वादा रहा सनम ( भाग ५)

वादा रहा सनम, न होंगे जुदा


वादा रहा सनम ( भाग ५)


अनय तीन वर्षाचा झाला. जे झाले त्यात बाळाचा काय दोष म्हणून निहारची आई त्याला बघायची. निलम तर केव्हाही अनयला आईकडे सोडून बाहेर निघून जायची. घरात काही झाले तरी ती तिच्याच विश्वात असायची. अनय आणि तिची बाॅडीगार्ड सोडून कोणाशीही तिला काही देणे घेणे नव्हते. निहार तर तिचे तोंड ही बघत नव्हता. पण अनयला शाळेत अॅडमीशन घ्यायच्यावेळी परत निलमच्या पप्पांचा धमकी वजा फोन आला आणि निहारला निलम सोबत शाळेत जावे लागले. शाळेत अॅडमीशन झाली. निहार घरी येईपर्यंत घरी काहीतरी झाले आणि निहारची आई पुन्हा एकदा चक्कर येऊन पडली. ताबडतोब त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. पण त्या फक्त निहार येण्याची वाट बघत होत्या. निहार आल्यावर त्यांनी निहारला जवळ बोलवले आणि हळू आवाजात म्हणाल्या, " काही कर आणि या सगळ्यातून स्वतःची मान सोडवून घे. तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल. मी मुक्त होईन. " एवढे बोलून त्या मातेने प्राण सोडला. निहारने आई गमावली. आईच्या दिवस कार्यानंतर बाबा निहारला म्हणाले, " बाळा, मला आता इथे करमत नाही. मी वृद्धाश्रमात जाऊन रहावे म्हणतो. तिथे माझ्या वयाची माणसे भेटतील. मी सुखाने राहीन. "
" नको बाबा, असे नका करू. मी एकटा पडेन इथे. " निहार म्हणत होता ते ऐकुन निलम बाहेर येत म्हणाली, " एकटा कशाने, मी आहे ना. आपण सुखात राहू. ह्या म्हातार्यांची लुडबुड नाही आपल्यामध्ये. " निहारने निलमकडे बघत हात उचलणार इतक्यात ती बाॅडीगार्ड अनयला घेऊन आली आणि निहारने हात मागे घेतला. बाबा त्यांचे सामान घेऊन वृद्धाश्रमात निघून गेले. जाताना निहारला बजाऊन गेले, " हे आपले घर माझ्या आयुष्यभराची मेहनत आहे. ती मी तुझ्या नावावर करतो आहे. हे सोडून कुठेही जाऊ नकोस. डोक टेकण्यासाठी ही तुझी हक्काची जागा आहे. "
त्यानंतर निहार रोज फक्त झोपण्यापुरताच घरी येई व हाॅलमधे सोफ्यावर झोपून जाई. आपले सामान त्याने आई बाबांच्या खोलीत हलवले, पण तिथे त्याला झोप लागत नसे. दरम्यान काही महिन्यात निलमच्या पप्पांचा देखील मृत्यू झाला. आणि निहारच्या डोक्यावरचे थोडे टेन्शन कमी झाले. निलमचा भाऊ पप्पासारखा नव्हता. पप्पा अंडरवर्ल्ड मधे मुरलेले राजकारणी होते, तितका भाऊ नव्हता. डावपेच खेळणे त्याला जमत नव्हते. निहार आता ह्या सगळ्यातून आपली सुटका करून घ्यायला धडपडत होता. आणि याच कालावधीत मिहीराशी त्याची गाठ पडली.

