इथे भूतकाळ अजून जिवंत आहे:- भाग पाच
©®डॉ अमित मेढेकर
©®डॉ अमित मेढेकर
जयने डोळे उघडले तेव्हा आजूबाजूचं दृश्य पूर्णपणे बदललेलं होतं. घर तेच होतं, पण आता ते जणू श्वास घेत असल्यासारखं भासत होतं—भिंती हलत होत्या, छप्पर करकचून ओरडत होतं, आणि जमिनीवरून मंद पण सतत थरथर जाणवत होती.
लक्ष्य अजूनही बेशुद्धच होता, पण त्याच्या ओठांवर काही अस्पष्ट शब्द घुटमळत होते—जणू तो कुणाशी तरी संवाद साधत होता. जयने त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अंगात अजीब प्रकारचं बर्फासारखं थंडपण पसरलेलं होतं.
"जय... मला वाटतं आपण खूप उशीर केला आहे," जितू घाबरत बोलला. "ही जागा जिवंत आहे. आणि आपल्याला गिळण्यासाठीच जागा आपल्याला निवडतेय."
तेवढ्यात विकी हसला. पण ते हास्य त्याचं नव्हतं. त्याचं हसणं आता त्या म्हातारीसारखंच झणझणीत आणि काळजात धस्स करणाऱ्या स्वरात होतं.
"लक्ष्य... तुला कळालं नाही का अजून? आपल्याला ह्या जागी ओढून आणले आहे… आपल्यापैकी कोणालातरी इथे बोलावलं होतं!"
विकीचा चेहरा आता बदलत चाललेला होता. त्याच्या चेहऱ्यावर सावल्यांनी एक वेगळंच रूप तयार केलं होतं, जणू एखादा दुसराच जीव त्याच्या शरीरात प्रवेश करत होता.
जयने जितूला इशारा केला आणि ओरडला, "लक्ष्यला घे आणि मागच्या दरवाजाकडे धाव!"
पण तेवढ्यात घरात एक प्रचंड स्फोटासारखा आवाज झाला. दिवे एकदम तुटले, आणि संपूर्ण घर काळोखात बुडालं.
पण तेवढ्यात घरात एक प्रचंड स्फोटासारखा आवाज झाला. दिवे एकदम तुटले, आणि संपूर्ण घर काळोखात बुडालं.
त्या अंधारात, फक्त श्वासांचे आवाजं ऐकू येत होते. ते आवाज देखील मानवी नव्हते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून कुजबुजत काहीतरी जवळ येत होतं. जयने भिंतीचा आधार घेत पाय टाकत पुढे जायचा प्रयत्न केला, पण जमिनीवर काहीतरी ओलं, चिवट त्याच्या हाताला लागलं.
तेवढ्यात एक प्रकाशकिरण त्या अंधारात चमकला. जय ने त्याच्या पाकिटात हात घातला. आईने कायम सोबत ठेवायला सांगितलेला हनुमानाच्या पूजेचा अंगारा त्याच्या हाताला लागला. आता त्याच्या हातात त्याची ओळखीची ‘पवित्र गोष्ट’ होती. जयने तोच क्षण पकडला, अंगारा उचलला आणि घराच्या मध्यभागी टाकला.
तो अंगारा टाकताच अचानक जोरदार वाऱ्याचा झोत घरात फिरू लागला. खिडक्या उघडल्या, दारे चर्रकन फडफडली आणि त्या म्हातारीचा भेसूर आवाज परत एकदा घुमला.
"तुम्ही माझ्या घरात पाय टाकला आहे… आता माझ्या गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवणार नाहीत…"
जय जोरात ओरडला, "तुझ्या गोष्टी नष्ट करायची वेळ आली आहे!" पण तेवढ्यात तिथे अचानक मोठे धुके साचले.
त्या धुक्यात त्यांना काहीच दिसलं नाही. त्या धुक्याच्या वावटळी तिथे मोठ्या प्रमाणात वावरत होत्या.
