इथे अजूनही भूतकाळ जिवंत आहे भाग तीन
©® डॉ अमित मेढेकर
पोटाला तड लागेस्तोवर ते खात होते आणि ती म्हातारी त्यांचे निरीक्षण करत बसलेली होती.
"आजी, तू पण जेव ना आमच्या सोबत " जितू म्हणाला.
" मी असले काही खात नाही" असे म्हणत तिने डोळे मिचकावले.
" मी असले काही खात नाही" असे म्हणत तिने डोळे मिचकावले.
तिची नजर जितूच्या रक्तळलेल्या खांद्यावर खिळलेली होती.
ते पाहत असताना ल, न राहवून जय ने विचारले "असले म्हणजे काय गं? इतके छान तर जेवण आहे!"
"म्हणून तर म्हणते ना... तुम्ही मस्तपैकी खा! आणि तसेही हे खाल्ल्याशिवाय तुम्हाला झोप कशी येणार?" गूढ स्वरात ती बोलली तसे सगळे मान वर करून तिच्याकडे बघायला लागले.
"तुला काय म्हणायचे आहे? आम्ही झोपावे! आणि का झोपावे? कशाला झोपावे?" जय जरा वैतागत म्हणाला.
"तुला खूप प्रश्न पडतात रे? " ती काहीसे रागातच म्हणाली
" विकी मला नाही थांबायचे इथे, मी जातोय" असे म्हणत जय उठायला गेला पण त्याला काही उठताच आले नाही. का कोण जाणे पण, त्याच्या शरीराने त्याला साथ नाही दिली.
एव्हाना बराच उशीर झाला होता. बाहेर आता पावसाला सुरुवात झाली होती.
अंधाऱ्या जंगलात पाऊस, वादळ होते तरीही ती म्हातारी घाबरली नव्हती.
" तू कधीपासून राहतेस इथे? तुला भीती नाही वाटत इथल्या वातावरणाची?"
अंधाऱ्या जंगलात पाऊस, वादळ होते तरीही ती म्हातारी घाबरली नव्हती.
" तू कधीपासून राहतेस इथे? तुला भीती नाही वाटत इथल्या वातावरणाची?"
"भीती आणि मला?" असे म्हणत ती विचित्र हसायला लागली... ते हसणे फार निष्ठुर होते... हसण्याचा आवाज पूर्ण खोलीभर फिरला आणि काही वेळाने ती एकदम शांत, गंभीर झाली.
"मलाच आठवत नाही मला किती वर्ष झालीत इथे" असे म्हणत ती उठली आणि आत गेली.
थोड्या वेळाने बाहेर आली तर तिच्या हातात एक मोठे तबक होते ज्यात खायची विड्याची पाने होती. ते बघताच विकीने झडप मारली... पण जय आणि जितू ने त्याला हात देखील लावला नाही.
"काळजी करू नको पोरा, तुला जी जखम झाली आहे त्याला बरे करायचे आहे..." ती जितूला म्हणाली.
त्याला कळले नाही तसे त्याने तिच्याकडे बघितले. तिने हातात काहीतरी पावडर धरली आणि डोळे मिटले. "जीतू, समोर ये" थोड्याशा अधिकारात ती म्हणाली, जसा तो जवळ आला तसे त्याच्या जखमेवर तिने जोरात हात मारला. तो वेदनेने कळवळला.
त्या जखमेवर हिरवे काहीसे त्याला दिसले, त्याच रागात म्हातारीला तो ओरडला " दुखतंय ! काय लावले हे मला?"
त्याने ते झटकायचा प्रयत्न केला पण ते जणू त्याला चिकटून बसले.

"विकी, बस कर आता तुझे खाणे , विड्याचे पान आहे ते! आपल्याला अजून पुढे जायचं आहे. आपली बाईक रस्त्यात आहे हे विसरलास का?" जय म्हणाला.
म्हातारी मिश्किल हसत जयकडे बघत होती, जणू तिच्या नजरेत खूप काही साठले होते आणि तिने खूप काही ठरवले होते.
आळोखे पिळोखे देत विकी उठला आणि सोफ्यावर धाडकीने आडवा पडला, जेवण अंगात आले होते एव्हाना! का कोण जाणे पण सगळ्यांच्या डोळ्यावर गुंगी यायला लागली होती.
" पोरांनो, मागल्या बाजूला खोली आहे बघा, जा तिथे जाऊन झोपा" म्हातारी म्हणाली.
विकी कधी नव्हे तो आज्ञाधारक मुलाप्रमाणे लगेच उठून जायला लागला तसे जय ने त्याला टोकले " आपण झोपायला आलो नाहीय, चल बाहेर इथून" पण तो कुठे ऐकतोय. जसा तो आत गेला तसा मोठ्याने ओरडला "अरे वाह! झक्कास!"
विकी कधी नव्हे तो आज्ञाधारक मुलाप्रमाणे लगेच उठून जायला लागला तसे जय ने त्याला टोकले " आपण झोपायला आलो नाहीय, चल बाहेर इथून" पण तो कुठे ऐकतोय. जसा तो आत गेला तसा मोठ्याने ओरडला "अरे वाह! झक्कास!"
त्याचा आवाज ऐकून तिघेही तिथे धावत गेले, आत पाहिले तर चार गाद्या, अंथरूण , पांघरुण, उश्या सगळे नीट मांडून ठेवल्या होत्या. बाजूला पाण्याची बाटली सगळे कसे नीट होते.
ते बघून त्या क्षणाला अजून काय हवे या आविर्भावात सगळे जण जय ला सोडून त्या अंथरुणात शिरले
ते बघून त्या क्षणाला अजून काय हवे या आविर्भावात सगळे जण जय ला सोडून त्या अंथरुणात शिरले
जयला हे सगळे विचित्र वाटत होते. जणू काही सगळे नीट ठरवून कारस्थान केले आहे.
नाही म्हणायला त्याला आता त्या म्हातारीचा संशय यायला लागला होता. ती साधारण बाई नाही,
काहीतरी विचित्र आहे ह्या मागे, काहीतरी गूढ आहे! सगळेच कसे इतके नीट नेटके... तेही या जंगलात? जिथे माणसाचे अस्तित्व नाही.. मग हे कसे घडू शकते? कसे इतके जेवण , सामान कोणी आणू शकते? ही म्हातारी बाई इतके कसे सगळे बनवू शकते? शिवाय मोजून चारच ताटे, चारच गाद्या आणि ही म्हातारी जेवली सुद्धा नाही. त्याच्या मनात विचारांचे वादळ होते तेवढ्यात त्याला आवाज आला.

"तुला झोप नाही येत आहे का?" दात विचकावत म्हातारी त्याला म्हणत होती.
त्याला झोप तर खूप येत होती पण झोपायचे नाही हे त्याने पक्के ठरवले होते. शेवटी त्याने ठरवले की हिच्याशी बोलायचं,
"तू नक्की आहेस कोण? मगाशी काय म्हणाली की तुला आम्ही येणार हे माहीत होते?"
ती हसायला लागली तेव्हा तिचा आवाज मोठा बीभत्स झाल्याचा त्याला जाणवला.
"मला कसे माहित? अरे वेड्या, मीच तर तुम्हाला इथे आणले.
त्या झाडामागे तुला जे चमकताना दिसले ते माझेच डोळे होते" असे बोलताना तिचे डोळे पुन्हा तसेच लकाकले जसे झाडामागे लकाकले होते.
त्या झाडामागे तुला जे चमकताना दिसले ते माझेच डोळे होते" असे बोलताना तिचे डोळे पुन्हा तसेच लकाकले जसे झाडामागे लकाकले होते.
आता मात्र तो आतून घाबरला पण तिला तसे न दाखवता त्याने हिमतीने काम करायचे ठरवले. कसे करून त्याला त्याच्या मित्रांसोबत इथून निघायचं होते
"तुझ्या मनात काय सुरू कळते मला. तुला इथून जायचे आहे ना! पण नाही जायला मिळणार , मी जाऊच देणार नाही" पुन्हा ती हसायला लागली.
"इथे खूप लोक आली पण कधी परत गेलीच नाहीत, मी जाऊच देत नाही. मी माझ्या राज्यात, माझ्या मनाविरुद्ध काहीच होऊ देत नाही. हे माझे राज्य आहे, माझा प्रदेश आहे, मी इथली मालकीण आहे. " बोलताना क्षणा क्षणाला तिचा चेहरा, हावभाव बदलत होते.
त्याच्या मनात आले की जर विरोध केला तर ही हिंस्र होईल, तेव्हा जरा शांतपणे घेतले पाहिजे तरच मार्ग निघेल.
तिच्या कलेने तिच्याशी बोलायचे ठरवून तो म्हणाला " आजी तू कोण आहेस नक्की? कुठली तू ? इथे काय करत आहेस?"
अचानक ते घर एखाद्या गगूढ गुफेसारखे त्याला जाणवायला लागले आणि ती बोलायला लागली... "ऐक...मी राणी देवयानी! गेल्या शेकडो वर्षांपासून मी इथे राहते आहे. हा माझ्याच राज्याचा जंगली भाग होता जिथे त्या काळी माणसाची यायची सुद्धा हिम्मत होत नसे, इतकी जंगली जनावरे होती.
या राज्यात सगळे सुजलाम सुफलाम होते. सगळे उत्तम चालले होते. पण एका माणसामुळे या सगळ्याची माती झाली, ज्यावर आम्ही सगळ्यात जास्ती विश्वास ठेवला त्यानेच आमचे राज्य हिरावून घेतले, संपत्ती नष्ट केली इतकेच नाही तर आमच्या पुत्रांना सुद्धा मारून टाकले.
आम्हाला या जनावरांच्या जंगलात हात पाय बांधून मरायला सोडून दिले जिथे अन्न पाण्यावाचून तडफडून आमचा जीव गेला. तेव्हापासून इथेच आहे, भुकेलेल्याना खाऊ पिऊ घालते पण ते इथून कधीच परत जाऊ शकत नाहीत. मीच त्यांना जाऊ देत नाही प्रत्येक व्यक्ती हा दुष्ट आहे ज्याने कोणाला त्रास दिलाच असतो त्यांना शिक्षा मी देते. आता तुम्ही अडकलात आता तुम्हालाही शिक्षा मिळणार" असे म्हणत ती गडगडाटी हसायला लागली. तिचा आवाज प्रचंड घुमत होता पण झोपलेल्यांची झोपमोड काही होत नव्हती.
"पण आम्ही काय केले ? आम्ही फिरायला निघालेलो आहोत यात कोणाला काय त्रास दिला ?"
"तुम्ही सगळी बद माश आणि टपोरी मुले आहेत.आजवर कितीतरी लहान मुलांना तुम्ही त्रास दिलात. वेड्यावाकड्या गाड्या चालवून लोकांना पाडलेत ! मुलींना चिडविले, घरातल्यांना त्रास दिलाय, तुमच्या मजेसाठी तुम्ही लोकांना खूप छळले आहे" ती म्हणाली
"पण ते तर सगळीच मुले करतात. आम्ही यात काय वेगळे केले?"
"कळेलच लवकर तुम्हाला" असे म्हणत अचानक ती अदृश्य झाली. त्याच क्षणाला सोसाट्याच्या वारा सुटला आणि त्याच्या बाजूने झपाट्याने त्याला काहीतरी स्पर्शून गेले.
©® डॉ अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा