटलं,तुला दोन मुली आहेत,सासरच्ं एवढं चांगलं आहे ,मग हे सगळं तू कशाला सोडशील,कारण आई मुलांसाठी काहीही करते.
बाबा-कळालं आता तुला ,आता चल घरी
घरी आल्यावर बाबा संगिताला समजावून सांगतात,एवढ्या सोन्यासारख्या दोन मुली, घर सोडून त्याच्यामागे निघालेली आणि त्याने काय केलं ,स्वत:च्या स्वार्थासाठी तुझा वापर करून घेतला आणि सोडून दिलं . आता तुच तुझा निर्णय विचार करून घे ,मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही,तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल.
संगिता-ज्यावेळी निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य द्यायला हवं होतं , तेव्हा तुम्ही निर्णय घेतला आणि आता मी निर्णय ज्याच्यासाठी घेणार होते ,तोच धोकेबाज निघाला ,मी उद्या सकाळी माझ्या घरी जाणार आहे आणि आता फक्त मला माझ्या मुलींसाठी जगायचं आहे,आता मला कुणाच्या आधाराची गरज नाही.
बाबा तिचा निर्णय ऐकून विचार करतात ,पुरुष कसाही वागला , तरी त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात नाही ,पण एखादी स्त्रीचे जर चुकीचे पाऊल पडले तर समाज तिच्यावर नको नको ते आरोप लावते.
आजोबा सगळी गोष्ट तिच्या सास-यांच्या कानावर घालतात ,कारण ते खूप समजूतदार असतात,पण त्यांना त्यांच्या नातींची चिंता असते , मुलींना त्यांच्या आईला गमवावे लागू नये हिच त्यांची इच्छा असते.
सासरे- तिचं हे जे चुकीचं पाऊल पडलं,त्याला परिस्थिती जबाबदार आहे,त्यात तिची तरी काय चूक ,या वयात असं भरकटल्यागत होणारच्ं ,जाऊ दे तिची चूक तिला समजली हे जास्त चांगल झालं,तुम्ही नका काळजी करु ,तुम्ही मला यातलं काही सांगितलं नाही आणि मी काही ऐकलं नाही.
ती सासरी गेल्या नंतर,सासरे नेहमी जसे वागायचे तसेच वागत होते ,जसं काही त्यांना यातलं काहीच माहित नाही .
आता ती नव्याने केवळ आपल्या मुलींच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने विचार करत होती,स्वत:ला कामामध्ये व्यस्त ठेवत होती की,दुसरे विचार तिच्या मनात येणार नाही,काम इतकं करत होती की,पडल्या बरोबर झोप लागली पाहिजे ,एवढं समर्पण आणि त्याग एक स्त्रीच करु शकते.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर अभिप्राय अवश्य द्या आणि नावासहित शेअर करा .
रुपाली थोरात