त्या धुक्यात त्यांना काहीच दिसलं नाही. त्या धुक्याच्या वावटळी तिथे मोठ्या प्रमाणात वावरत होत्या.
थोड्यावेळाने तिथे सगळे थांबले. आता तिथे स्वच्छ प्रकाश दिसत होता. त्या धुक्याच्या गूढ पडद्यातून बाहेर पडल्यावर त्यांना वाटलं, आता ते मोकळे झालेत. जंगलात पुन्हा त्या रात्रीचं शांत आणि गूढ वातावरण परत आलं होतं. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न लपलेला होता—"आपण खरंच वाचलो आहोत का?"
लक्ष्य अजूनही थकलेला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये भितीचा ठसा स्पष्ट दिसत होता. जितू एकटक त्या दिशेकडे पाहत होता, जिथे ती म्हातारी होती, पण आता तिथे काहीच नव्हतं. तिचं अस्तित्वच दिसत नव्हतं, जणू ते एक स्वप्न होतं… किंवा दुःस्वप्न.
विकी काहीच बोलत नव्हता. तो फक्त गप्प शांत बसून स्वतःच्या हातांवर बघत होता. जय त्याच्या शेजारी जाऊन बसला.
"तू ठीक आहेस ना?"
विकीने नजर वर केली. "माझ्या आत काहीतरी होतं, जय. ते मी नव्हतो. माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं, पण मी काही करू शकत नव्हतो."
"तू ठीक आहेस ना?"
विकीने नजर वर केली. "माझ्या आत काहीतरी होतं, जय. ते मी नव्हतो. माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलं, पण मी काही करू शकत नव्हतो."
जयने त्याचा खांदा हलकेच दाबला. "हे फक्त तुझ्याबरोबर नाही झालं… आपल्यावर जे घडलं, त्याचा परिणाम आपल्या प्रत्येकावर झाला आहे."
तेवढ्यात, लक्ष्यने हळू आवाजात विचारलं, "जय… हे सगळं कसं शक्य आहे? एक भेसूर घर, म्हातारी, सावल्या, आणि त्या आवाजांचा इतका परिणाम?"
जय काही क्षण गप्प राहिला. मग शांतपणे म्हणाला, "काही काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात. त्या भावना, शाप, आठवणी, आणि आपली भीती… या सगळ्यांचं एक विचित्र मिश्रण तयार करत असतात. आणि जिथे अशा भावना साठतात, तिथे भूतकाळ जिवंत राहतो… अगदी त्या घरासारखा."
जितूने घाबरत विचारलं, "मग आता आपण मोकळे आहोत ना पुढे जाण्यासाठी?"
जयने डोळे मिटले… आणि पुन्हा एकदा त्याला आठवले ते डोळे, त्या म्हातारीचे. तेच खोल, ओढ लावणारे, पण आत कुठे तरी अजूनही असलेले.
"आपण तिथून बाहेर पडू, जितू… पण काही गोष्टी आपल्यात शिरल्यात. त्या आता आपल्यातच आहेत."
तेवढ्यात त्यांच्या मोबाईलला नेटवर्क मिळाले आणि चारही मोबाईलवर एकाच वेळी एकच नोटिफिकेशन आलं,
"Thanks for your stay. Come again... Next time, forever. मी तुमची वाट पाहत आहे"
"Thanks for your stay. Come again... Next time, forever. मी तुमची वाट पाहत आहे"
चारही जणांनी एकमेकांकडे बघितलं. कोणताच शब्द त्या क्षणात योग्य नव्हता. फक्त भीती, शंका आणि एक नवीन सत्य मनात रुजत चाललेलं होतं.
आता इथून पुढे निघणे हेच क्रमप्राप्त होते!
क्रमशः
©®डॉ अमित मेढेकर.
©®डॉ अमित मेढेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा