
बायकोला पटलं का नव-याचं उत्तर
प्रिय नवरोबा ,
खरं सांगू मला वाटलेलं,तुम्ही पत्र वाचाल आणि फेकून द्याल .
मनात असा विचार कराल,सीरियल पाहते ,त्याचा परिणाम झाला आहे,काय लक्ष द्यायचं . तुम्ही मला पत्राच उत्तर दिलं,तिथं मला कुठं तरी जाणवलं की,तुम्हाला माझ्या बद्दल काहितरी वाटतं, काही गोष्टीं बद्दल क्षमा मागितली ,हा तर माझ्यासाठी खरचं खूप सुखद धक्का होता आणि हे ऐकून तर खूप छान वाटायला लागलं की,आपल्यात मैत्रीच नातं निर्माण झालं आहे ,याची जाणीव करून दिली.
मी या गोष्टीचा विचार केलाच नव्हता ,नाहीतर मी तुमचीच तक्रार तुमच्याकडे करणार असं कधी झालं नसतं,पण पत्रातून व्यक्त होणं ,मलाही आवडलं.
आता तुम्हाला तुमची चूक मान्यच आहे ,तर ती सुधारण्यासाठी,तुम्ही स्वभावात बदल करा असं मी बिलकूल म्हणणार नाही.तुम्हाला मनापासून वाटत असेल तरच बदल करा .
कसं असतं ना ,तुझं माझं पटेना ,पण तुझ्यावाचून करमेना ,यालाच प्रेम म्हणतात का .
तुम्ही माझ्या सगळ्या शंकांच निरसन केले,आता माझ्या मनात,तुमच्या बद्दल कोणताही आकस नाही,तुम्ही माझ्या मतांचा आदर केला,त्याबद्दल खरचं धन्यवाद.
तुमचीच अर्धांगिनी
हे पत्र वाचल्यावर नवरा गालातल्या गालात हसला,आज संध्याकाळी घरी जाताना त्याने गजरा घेतला .
घरी आल्यावर ,तो म्हणाला ,चहा ठेव .तिने चहा ठेवला आणि दोघांसाठी घेऊन आली.मुले दोघेही अजून बाहेरून यायचे होते,दोघांनी चहा घेतला.
आता बोलायला सुरुवात कशी करणार.
तो-मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलय,तिथे बैगेत आहे बघ
ती-हे काय आता नवीन ,आज काही नाही
तो-अगं,चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे
ती-मी हे सगळं गिफ्टसाठी नाही केलं ,अजूनही तुम्ही चुकीचा अर्थ काढताय
तो-तू बघ तर खरं,काय आहे ,मग मला सांग
ती जाते ,बैग उघडते ,त्यात गिफ्ट नसतं,पण मोग-याचा वास मात्र छान येत होता,तिने तो बांधलेला गजरा हातात घेत त्याच्या जवळ आली .
तो-आवडलं का गिफ्ट
ती -हो ,पहिल्यांदा तुम्ही मला असा गजरा आणलात
तो -आण तो इकडे
ती-आता हे काय नवीन
तो- बस इथे
ती-अहो ,मुलं येतील आता
तो -येऊ दे ,बायको आहेस ना माझी
ती -म्हणजे काय,हक्काची ,दोन हजार लोकांच्या साक्षीने लग्न केलं आहे,विसरलात की काय
तो-असा कसा विसरेन ,पण तुझ्या पत्राने मला तुला समजता आलं ,मला नव्हतं माहित, तू इतक्या प्रेमाने आरोप करतेस.
ती-अच्छा,आरोप नव्हते ते,मला त्या त्या वेळेला वाटलेल्या भावना शब्दातून व्यक्त केल्या
तो-माझी माघार,असं बोलत, तो तिला म्हणतो,तिकडे बघ.
ती तिकडे पाहते ,हा गजरा घेऊन तिच्या केसांत लावतो .
ती मोहरुन जात ,त्याच्याकडे लाजत पाहते.
तो-मी खरच खूप मिस केलं आहे,आता इतकी लाजत आहे ,तेव्हा काय केलं असतं
ती आता हाताने तोंड झाकून घेते ,तो तिचे हात बाजूला करतो आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यांत हरवून जातात ,तितक्यात दार वाजत्ं ,मोठा मुलगा येतो.
मुलगा -आई ,आज चक्क गजरा
ती- अरे ,तुझ्या बाबांनी आणला
मुलगा - चांगला बदल आहे ,मी काय म्हणतो ,तुम्ही आज डेटवर जा ,तेवढाच तुम्हांला बदल
ती-अरे पण,तुमचं जेवण
मुलगा -आम्ही करु ऐडजस्ट ,मला तर तुम्हाला डेट वर जाताना पाहून खूप छान वाटतय
तो-अगं तो एवढा म्हणतोय तर जाऊ की
ती-तुमचं आपलं काहीतरीच,हे काय वय आहे का ,डेट वर जायचं
तो-अभी तो हम जवान है ,आप खुद को देखो
मुलगा -काय हो बाबा ,तिला बोलताय ,आई तू काही कमी नाहिस हं,तो आपण (मावशीचा मुलगा )दादाच्या लग्नात थीमसाठी गाऊन घेतला होता ना ,तो घाल ,मस्त दिसतेस तू त्याच्यात.
ती -बरं बाबा ,तू म्हणशील तसं
मुलगा -मग काय ,तू भी किसी से कम नहीं,ये दिखा दे किसी को
दोघेही आवरायला जातात ,तोवर मुलगा फोन करून ,टेबल बुक करतो.
कशी होते त्यांची लग्ना नंतरची डेट आणि अजून काय गंमत जंमत हे पाहुया पुढे ,एका पत्राने जीवनाला कशी कलाटणी मिळाली हे वाचत रहा ,हसत रहा ,आनंदात रहा .
अशा प्रकारे कथेला सुरुवात होते आणि कथेच नाव आहे ,सेकंड इनिंग
लेख आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात