वादा रहा सनम ( भाग २)

वादा रहा, न होंगे जुदा


वादा रहा सनम ( भाग २)


एका महत्वाच्या प्रोजेक्ट मिटींघसाठी तिला किरण सरांच्या बरोबर जायचे होते. ऑफ व्हाईट कलरचा टाॅप, स्काय ब्लू कलरची पॅट आणि गळ्यात स्कार्फ घालून तयार होऊन ती ऑफिसला आली होती. इतक्यात किरणसर आले आणि दोघे किरण सरांच्या कार मधून मिटींगसाठी निघाले. मिटिंगचे ठिकाणी पोचायला त्यांना दीड तास लागला. "निलम गारमेंट" कंपनीचे ते ऑफिस एकदम पाॅश एरियामध्ये होते. सिक्युरिटी चेक, पास सगळे सोपस्कार आवरून दोघे आत गेले. रिसेप्शनीस्ट नी आत काॅल करून ते आल्याची माहिती सांगितली. नंतर पाच मिनीटांनी त्यांना आत बोलवण्यात आले.
"हॅलो मिस्टर किरण. वेलकम" निहार.
" हॅलो मिस्टर निहार, ह्या मिस मिहीरा, माझ्या असिस्टंट. " किरणसरांनी मिहीराची ओळख करून दिली तेव्हा मिहीरा निहारकडे आ वासून बघत होती. तिला निहारला हॅलो करायचे भानच नव्हते. शेवटी तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवून किरणने तिला जागे केले. त्यांची मिटींग खूप छान सक्सेस फूल झाली. मिहीराने केलेली डिझाईन आणि तिचे व्ह्यू पाॅईंट निहारला आवडले. आणि त्यांचे प्रोजेक्ट फायनल झाले. किरणसर ही मिहीरा वर खुश झाले.
परत ऑफिसला येत असताना किरणसरांनी तिला विचारले की " तू ओळखते का निहारला? "
" नाही, पण योगायोगाने आधी दोन वेळा भेट झाली होती. " मग मिहीराने किरणसरांना सारी हकिकत सांगितली.
" तो दुःखी आणि फ्रस्टेट वाटतो. म्हणजे तस तो दाखवत नाही. पण मी ऐकून आहे. " किरणसर.

प्रोजेक्टच्या निमित्ताने निहार आणि किरण यांच्या वारंवार भेटी होत होत्या. साहजिकच काहीवेळा मिहीराही त्यांच्या बरोबर असायची. प्रोजेक्टच्या कामासाठी म्हणून वारंवार निहार मिहीराला फोन करत असे. कधीकधी काहीतरी कारण काढून उगाच किल्ला भेटायला येत असे. हळूहळू तो मिहीराकडे खेचला जात होता. पण त्याचे लग्न झाले होते. त्याचे लग्न म्हणजे एक व्यवहार होता. ज्या दिवशी त्याचे लग्न झाले त्याच दिवशी त्याच्या बायकोने निलमने त्याला जे काही सांगितले त्यानंतर त्याचा सगळ्याच मुलींवरचा विश्वास उडाला होता. लग्नाच्या रात्री निलमने ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले. तिचे एका मुलावर प्रेम होते आणि ती फसली होती. पण ती त्याच्या शिवाय इतर कुणाचाही विचार करणार नव्हती. निहारला लग्नाच्या आधी हे काहीच माहिती नव्हते. तोही बसवला गेला होता. मिहीराला त्याचे लग्न झालेले माहिती होते.

प्रोजेक्ट चे काम पूर्ण झाले. मिहीरा च्या उत्कृष्ट कामगिरी मुळे तिला पर्मनंट करण्यात आले व तिची सॅलरी देखील वाढली. मिहीराला आनंद झाला. जसे प्रोजेक्ट चे काम संपले तसे निहारला किरणच्या ऑफिसला येण्यासाठी काही कारण सापडत नव्हते. आणखी प्रोजेक्ट करायचा तक्ष त्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणे त्याला शक्य नव्हते. तो तिला एक नजर बघण्यासाठी रोज तिच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर थांबत होता. त्याचा रोमीओ झाला होता. मिहीराच्या नाही पण किरणच्या हे लक्षात आले. किरण मिहीरा मध्ये आता खूप चांगली मैत्री झाली होती. किरणची बायकोही मिहीराची मैत्रिण होती. त्यामुळे किरण राव निहारचे वागणे खटकत होते. त्यादिवशी प्रज्ञा किरणची बायको ऑफिसमध्ये आली होती. त्या दोघांनी मिहीराशी बोलायचे ठरवले व तिला केबीन मध्ये बोलवून घेतले. " मिहीरा एका विषयावर तुझ्याशी बोलायचे होते. " प्रज्ञा.

" बोला ना मॅम. " मिहीरा
" तुझा कुणीतरी पाठलाग करते आहे असे आम्हांला वाटते आहे. " प्रज्ञा.
" हो माझ्याही लक्षात आलयं. पण मी दुर्लक्ष करते आहे. मी काही बोलले किंवा त्यांना विचारले तर मी त्याला importance दिल्याने होईल. " मिहीरा.
" पण हे बरोबर नाहीये. मी बोलू का त्याच्याशी? पण त्याआधी तुला काय वाटते हे महत्त्वाचे आहे." किरण.

" सर, मी एकदम न्यूट्रल आहे. मला काहीच वाटत नाही. तुम्ही विचारू शकता त्यांना. पण उगीच तुमच्यात वितुष्ट यायला नको एवढेच मला वाटते. " मिहीरा.

