Jan 26, 2022
नारीवादी

' ती ' चे कौतुक होईल का?

Read Later
' ती ' चे कौतुक होईल का?

      ती आज प्रत्येक क्षेत्र गाजवते आहे. पण एखाद्या क्षुल्लक कारणावरून तिला टोमणे मारणे थांबेल का? ती घरातलं सगळं करून बाहेर नोकरी साठी जाते. घाईत एखादं काम राहिलं करायचं तर घरी आल्यावर ऐकावे लागणारे शब्दांचे मार थांबतील का?. नवऱ्याच्या बरोबरीने घराची आर्थिक बाजू आपल्या खांद्यावर घेणाऱ्या तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल का? ती रोज घराची आवरा आवर नसेल करू शकत,  पापड कुरडया करायला नसेल जमत तिला,पण तिला बँकेचे व्यवहार करणे जमतं. तिला कॉम्प्युटरचे ज्ञान आहे. मिळेल का तिला शाबासकीची थाप? किती दिवस तिच्यासमोर इतरांचे कौतुक होणार? 

' ती ' चे कौतुक होईल का?

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Manasi Shripad Upasani

Teacher

I like writing