खरच न्याय मिळतो??

In this blog , I discussed two cases . One is Hathras rape case and another is Aman Baisla case.
आपल्या देशात न्यायव्यवस्था एक स्वायत्त संस्था आहे. पण या देशातील काही लोक त्या संस्थेला मानत नाहीत. त्यांच्या मनामध्ये न्यायालय म्हणजे एक हळुवार चालणारा कासव ...         आज मी देशातल्या दोन घटनेबाबत बोलणार आहे. त्यातील एक घटना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आणि एक घटना अशी , ज्याची माहिती कुणाला असेल किना नसेलही ...         पहिली घटना १४ सप्टेंबर रोजी हाथरस  ( उत्तर प्रदेश )येथे घडली . शेतात आई आणि तिची मुलगी काम करत होती. त्या मुलीच वय १९ वर्ष होत. आई कामात गुंग होती. ती एवढं गुंग होती की तिला तिच्या मुलीबद्दल कदाचित लक्षात आल नसेल. जेंव्हा तिला कळल की तिची मुलगी आजूबाजूला नाहीये , तेंव्हा ती शेतात शोधण्यासाठी निघाली. खूप शोधल्यावर तिला शेतामध्येच तिची मुलगी पडलेली आढळली. तिची अवस्था अत्यंत भयानक झालेली होती. त्या अवस्थेचा उल्लेख मी इथे करू इच्छित नाही. सगळ्यांना माहिती असेल की त्या मुलीसोबत काय घडल असणार.       त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आल. आपली मीडिया बॉलिवूड मधली ड्रग्स प्रकरणात इतके बिझी होते की त्यांना ही न्यूज कदाचित मोठी वाटली नसेल. हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिला चांगल्याप्रकारे उपचार भेटत नव्हत . एवढ होऊन सुद्धा पोलिस मात्र एफ. आय. आर नोंदवून घेत नव्हते. कारण सुद्धा अस सांगितल जात की जे कोणी त्या मुलीवर बलात्कार केले होते , त्यांचे मोठी ओळख होती.      काही दिवसानंतर सोशल मीडिया मध्ये तीच एक पोस्ट व्हायरल झालं. काही काळानंतर तिचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला . त्यात ती म्हणत होती की कसे ४ जण तिच्यावर अत्याचार केले आणि तिच्या सोबत काय झालं.  त्यानंतर कुठे आपले न्यूज चॅनल्स जागे झाले आणि ही न्यूज कव्हर करायला लागले. त्या नंतर २८ सप्टेंबर रोजी आपले प्राईम मिनिस्टर आदेश दिले की या प्रकरणाची चौकशी व्हावी. म्हणजे १४ दिवसानंतर आदेश देण्यात आले. इतके दिवस सरकार कुठे बिझी होते ?? हा प्रश्न माझ्या मनात येतो. पण शेवटी २९ सप्टेंबर रोजी तिने या आयुष्याच्या युद्धात हार पत्करली. ( तिच्या आत्म्याला शांती मिळो. )           प्रकरण इथेच नाही संपल . जेंव्हा तिचा देहांत झाला तेंव्हा तीच बॉडी पी. एम ला पाठवण्यात आल. पी. एम झाल्यावर तीच कुटुंब तिचा शरीराची मागणी करत होते. पण पोलिसांनी तसे न करता तिची बॉडी अर्ध्या रात्रीत ( २:३० वाजता ) जाळण्यात आल. कहर तर तेंव्हा झाली जेंव्हा तिथे चॅनल्स वाले उपस्थित होते आणि ते देखील त्यांना विचारत होते की काय करत आहात. तेंव्हा अक्षरशः तिथले पोलिस एक शब्द सुद्धा काढत नव्हते. ही परिस्थिती बघून कुणालाही राग येणार होत. मग त्यांचे कुटुंब सुद्धा रागात आले आणि तिथे काही प्रमाणात धक्काबुक्की झाली. त्या नंतर पोलिसांचा स्टेटमेंट आला की सगळं काही तिच्या कुटुंबाच्या अनुमतीने झालेला आहे. पण तिच्या घरातले ते नाकारत होते.        