वादा रहा सनम (भाग १०)

वादा रहा सनम होंगे जुदा न हम


वादा रहा सनम ( भाग १०)

निहारची आणि मिहाराचे बिझनेस छान चालले होते. दोघांचा संसार ही सुखाने चालला होता. मिहीराच्या आईबाबांना आणि निहारच्या बाबांना आता नातवंडांना वेध लागले होते. लग्नाला चार वर्षे झाली होती. मिहीराने डाॅक्टरकडे अपाॅईंटमेंट घेतली. दोघही डॉ. मिताली देसाईंकडे जाऊन आले. डॉ. मितालीनी आधी काही टेस्ट केल्या. दोघांमध्ये कुठलाही दोष नव्हता. डॉ. नी ट्रिटमेंट सुरू केली. पण सहा आठ महिने तसेच निघून गेले दर महिन्याला पिरियड सुरू झाले की मिहीरा आणि निहार दोघेही नर्व्हस व्हायचे. शेवटी एकदा देवाने त्यांचे मागणे ऐकले. आणि एक दिवस सकाळी सकाळी मिहीराला उलट्या सुरू झाल्या. काही खाल्ले तरी पचत नव्हते. नुसते मळमळत होते. बाबांनी तिला मोरावळा खायला लावला. ती लगेच डॉ. कडे गेली. तिची शंका खरी ठरली. तिला दिवस गेले होते. ती आनंदाने वेडीपिशी झाली. तिने पहिला फोन निहारला केला. त्याला देखील खूपच आनंद झाला. मग तिने आई बाबांना कळवले. आणि ती कामाला न जाता घरी आली पण निहारच्या बाबांना ती कशी सांगणार होती. निहार आल्यावर त्याने बाबांना सांगितले. त्यांना अत्यानंद झाला. मिहीराची सगळेजण खूप काळजी घेऊ लागले. निहार तर मिहीराला खूप जपत होता. तिच्या मदतीसाठी सकाळी संध्याकाळी दोन निराळ्या बायका ठेवल्या होत्या. डाॅ. मितालीनी सांगितल्या प्रमाणे सर्व डाएट मिहीरा पाळत होती. पण मिहीराला थोडा त्रास होता. पाचवा महिना पूर्ण होईपर्यंत तिला उलट्यांंचा त्रास होत होता. जरा जास्त काम झाले की दमायला होत होते. दर महिन्याला चेक अप होत होता. डॉ. सांगतील तेव्हा सोनोग्राफी होत होती. तरीही ती "निमोह" मध्ये जात होती. फार त्रास झाला तर घरून काम सांभाळत होती.
सातव्या महिन्यात मिहीराच्या आईने तिचे डोहाळजेवण केले. खास डोहाळजेवणासाठी म्हणून मिहीरची आत्या सुद्धा गावाहून आली होती. मिहीराला जास्त दगदग करायची नव्हती तरी रीत म्हणून त्यांनी छोटेखानी कार्यक्रम केला. मिहीराची सगळी हौस केली. फुलांची वाडी भरली. पंचपक्वांनाचे जेवण केले. आईने हिरवी साडी खण नारळ, पाच फळांनी ओटी भरली. आत्याने आत्या कडून साडी तर निहार कडून सोन्याचा दागिना दिला. ओटी भरली. सगळ्याची ओटी भरून झाल्यावर मिळाला समोर ताट ठेवण्यात आले. मिहीराने वाटी खालचा मोदक उघडला. सर्वांना आनंद झाला. निहारला मात्र मिहीरासारखी छोटी परी हवी होती. किती म्हंटले तरी मिहीराला थोडी दगदग झालीच. डोहाळजेवण झाल्यावर मिहीरा आईकडेच राहिली.मिहीराच्या आईने तिला दिवसभर "निमोह" मध्ये जायला मनाई केली. दोनच तास ती जाऊन येई तरी देखील थकून जाई. तरी पण दुपारची विश्रांती झाली की घरातून काम करत राही. निहारच्या घरी कोणी बाई माणूस नव्हते म्हणून निहारच्या बाबांनी निहारचे काही न ऐकता तिला माहेरी पाठवले होते. निहार रोज तिला भेटायला येत होता. तिची प्रकृती अगदी व्यवस्थित होती. एखाद्या दिवशी तो आला नाही तर मिहीराचा जीव खालीवर होई.

