वादा रहा सनम ( भाग ९)

वादा रहा सनम, होंगे जुदा न हम


वादा रहा सनम ( भाग ९)


दोघांच्या घरी लग्नाची गडबड आणि धमाल चालू होती. मिहीराच्या मेंदी आर्टिस्ट तिने बोलवली होती. मिहीराने मेंदीसाठी खास लाल रंगाचा थ्री फोर्थ गाऊन घातला होता. आजुबाजूला तिचे सगळे कजीन्स आणि प्रज्ञा बसले होते. प्रज्ञा सख्ख्या बहिणीसारखी मिहीराच्या पाठी उभी होती. तिला सगळी मदत करत होती. आणि एकीकडे तिचे फोटो निहारला पाठवून त्याला चिडवत होती. मिहीराच्या हातावर सुंदर मेंदी रेखाटली जात होती. त्यात मिहीराने आर्टिस्टला " वादा रहा सनम" ही अक्षरे लपवायला सांगितले होते. न राहवून निहारने मिहीराला फोन केला. मिहीराच्या चेहर्यावर गुलाब फुलले. पण तिला फोन घेता येईना. तिच्या कजिनने फोन उचलून कानाला लावला, आणि एक मिनिटात काढून स्वतःच्या कानाला लावला. आणि फोनवरचे बोलणे ऐकून जोरात हसू लागली. आणि निहारची फिरकी घेत म्हणाली, " काय हे जिजू, लग्नाआधीच मेहुणीशी फ्लर्ट करताय? मिहीरा लागेल हं आमची. " काय झाले ते निहारच्या लक्षात आले आणि त्याने फोन कट केला. त्याची नक्कल करत कजीन म्हणाली " Love you sweet heart."मिहीरा रागाने बहिणीकडे बघू लागली. लगेच ती म्हणाली, " इतनी शरारत तो अलाउड है, है ना सब लोग? \" आणि हाॅलमधे हशा पिकला.

लग्नाचे सगळे विधी वैदीक पद्धतीने झाले. आता फक्त लग्न लागायचे बाकी होते. लग्नाची वेळ जवळ येऊ लागली तसे मिहीराच्या बाबांचे डोळे भरून येऊ लागले. आईची ही वेगळी अवस्था नव्हती, पण ती नजरेनेच बाबांना समजावत होती. मिहीरा मेकपला बसली होती. मेकप चालू होता. मिहीराच्या डोळ्यातून पाणी वाहून लागले. आई बाबांना सोडून जाणे तिलाही खूप जड जात होते. "प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस येतोच. " तिची मावशी तिला समजावत म्हणाली.

मिहीराने गुलबक्षी रंगाचा अतिशय सुंदर शालू नेसला होता. मोजकाच हलकासा मेकप आणि साधीशी ज्वेलरी आणि ठसठशीत उठून दिसणारे मंगळसूत्र घातले होते. ते तिला अगदी खुलून दिसत होते. विवाह वेदीजवळ जाण्यासाठी ती तयार होती. आईने तिला जवळ घेतले. आणि हलकेच तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. कुणाची दृष्ट लागू नये म्हणून तिच्या कानाच्या मागे काळे लावले. मामाचा हात धरून ती विवाह स्थळी येऊन उभी राहिली. निहार आधीच येऊन थांबला होता. दोघांच्या मध्ये अंतरपाट धरण्यात आला. भटजींनी तार स्वरात मंगलाष्टके सुरू केली. मंगलाष्टक सुरू असताना निहारला त्याच्या उंचीमुळे मिहीराला बघता येत होते. मंगलाष्टके संपली. दोघांवर अक्षरांचा अभिषेक झाला. आणि टाळ्यांच्या कडकडाटासह सर्वांनी दोघांचे अभिनंदन केले.

जेवणाच्या पंगती उठल्या. बघता बघता मिहीराची पाठवणी करण्याची वेळ आली. मिहीराचे बाबा निहारच्या बाबांना म्हणाले, " सांभाळून घ्या आमच्या लेकीला. एकुलती एक आहे. पण संस्कारीत आहे. "
" तुम्ही काळजी नका करु. ती माझी सून नाही लेक होऊन आमच्या घरी राहील. " निहारचे बाबा म्हणाले. घरी पोचल्यावर मऊशार पायघड्या वरून निहार मिहीराला घरापर्यंत आणण्यात आले. दारात उंबरठ्यावर माप तांदळाचे भरून ठेवले होते, ते उजव्या पायाने ओलांडून मिहीरा लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली. पहिल्यांदा देवाच्या आणि नंतर निहारच्या आईच्या पाया पडली.
जेवणानंतर मिहीराला निहारच्या खोलीत सोडण्यात आले. निहार आधीच तिथे कामा संबंधी फोनवर बोलत बसला होता. तिला बघून त्याने " दोन मिनीट" अशी खूण केली. आपले बोलणे आटपून तो मिहीराजवळ येऊन बसला. " बघू मेंदी" म्हणून त्याने मिहीराचे हात हातात घेतले. " यात काहीतरी लपवलयं, ते शोधून काढायचे आहे तुला" मिहीरा म्हणाली.
"अगदी आजच शोधायला हवे का? " निहार तिला चिडवण्यासाठी म्हणाला.
" नंतर मेंदी निघून जाईल, आणि हे चॅलेंज असते नवरा मुलासाठी. नाव लिहितात मुलाचे. पण मी नाव नाही लिहिले, वेगळं काहीतरी आहे. शोध" मिहीरा.
निहारने पाचव्या मिनिटाला शोधले. आणि हसला. मिहीराचे हात हातात घेऊन त्यावर त्याने आपले ओठ टेकवले. मिहीराच्या पोटात चुहे दौडने लगे. त्याने तिची हनुवटी धरून चेहरा वर केला. मिहीराची नजर लाजून खाली झाली. त्याने तिच्या कपाळावर डोळ्यावर अलगद आपले ओठ टेकवले. मिहीरा लाजून त्याच्या कुशीत शिरली. त्याने आपल्या पाहून तिला सामाऊन घेतले. आणि दोघांच्या मनात एकाच वेळी एकच गाणे रुंजी घालू लागले.
" कमी कभी मेरे दिल में खयाल आता है
के जास्त तुझे बनाया गया है मेरे लिये"
त्याने तिला समोर घेऊन आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली. एक एक करत सगळी आभूषण उतरली. मधले सगळे आडसर दूर झाले. दोन भुकेली मने आणि शरीरे एकरूप झाली.

