Login

खरचं अवघड असत का?स्ञीला समजणं....

स्ञीला समजून घेण अवघड नसतं...फक्त तीच मन वाचता यायला हवं ..!


"अगं ये बाई नको मला तुझी मदत ...आता मदत करशील व नंतर म्हणशील सार हातात देते तरी माझी कदर नाही तुम्हाला ....नको बाई ते सार करतो माझ मी हो बाजुला .."

सागर नयनाला बोलत होता तोच नयनाने तावातावाने हातातला शर्ट हिसकावला ...व इस्त्री करू लागली ..तो बघतच बसला इस्त्री झाली नयनाने सरळ तो हाँंगरला टागला ...सागरला जरा आश्चर्यच वाटलं ...एकतर मी नाही म्हणत असतांना इस्त्री करून दिला मग द्यायचा ना??माझ्या हातात तर ही बाई हाँंगरला लटकवून आली ...

पण म्हणाला ,"जाऊ दे ...इस्त्री करून तर दिला ना ?मला कुठे जमतं इस्त्री करायला ...पण हिच कळतचं नाही मला भांड भांड भांडतेही व राग असला तरी कोणतही काम चोख करते ...काय ?कळतचं नाही बुवा ...इतकाच जीव लावते तर कशाला भांडत असेल बर ...अवघडच आहे बाबा ह्या बायकांना समजणं..कितीही समजून घ्या कुठेतरी अंदाज चुकतोच आपला ...वाटल होत इतकी भांडली तर उद्या सकाळी नाश्ता वैगरे नाही मिळणार पण सारच नियमीत चालू आहे ...विसरली कि काय???रात्रीच भांडणं...बर झालं विसरली असेल तर आता मीपण विसरल्या सारखंच करतो..."

सागरने मग पटकन आवरलं ..व आँफिसला जायला तयार झाला तशी नयनाही तयार होतीच ...रात्रीच विसरून जाऊ व आज नयनाला आँफिसला सोडू म्हणजे सारच ठिक होईल ...म्हणत तो म्हणाला,

"नयना तयार आहेस ना ?.."

त्याच वाक्य पुर्ण होण्याच्या आतच ती म्हणाली ,

"दिसत नाही का ???रेडी बसली ना ??मेघा येतेय न्यायला तीचीच वाट बघते मी ..".


सागर जरा हिरमुसलाच ,"अगं पण मी तुला सोडणार होतो कि ..."

"का??"

"असंच मला वाटलं सोडावं म्हणुन.."

"नको बाबा तुला खुपच काम असतात जा तू मी जाईल आपली ...माझी कशाला तुला अडचण.."

सागरला काय कळायचं ते कळलं...परवा नयना म्हणाली ,"
सागर जरा उशीर झाला सोडतोस का रे आँफिसला ..."

तर तो मानेने हो बोलला खरा ...पण हळुच कुजबुजला होता ,"माझी काय घाई व आणि इच मध्येच काहीतरी कामात अडचण नुसती .."

त्याने शांततेने टिफिन उचलला व निघून गेला ...पण नयनाचा तीर निशाणावर लागला होता ...

काय बर चुकलं होत तीच सकाळी उठून सासू सासरे न दोघांच आवरून जात होती आँफिसला ...सासुबाईंची थोडी मदत होत होती पण त्यादिवशी जरा ताप भरला होता मग झाला आवरतांना उशिर....ह्याने घरातली परिस्थिती समजून घेत जरा मदत करायची ना ???...सोडलं असत प्रेमाने तर तीलाही बर वाटलं असतं ना ???? ती करते का सरळ अस कोणाला नाराज ....वेळात वेळ काढुन घरातील सार्यांना खुश करतेच की ....तीच कर्तव्य चोख बजावते...पण बाईला कोण समजून घेणार हो ....ती जरा नाराजच होती ...तीला वाटत होत आईतरी बोलतील ,

"सागर नयनाला आँफिसला सोड म्हणुन .."

पण त्याही शांतच होत्या ..त्यामुळेच तर रात्री तीचा राग जरा पराकोटीलाच गेला व सागरशी भांडली होती ती ...तीच एकच म्हणणं होत मीही नोकरी करते ना ???मग तुही जरा मला समजून घे ना ???तुझ सारच तर करते तु कधीतरी माझ मन सांभाळल तर बिघडल कुठे ....मी काम करत उशीरा जातेच ना ?आँफिसला मग तुला एखादादिवस उशिर झाला मला आँफिसला सोडून तर बिघडलं कुठे ...पण सागरला ते चालणार नव्हतचं ...व हा वाद असा वाढला होता ...त्याला काही फरक नव्हता पडला पण ती शांत झाली होती ...