किरणसर निहारला भेटायला त्याच्या ऑफिसला गेले. " निहार काही स्पष्ट बोललो तर राग नाही येणार ना" किरणसर

" अरे बिनधास्त ब़ोल. आता आपण मित्र झालो आहोत. नो फाॅरमॅलीटी प्लीज. " निहार.

" निहार तू मिहीराच्या मागावर का असतोस? हे योग्य आहे का? " किरणसर.

" खरयं तुझे. हे योग्य नाही. मी खूप प्रयत्न करतो स्वतःला आडवायचा. पण वेड मन ऐकत नाही. मी प्रेम करायला लागलो आहे तिच्यावर. " निहार.

" पण तुझे लग्न झालयं निहार. " किरणसर

" हं. माझे लग्न तर झालयं पण निलम माझी बायको नाही. " निहार ने त्याची सारी कहाणी किल्ला सांगितली. आणि निहारच्या डोळ्यात पाणी आले. निलम हे नाव त्याने लग्नाच्या आधी कंपनीला दिले होते. आईवडिलांना काही सांगून त्यांना दुखवणे निहारला शक्य नव्हते. शिवाय निलमच्या पोटातल्या बाळावर अन्याय होऊ नये ह्या विचाराने आजवर त्याला आडवले होते. त्याची कहाणी ऐकून किरणला ही खूप वाईट वाटले. तो म्हणाला " तुझी अवस्था मी समजू शकतो. पण मिहीरा खूप चांगली मुलगी आहे. "
" मी आता नाही तिच्या मागे जाणार. तिला नाही माझ्यापासून त्रास होणार. " निहार. त्याच्या हातात हात घेऊन किरण निहारला "Thank you" म्हणाला. ऑफिसमध्ये आल्यावर प्रज्ञा आणि मिहीराला सर्वकाही सांगितले. मिहीराला ही वाईट वाटले.
दुसऱ्या दिवसापासून निहारची गाडी दिसेनाशी झाली. तरी मिहीरा रोज जाता येता गाडी दिसते का बघत राही. त्याची कहाणी ऐकल्यावर मिहीराही त्याच्या बद्दल विचार करायला लागली होती. या घटनेनंतर निहार ने स्वतःला कामात गुंतवून घेतले होते. तो मिहीराला बघायला यायचा. पण तो येतो आणि बघतो हे कुणाला कळू नये म्हणून पूर्ण खबरदारी घेत होता. आणि इकडे मिहीरा मात्र त्याची वाट पहात होती.
दोन तीन आठवडे असेच निघून गेले. एकदा स्वतःच्या नादात जात असताना मिहीराला जोरात अपघात झाला. निहार जवळच असल्याने त्याने लगेच तिला दवाखान्यात नेले आणि किरणला कळवले. किरण येईपर्यंत निहार थांबला. पण किरण येताच सगळी सूत्र त्याच्याकडे सोपवून तो निघून गेला. मिहीराला बरेच लागले होते. पायाला प्लास्टर घालावे लागणार होते. हाताला थोडे लागले होते. तर डोळ्याजवळ ही छोटी जखम होती. तिचे सगळे आवरून किरणसरांनी तिला तिच्या घरी पोचवले. जाताना त्यांनी निहार ने तिला दवाखान्यात पोचवले हे मिहीराला सांगितले. ती नुसती गालात हसली. आत्ता या विषयावर बोलणे उचीत नाही म्हणून मिहीराच्या आईबाबांशी बोलून किरणसर निघून गेले. निहार आपल्या मागावर अजूनही येतो असे फिलिंग मिहीराला येत होते आणि त्याने दवाखान्यात आपल्याला पोचवले कळल्यावर तिची खात्री पटली. निहारची नंबर तिच्याकडे होता. रात्री तिने thanks म्हणण्यासाठी निहारला फोन केला. पण त्याने उचलला नाही. तीन चार वेळा फोन लावूनही त्याने उचलला नाही. शेवटी तिने किरणसरांना फोन करून रिक्वेस्ट केली. आणि पंधरा मिनिटांनंतर निहारची फोन लागला.
" खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही नसतात तर मी किती वेळ रस्त्यावर असते कुणास ठाऊक? तुमच्या मुळे मला लगेच ट्रिटमेंट मिळाली. " मिहीरा बोलत होती. तिकडून मात्र काहीच प्रतिसाद नव्हता.
" बोलायचे नाहीये का? " न राहवून मिहीरा म्हणाली. तिकडून फोन कट झाला. मग मात्र मिहीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचे न बोलणे तिच्या मनाला लागले.
दुसऱ्या दिवशी प्रज्ञा आणि किरणसर परत मिहीराला बघायला आले. काॅफी करायला आई गेल्यावर मिहीराच्या डोळ्यात पाणी आले. तिनी प्रज्ञाला निहार बोलला नाही म्हणून खूप फिल झाले हे सांगितले. प्रज्ञा आणि किरणसरांनी तिची अवस्था ओळखली.
" मी बोलतो त्याच्याशी. पण तू विचार कर. तो स्वतः यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे. तर आता तू आडकते आहेस. त्याच लग्न झालयं आणि तो मोठा ही आहे जास्त. " किरणसर म्हणाले पण मिहीराच्या डोळ्यात पाणी पाहून गप्प बसले.
तीन चार दिवस मिहीरा सतत त्याचाच विचार करत होती. त्याने फोन करावा, किमान मेसेज तरी करावा असे तिला वाटत होते.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all