दिवस जात होते. सकाळी सगळे आवरून दोन तास "निमोह" मध्ये जायचे. बारा वाजेपर्यंत घरी येऊन जेवण घ्यायचे. नंतर चार वाजेपर्यंत कंपल्सरी विश्रांती घ्यायची. मग थोडावेळ जमल तर काम. सात वाजता निहार आल्यावर त्याच्या बरोबर थोडे चालून यायचे. मग निहारिका बोलत बसायचे. साडेआठला जेवण, दहा वाजता कंपल्सरी झोप. लाईट्स ऑफ होत होते.मिहीराचे रूटीन व्यवस्थित चालू होते. आईने मिहीराच्या आरोग्यासाठी तिचे रूटीन सेट केले होते. नववा लागल्यावर आठ दहा दिवसानेच रात्री अचानक मिहीराची कंबर पोट दुखायला लागले. तिला थोडे अनइझी फिलिंग येत होते. ती उठून थोडी पाणी प्यायला. पण तिला दुखतच होते.अपरात्री आईला उठवायला नको म्हणून तिने दीड दोन तास सहन केले. पण हळूहळू दुखणे वाढले. बारीक कळा येत आहेत असे वाटायला लागल्यावर शेवटी पहाटे साडेचार वाजता तिने आईला उठवलेच. बाबा उठून लगेच रिक्षा बघायला गेले. तोपर्यंत आईने तिला थोडी गरम काॅफी करुन दिली. व काही घरगुती उपचार ही केले. रिक्षा मिळून दवाखाना गाठेपर्यंत त्यांना सहा वाजले. असिस्टंट डॉ. होते. त्यांनी तपासून लेबर पेन आहेत म्हणून सांगून डॉ. मितालींना फोन केला. डॉ. मिताली येऊन त्यांनी चेक केले. आणि इंजेक्शन दिले. "थोडावेळ वाट पाहू. नाॅर्मल होईल असे वाटत नाही. पण एक दोन तास वाट पाहू. नाहीतर सिझर करावे लागेल. " असे डॉ. मितालींनी सांगितल्यावर मिहीराच्या बाबांनी निहारला फोन केला. निहार, निहारचे बाबा दोघेही अर्ध्या तासात हजर झाले.

दोन अडीच म्हणता तब्बल पाच तास वाट बघून नंतर सिझरचा डिसीजन घेण्यात आला. एक वाजून चाळीस मिनिटांनी मिहीराचे सिझर होऊन तिला मुलगा झाला.बाळ अगदी छान होते. मिहीराला बराच वेळ शुद्ध नव्हती. ती शुद्धीवर आल्यावर तिने पहिल्यांदा बाळाला पाहिले. शुद्ध आली तरी ती थोडी ग्लानीत होती. तिचे पाय तिला हलवता येत नव्हते. सिझर मुळे असेल म्हणून ती शांत राहिली. तिने छान झोप घेतली. रात्री आठ वाजता ती जागी झाली. तिला खूप भूक लागली होती. आणि कमरेत खूप वेदना होत होत्या. पण सिझर झाल्यामुळे काही खायला द्यायचे नव्हते. तिला फक्त पाणी आणि चहा द्यायचा होता. साडे नऊच्या सुमारास डॉ. मितालींच्या राउंड झाला. त्यांनी चेक केले. त्यांनी देखील सिझर झाल्यामुळे दुखणे असे सांगून तिला एक पेनकिलर इंजेक्शन दिले व दोन दिवस सकाळ संध्याकळ द्यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी मिहीराला पाय हलवून उठून बसता येणे अपेक्षित होते. पण तिला पाय हलवताना खूप त्रास होत होता. उठून बसता येणे दूरच. डॉ. मितालींनी चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आल कमरेला अबसेस झाले आहे. त्यांनी तिची सोनोग्राफी आणि एम. आर. आय. करायला सांगितले. तेव्हा तिच्या ही जाॅइंटमधे पस झाल्याचे निदान झाले. पुन्हा हाय एंटीबायोटीक इंजेक्शन सुरू केली. पस आतल्या बाजूने असल्याने ड्रेसिंग होत नव्हते. अबसेस कमी व्हायला सुरुवात झाली पण फार काही कमी झाले नाही. मिहीराला पाय हलवून बसता येत नव्हते. दुसऱ्या डॉ. कुलकर्णी आर्थोपेडीकला ना बोलवून कन्सल्ट केले. त्यांनी निहारला बोलवून मेडिकल भाषेत काहीतरी टर्म सांगितली. आता फिजिओथेरपी आणि काही ट्रिटमेंट शिवाय मिहीराला चालता येणे शक्य नव्हते. या सगळ्या भानगडीत तो इवलासा जीव मात्र आईच्या दुधापासून वंचीत राहिला. हेवी एंटीबायोटीक चा त्याच्यावर दुष्परिणाम होऊ शकला असता आणि त्याची तब्येत खराब झाली असती म्हणून त्याला आईचे दूध बंद करून
वरचे गाईचे दूध त्या लागते होते. नवव्या दिवशी मिहीराचे सिझर चे टाके काढले. डाॅ. मिहीराला घरी न्यायला सांगितले. पण निहार मिहीरा थोडी बरी झाल्याशिवाय घरी न्यायला तयार नव्हता. आणि डाॅ. घरी घेऊन जा म्हणून पाठी लागले होते. शेवटी तो डॉ. मितालींशी जाऊन भांडला., " मी तुमच्यावर आणि अनेस्थेशियाच्या डॉ. वर केस घालू शकतो. तुमच्यामुळे माझी मिहीरा अधू झाली आहे. तुम्ही तिला घरी पाठवण्याची घाई करू शकत नाही. तिला थोडे बरे वाटले की मी घरी घेऊन जातो. " निहार.
" हे बघा निहार माझे हाॅस्पिटल बाळंतिणीला आहे. गर्दी तुम्ही बघताच आहात. नवीन बाळंतीण झालेल्या पेशंटला मी कुठे ठेऊ? आणि आमच्या दृष्टीने मिहीरा बरी आहे. तिचा जो काही प्राॅब्लेम आहे तो ऑर्थोपेडीक ठीक करणार आहे. तुमच्यासाठी मी आणखीन दोन दिवस थांबते पण तुम्ही विचार करा प्लीज. " डॉ. मिताली म्हणाल्या.
निहार निराश होऊन परत आला.


क्रमशः


सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all