या घटनेनंतर सगळी न्यूज मीडिया त्या गावात आली. ती न्यूज कव्हर करू लागले . ही कमी होती का काय  पोलिस त्यांना गावात जाण्यासाठी मनाई करू लागले , कारण तिथे कलम १४४ लावण्यात आलेला होता. या प्रकरणा नंतर ओप्पोझिशन चे नेता राहुल गांधी त्या गावात पायी जाण्यासाठी निघाले. त्यानंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. एवढ सगळ घडल तरी परिणाम काय झालं ? ... फक्त ७ पोलिस कर्मचारी सस्पेंड झाले. पण त्या मुलीला न्याय मिळाला का??.. मला तर वाटतं नाही.          या प्रकरणानंतर खूप मोर्चे निघाले आणि निघत आहेत. पण अशे कित्येक केसेस झाल्यावर आपण मेणबत्ती घेऊन मोर्चे काढणार आहोत??? काहीतर पाऊल उचलणे गरजेचे आहे की नाही??.. या प्रकरणात अजुन एक नजरेने लोक बघत आहेत. म्हणजे जे मुल हे गुन्हा केले आहेत ते उच्च जातीचे आहेत आणि ज्या मुलीवर हे अत्याचार झाले ती खालच्या जातीचे आहे. या प्रकरणाला काहीजण जातीच्या नजरेने बघत आहेत. मला वाटतं मुलगी कोणत्याही जातीचे असुदेत न्याय मिळणं तीच अधिकार आहे. तिला मिळेल काय???...         वरून आज एक बिजेपी नेत्याच स्टेटमेंट आल . ज्यात ते म्हणाले की , " जर मुलीवर चांगले संस्कार झाले की बलात्कार होणार नाहीत. " हे वाक्य ऐकल्यावर कुणालाही राग येईल. असले वाक्य म्हणून ते काय साध्य करू इच्छितात. जर हे खर असत तर ३ महिनेची मुलीवर बलात्कार झाला नसता किंवा ७५ वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला नसता.        अश्या केसेस साठी सरकारला नवीन आणि कडक कायदे करण्याची वेळ आता आलेली आहे. किती दिवस मेणबत्ती घेऊन आपण मोर्चे काढणार आहोत??... २०१२ ला निर्भया प्रकरण झालं. त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी तब्बल ८ वर्ष लागले. एवढ वेळ लागणार असेल तर कुणाला तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील काय??? ..  खरच न्याय मिळतो ??? हा प्रश्न माझ्या मनात येते जेंव्हा मी अश्या गोष्टी ऐकतो.          अजुन एक प्रकरण आहे , जे पहिल्या प्रकरणाएवढी मोठी नाहीये , पण हे प्रकरण सगळ्या समोर येण्याची गरज आहे.         अमन बैसला नावाचा एक बिझनेसमन दिल्ली येथे एक बिझनेस चालवत होता. ज्यात त्याला धरून तिघे पार्टनर शिप मध्ये होते. ज्या मध्ये  एक मुलगी ( जीच नाव मी इथे घेणार नाही. ) आणि एक मुलगा ( त्याचा नाव सुमित गोस्वामी तो आता हरियाणामध्ये फेमस सिंगर आहे ) होता. काही वर्ष तिघेही बिझिनेस चालवले. जेंव्हा सुमित बिझनेस पासून बाहेर पडणार होता तेंव्हा सुमित अमन कडून ५ लाख  रूपये घेतला आणि त्या मुलीला सुद्धा तो काही रक्कम दिला.      तो स्वतंत्रपणे बिझनेस चालवू लागला. काही दिवसानंतर ती मुलगी अमन कडून तिचे बाबा आजारी आहेत म्हणून ७ लाखाची मागणी केली. तो सुद्धा मदत म्हणून तिला ती रक्कम दिला. खूप दिवसानंतर तो सुमित याचा म्युझिक व्हिडिओ त्याच्या बघण्यात आल. ज्यात ती मुलगी सुद्धा काम केली होती. त्याला कळून चुकलं होत की ती मुलगी खोटं बोलून तिच्याकडून पैसे घेतली होती. हे त्याला पहिला सुद्धा तिच्याकडून अनुभव आलेला होता.         