दुसऱ्या दिवशी फिरायला निघायचे होते. " बाबा येतायेत ना?" तिने विचारले.
" नाही ना. ते आत्याबरोबर तिच्याकडे जाणार आहेत. " निहार.
" तरीच आईबाबा पण नाही म्हणाले. परवापर्यंत बघू म्हणत होते. आणि परवा एकदमच नाही म्हणाले. " मिहीरा.
" हं. आपल्यासाठी तिघांनी मिळून हे ठरवले. बाबा म्हणाले मला. " निहार. दुपारची जेवणे झाल्यावर आत्या आणि बाबा आत्याच्या गावी निघाले. त्यांच्यानंतर निहार मिहीरा देखील निघाले. कारने निघाल्यामुळे त्यांना वेळेचे बंधन नव्हते. तरी आधी कोल्हापूरच्या देवीला जाऊन मग पुढे जायचे होते. निघता निघता उशीर झाला मग एक रात्र कोल्हापूरला राहिले. सकाळी देवीचे दर्शन घेतले, देवीची खणा नारळाने ओटी भरली. देवीचे रूप डोळ्यात साठवून घेतले मग ते गोव्याकडे निघाले. मजा करत, हसत खेळत फोटो काढत गोव्यात पोहोचले. हाॅटेलवर गेल्यावर लगेच फ्रेश होऊन आले. दोघेही इतके दमले होते की बेडवर पडल्या पडल्या झोपी गेले. चार पाच दिवस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, समुद्रावर जाऊन जीवनाची मजा घेत कसे गेले दोघांनाही कळल नाही. डोना पावला, चर्च, कलंगूट बीच, क्रूज मंगेशीचे मंदिर अशी सगळी ठिकाणी पाहून झाली. दिवसभर फिरायचे आणि रात्री एकमेकांच्या मिठीत विरघळून जायचे. परत येताना आत्याच्या गावाकडून येऊन बाबांना घेऊनच घरी आले.
घरी आल्यावर मिहीराने घराची सर्व जबाबदारी उचलली. सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे काम आवरत होती. बाबांची काळजी घेत होती. निहारची मर्जी सांभाळत होती. आणि हे सगळे करून नोकरी ही करीत होती. संध्याकाळी मात्र आल्यावर दमून जायची, मग निहार तिला मदत करायचा. स्वयंपाक येत नसला तरी वरची कामे तो करून तिला हातभार लावत होता. बाबांची आणि निहारची दोघांचीही तब्येत मिहीराच्या लक्ष देण्यामुळे, तिच्या गोड लाघवी स्वभावामुळे आणि तिच्या येण्याने मिळालेल्या सुखामुळे सुधारली होती. निहारच्या घरी मिहीराच्या येण्याने सुखाचे मळे फुलले होते. कधी नव्हे ते बाबांच्या चेहर्यावर हसू येत होते. मागचे सगळे विसरून निहार सुख सागरी विहार करत होता.
लग्न झाल्यावर निहारने मिहीरासाठी नवीन बिझनेस सुरू करायचे ठरवले होते. किरणसरांकडे तिची नोकरी चालूच होती. पण तिचे स्वतंत्र काहीतरी असावे असे निहार ला वाटत होते. सहा महिन्यात त्याने " निमोह " ब्युटिकची घोषणा केली. त्यासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेतली, कारण मिहीरा "निमोहचा" पसारा झपाट्याने वाढवणार ह्याची त्याला खात्री होती. एक वर्षाच्या अवधीतच " निमोहचे" खूप नाव झाले. मिहीरा च्या हटके डिझाइन आणि वेगळी स्टाईल लोकांना आवडू लागली. रेग्युलर, पार्टी वेअर बरोबर वेडिंग ऑर्डर देखील येऊ लागल्या. असलेले सहकारी कमी पडू लागले आणि जागाही कमी पडू लागली.
सेकंड वेडींग अॅनिव्हरसरीच्या दिवशी " निमोह" मोठ्या जागेत शिफ्ट झाले. मोठी पार्टी त्यासाठी निहारने ठेवली होती. मिहीराच्या साथीने निहार चे स्वप्न पूर्ण होत होते.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all