फिजी मध्ये कोरोना?? (Part 3)

How fiji country tackled with corona viruse nd become corona virus free is mentioned in this blog.



सुरुवातीला काही दिवस फिजी मध्ये करोना व्हायरस नव्हता पण अचानक news आली की एक flight attendant हा कोरोना पॉसिटीव्ह निघाला आणि लगेचच पूर्ण फिजी हे lockdown करण्यात आलं.

त्याचमुळे नवरोबाही लवकर घरी आले. काही grossery आणायची आहे का विचारत होते. पण सगळी grossery होती घरात मग काही बाहेर जाण नाही झाल.

तसा फिजी हा फार मोठा देश नाही आहे.फिजी ची लोकसंख्या जवळपास 9 लाख एवढी आहे. कितीदिवस लोकडाऊन राहणार. किती जण अजून पॉसिटीव्ह सापडणार. कोण होता तो flight attendant. अशी सगळी माहिती गोळा करन चालू झाल. मग दुसऱ्या दिवशी अजून एक कोरोना पॉसिटीव्ह व्यक्ती सापडली.. ती होती त्या flight attendant ची आई. मग त्याची भाची अस 1-1 करत दोन वीक मध्ये 16 कोरोना पॉसिटीव्ह सापडले.

दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या flight attendant च्या flight मधील सगळे लोक आणि त्याच्या फॅमिली मेंबर्स आणि तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलेला त्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.
हे सगळ करणं सोपं नव्हतं कारण ती लोक घाबरली असल्यामुळे स्वतःहून समोर येईना आणि त्यांना सगळ्यांची टेस्ट होणं खूप इम्पॉर्टन्ट होत नाहीतर अजून इन्फेकशन पसरले असत. म्हणून त्यांची नाव फेसबुक, न्यूज वर दाखवण्यात आली सो जी लोक त्यांना ओळखता ती सावध होतील. आणि ही ट्रिक कामी आली आणि मग सगळ्यांची टेस्ट झाली


तो flight attendant ज्या सिटी मध्ये होता त्या सिटी ची boundry लॉक करण्यात आली. तो आमच्याच सिटी मध्ये होता त्या सिटी मधल्या सगळ्या लोकांच्या घरी जाऊन मेडिकल टीम ने त्यांचे temrature चेक केल आणि काही कोरोना symtoms आहे का याची विचारपूस केली.

ग्रोसरी शॉप्स सोडून सगळंच बंद होत. आणि रात्री 8 ते साकाळी 5 पर्यंत curfue लावण्यात आला. Flights बंद करण्यात आल्या. Cruise ships बंद करण्यात आल्या.

तिसऱ्या आठवड्यामध्ये मध्ये भारता मधुन 2 आलेली लोक कोरोना पॉसिटीव्ह सापडली .अस साधारण 2 आठवडे फिजी ला लोकडाऊन होत आणि 3ऱ्या आठवड्यात नाताळ असल्यामुळे त्या आठवडयामध्ये ही सगळ बंद होत.

त्यानंतर almost 7-8 वीक एकही कोरोना पॉसिटीव्ह व्यक्ती सापडला नाही. आणि जी 18 लोक कोरोना पॉसिटीव्ह होती ती सगळी रिकव्हर झाली. लास्ट पर्सन 8 जुन ला रिकव्हर झाला आणि आता फिजी कोरोना मुक्त झाला.
पण अजूनही schools, children parks, beaches,movie theaters, social gathring, flights , cruises बंद आहेत. सगळ्या परिसरांमध्ये लावलेले fever tent तसेच आहे. काही हॉटेल्स चालू झालीय पण फक्त दिवसा... !!!

फिजीचे primary source of income हे tourism असल्यामुळे फिजीला कोरोनाचा चांगलाच आर्थिक धक्का बसलाय.

आता दुसऱ्या देशांमध्ये अडकलेली फिजी मधील लोक फिजीमध्ये आणत आहे.. पण त्यांना 14 दिवस qurntine ठेवण्यात येत आहे.. त्यामध्ये इंडिया मधून आलेली 6 लोक ही कोरोना पॉसिटीव्ह निघालीय, त्यांच्यावर आता उपचार चालू आहे.

🎭 Series Post

View all