सागर आँफिसला आला तसा निना मँडम व किर्तीचेही ह्याच विषयावर संभाषन सुरू होत...ते सागरच्या कानी पडलं...

"काय आहे ना ?किर्ती माझी नवर्याकडून एकच अपेक्षा आहे गं ....कधीतरी त्याने माझं मन जाणुन घ्याव ...अचानक एखाद सरप्राईज द्याव ...कधीतरी अचानक पिच्चरची तिकिट हातावर ठेवावीत....जरा कुटुंब व मित्रांना विसरून एक बायको आहे हेही बघावं बस ..पण ते फक्त स्वप्नातच होईल बघ ..."

निना मँडम बोलल्या तशी किर्ती हसली व म्हणाली,"खरचं हो मँडम सगळे नवरे सारखेच बघा ....त्याचा परिवार सांभाळावा व त्यांच्या सर्व गरजा पुर्ण कराव्यात..त्यांच सार सुख आपल मानत झटावं पण ते बायकोच मन जाणुनच घेत नाहीत बघा ...फक्त अपेक्षा अपेक्षा ....व बायकोची उपेक्षा करतात कायमच.."

"हो गं..खरच ना ..!"

म्हणत दोघीही हसल्यात .सागरने दोघींकडे नजर फिरवली तशा दोघी म्हणाल्यात,


,"सर...तुम्ही घेत असाल मँडमची काळजी तुम्ही नाहीत हं ....!    ...लिस्ट मध्ये.."

सागर जरा गोधळला मानेनेच होकार दिला व चटकन डोक्यात विचार आला ...आज नयनाला सरप्राईज द्यायचं....काही झाल तरी जेवायला बाहेर जायचं म्हणजे जायचं....दोघांना वेळ मिळेल व तीचा राग जाईल ...

त्याने पटपट काम आवरलीत ...घरी पोहचला तर नयना कामात होती ...त्याने पटकन आवरलं व नयनाला म्हणाला,

"नयना स्वयंपाक फक्त आई बाबांचाच कर व झाला नसेल तर असू देत मी बाहेरून मागवतो त्यांना ...तु तयार हो ...आपण आज बाहेर जातोय..."

नयना सागरकडे मोठे डोळे करुन बघू लागली ...सागरला कळेच ना काय?चुकलं त्याच ....आता बाहेर नेतो ना??मग आनंदाने हसायचं व तयार व्हायचं ना ??तर माझ्याकडे किती रागाने बघते ...हिम्मत करून तो परत बोलला

,"काय गं...माझं काही चुकलं का?...तुला बर वाटाव म्हणुनच करतोय ना ??मी .."

"अरे पण परिस्थिती काय???आईंना आजच जरा बर वाटत त्यांना सोडून जायचं बाहेर ...मुलगा ना तु त्यांचा साध काही कळतं नाही का??रे तुला ...स्वयंपाक व्हायचा अजुन ...पण आजारी माणसाला बाहेरच देणं योग्य आहे का???आणि अस अचानक काय रे पुळका आला माझा ....कोणत्या खुशीत नेतोस मला बाहेर....जा तुझी काम कर मी जेवण बनवते ...नाही जायचं बाहेर... फक्त आईंना हा काढा नेऊन दे बस.."

सागरचा चेहेराच पडला ...तो मनाशीच म्हणाला "देवा कशी रे बनवलीस तु बाई....कधी काय चालेल तीच्या मनात याचा ठावचं लागत नाही बघं...खरच अवघड आहे बाबा तुझी निर्मिती....पण तीला बर रे सारच समजत ...मन वाचणं जमत बाबा ...कधीतरी पुरुषाचाही विचार कर रे..."

तोच आतून आवाज आला

"सागर ...हा काढा नेऊन दे आईला .."


(खरचं बाईला समजून घेण अवघड आहे का?तर पुरूषांच्या नजरेत होच असेल हं...!...पण तस नसतं हो ...बाईला समजून घेण सोपंच असत बघा ...लहान लहान गोष्टीत आनंद शोधणारी असते ती बाई हं..!...थोडाश्या कौतुकाने भारावून जाणारी ...परिवारासाठी जीव देणारी ...कर्तव्यात वाहुन घेणारी असते स्त्री ...कुठेच कमतरता राहु नये याची दक्षता घेते ती स्त्री ...मग तीच मन वाचणं तीला आनंदी ठेवणं परिवाराच काम नाही का ??फक्त हिच एक रास्त अपेक्षा असते ना?तीची ...तेवढ तर करू शकतो ना आपण ....

काय ?मग कराल ना ?तीला समजून घेण्याचा प्रयत्न....


©®वैशाली देवरे

टिमच नाव -नाशिक इरा

लघुकथा- स्ञी ला समजून घेण खरचं अवघड असत का?