वर्तमान

निलमला कशी कोण जाणे पण निहार आणि मिहीरा बद्दल कुणकुण लागली. ती रागाने वेडी पिशी झाली. " मला इग्नोर करतो. माझ्याकडे बघत पण नाही, बोलणे तर दूरच. थांब दाखवते तुला ही निलम काय चीज आहे " मनाशीच बडबडत ती घरात फेर्या मारत होती.
निहार आला, फ्रेश होऊन झोपण्यासाठी आडवा होणार तोच निलमने त्याची काढले पकडली. निहार बघत राहिला. त्याला काही कळायच्या आत तिने त्याच्या कानाखाली ठेवून दिली. आता निहार ही उसळला. काॅलरचा हात काढून त्याने पिरगळला आणि निलमच्या दोन वाजवल्या. " मला काय समजलीस? मी पण मारू शकतो तुला. ऐकणार नाहीये मी आता. आणखी ठेवून देईन. गप निघून जा. " निहार.
" नाही जाणार मी. कुठेच नाही जाणार. बघताच त्या सटवीकडे. कोण ती मिहीरा. नाही तिची वाट लावली तर नाव नाही सांगणार. " निलम.
" तुझा काय संबंध तिच्याशी? याद राख तिच्या वाटेत आडवी आली तर. जीव घेईन तुझा आणि तुझ्या मुलाचा ही. मला फाशी झाली तरी चालेल पण तुला सोडणार नाही. " असे म्हणत निहार ने तिचा गळा धरला, मग मात्र निलम घाबरली. "आता आपले पप्पा नाहीत आपल्या बाजूने उभे रहायला. " ही जाणीव तिला होतीच. त्यामुळे ती आणखीनच घाबरली. पण तितक्यातच निहारचा फोन वाजला आणि निलम सुटली.
फोन मिहीराचा होता. ती घाबरली होती. थोड्या वेळापूर्वी तिला धमकीचा फोन आला होता. निहारच्या आयुष्यातून निघून जा हे सांगायला.
" तू अजिबात घाबरू नको. आता कुणाच्यातही दम नाही, कुणीही आपल्याला वेगळे करू शकणार नाही. आता मी कुणालाही घाबरत नाही. " निहार ने मुद्दाम निलमकडे बघत सांगितले.
मिहीराला त्याचा अभिमान वाटला. मिहीराने त्याला भेटायची गळ घातली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो तिला भेटायला गेला. तिचे बाबा घरी नव्हते. आई काॅफी आणायला गेली. त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसले. " कैसी उदासी तेरे चेहरेपे जाईल,
क्या बात है जो तेरी ऑख भर आई" निहार ने हाती तिला विचारले.
" रहावे नाही आता तुमच्या शिवाय. माझ्या जवळ रहा. कुठे मला सोडून जाऊ नका तुम्ही. मला भिती वाटते. " मिहीरा रडत म्हणाली.
" वादा रहा सनम, होंगे जुदा न हम, हे गाणेच आता लावून घेतो फोन वर म्हणजे तू मला फोन केलास की तुला ऐकू येईल आणि तू हसायला लागतील" असे म्हणत निहार ने मिहीराला हसवले आणि खरोखरच " वादा रहा सनम ची काॅलरटोन लावून घेतली.

इकडे निलमने मात्र त्याच्या मागे माणसे लावली होती त्यांनी लगेच निलमला खबर दिली. पण कालच निहार ने तिचा गळा पकडल्यानंतर तिच्या भावाने तिला समजावले होते आणि ती निहारला थोडी घाबरली होती म्हणून शांत बसली. पण ह्याचा वचपा मी काढणारच असा निश्चय ही तिने केला होता. निहार आल्यावर तिने हसून त्याच्याकडे पाहिले पण दुर्लक्ष केले आणि फ्रेश व्हायला गेला. तरीही निलमने आल्यावर त्याला विचारलेच, " आलास त्या मिहीराकडे जाऊन शेण खाऊन? "
" This is none of your business. तू कोण मला विचारणारी? तुझा काय संबंध? तुझे हेर लावलेल्या ना माझ्या मागावर त्यांच्या समोरच मी मिहीराला भेटायला गेलो. मी नाही घाबरत तुला. कालचा दणका आहे ना लक्षात? " निहार ने सुनावले तशी निलम दात ओठ खात, पाय आपटत खोलीत निघून गेली.

साधारण चार एक वर्षांनी "आकाश" भारतात परत आला. आल्यावर तो निलमचा शोध घेत होता. तिच्या मैत्रिणींकडे त्याने चौकशी केली पण कुणीही त्याला काही माहिती दिली नाही. आणि अचानक एका माॅलमधे दोघांची भेट झाली. एकमेकांना बघून दोघांनी कडकडून मिठी मारली. निलमला तर कशाचेच सोयरसुतक नव्हते. आकाश मात्र तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघून बिचकला. " लग्न झाले तुझे? " त्याने विचारले.
" इलाज नव्हता. तू आपल्या प्रेमाची निशाणी माझ्या पोटात ठेऊन गेला होतास. मग करावेच लागले. " निलम म्हणाली. तितक्यात अनयला धावत येऊन मम्मी ला मिठी मारली. आपले प्रतिरूप समोर पाहून आकाशला अतिशय आनंद झाला. अनयला जवळ घेऊन तो त्याचे पापे घेऊ लागला. पण अनयला ते अजिबात आवडले नाही.

इकडे निहार किरण आणि वकील सुखात्मे ह्यांच्या बरोबर बसून ह्या सगळ्यातून कशी सुटका करून घेता येईल याचा विचार करत होता. इतक्यात किरण चिकित्सा फोन वाजला. माॅलमधे पाहिलेली सर्व हकीकत तिने किल्ला सांगितली. किरणने निहार आणि वकील सुखात्मे ह्यांना सांगितली. आता आणखी कोणते नवीन संकट येणार या विचाराने निहार मात्र नर्व्हस झाला.

क्रमशः

सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all