ते दोघे मिळून त्याच्याकडून तब्बल १७ लाख घेऊन झालेले होते . जेंव्हा तो त्यांच्याकडं पैसे परत मागण्यासाठी गेला , तेंव्हा ते दोघेही त्याला पैसे देण्यास नकार दिले.       असेच काही दिवस तो त्यांना पैसे मागण्यात घालवला. एक दिवशी तो त्या मुलीला पैसे मागण्यासाठी गेले असता , ती मुलगी कारमध्ये अचानकपणे तिचे कपडे फाडू लागली. ती तिथवर न थांबता ती त्याला म्हणाली की , " तू जर मला १० लाख अजुन नाही दिलेस तर मी तुझ्यावर केस फाईल करीन की तू माझ्यावर रेप केलास. " ही धमकी देऊन ती पैसेची मागणी केली.        अमन हे त्याच्या घरातला मोठा मुलगा असल्याने त्याच्या खांद्यावर जबाबदारी होती. त्यानंतर त्याचे १७ लाख रुपये अडकून पडले होते आणि बिझनेस सुद्धा काही खास चालत नव्हता. त्यामुळे तो खूप दबावाखाली आलेला होता. जर तो हा सगळा उद्योग दुसऱ्यांना सांगितला असता , तर कदाचित त्याचा कोणी ऐकुन घेतल नसत. कोणी विश्वास सुद्धा केला नसता. एका मुलाचा प्रॉब्लेम हाच असतो की तो कितीही प्रॉब्लेम मध्ये असेल तर तो रडून कुणाला सांगू शकत नाही. म्हणून कोणीही असोत जास्त डिप्रेशन मध्ये जातोच. खूप सारा लोड त्याच्या लाईफ मध्ये आलेला होता.         एक दिवशी तो ऑफिस मध्ये एकटा काम करत होता.  तो इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव होता. तर तो एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट केला. ज्यात तो आपली वेदना व्यक्त करत होता. त्यात तो हेही म्हणाला की , " ती मुलगी अशी आहे की ती खोटं जर बोलत असली तर ती आई बाबांचं शपत घेऊन बोलत होती आणि ती प्रत्येक वेळेला अस सुटत आलीय. मी हे सांगितल असत तर कोणीही विश्वास केला नसता. जर सुशांत सिंह राजपूत ला न्याय मिळत नाही , तर मला सुद्धा न्याय मिळाला नसता. " त्या व्हिडिओमध्ये त्याची वेदना स्पष्टपणे दिसतो. तो पुढे हे सुद्धा म्हणतो की ," मला माहिती आहे मी चुकीचं करत आहे. पण मला याच सोल्युशन मिळालाच नाही. " हे मी माझ्या मनानी लिहीत नाहीये. तुम्ही इंस्टाग्राम वर चेक करू शकता . तिथे तो व्हिडिओ आहे आणि शेवटी तो त्याच्याच ऑफिसमध्ये फास लावून आत्महत्या केला.        त्या घटनेनंतर ती मुलगी सुद्धा इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट केली ज्यात ती त्या मुलाला रडत खूप सीरियस अशे आरोप लावत होती. पण तिच्यावर कदाचित खूप सारे विश्वास ठेवतीलही .. पण हे किती योग्य आहे की एका मुलावर आरोप लावायच आणि तो डिफेन्स करायला तो इथे नाहीये सुद्धा..        या केसमध्ये त्याला न्याय मिळेल?... पहिल्या केसमध्ये पक्षीय दबाव घालून न्याय मिळू शकत , पण त्याला कितीवेळ लागेल माहिती नाही. दुसऱ्या केसमध्ये साधं कुणाला अटकही झालेला नाही.        का खरच न्याय मिळतो???... हाच प्रश्न मला वारंवार पडतो जेंव्हा मी अशे केसेस वाचतो किंवा बघतो. ********************************** ऋषिकेश मठपती जर मी काही चुकीचं बोललो असेन , तर प्लीज कमेंट करा आणि कळवा की काय चुकीचं आहे... दोन्ही केसेस मध्ये खूप काही चुकीचं घडल आहे. तुम्ही नक्की शेयर करा...की जेणेकरून दुसऱ्यांजवळ हे केसेस पोहचावे.... धन्यवाद ????????????????