** ईर्षा**

Stri Ek N Sutnare Kode


** ईर्षा**

अमिता आणि अजय लग्न होऊन दोन वर्ष होत आली होती.त्यांच्या लग्नातला नवखेपणा अजून कमी झाला नव्हता. हिंडणे फिरणे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे,दोघांचीही आवड निवड ,विचार सरणी सारखी असल्याने काही अडचणी येत नव्हत्या.दोघेही छान शिकलेले, एकाच प्रोफेशन मधली आणि दिसायलाही एकमेकांना समरूप,साजेशी जोडी होती.नॉर्मली सगळ्या स्त्रियांमध्ये असतो तसा काईंड नेस अमिता मध्ये ही होताच.म्हणतात ना कायिंडनेस मेक्स यु मोर ब्युटीफूल. अजयलाही तिचा हा स्वभाव आवडायचा म्हणून त्याने कधीही तिला असे का ?तसे का?हटकले तर नाहीच,उलट सपोर्टच केला.
अशीच एक सुट्टी बघून दोघे एका मंदिराला दर्शनासाठी गेले होते,मंदिराचा परिसर निसर्ग रम्य होता. येणारे जाणारे थोडा वेळ बसू शकतील अशी व्यवस्थाही होती.मंदिराच्या आत जातानाच तिथे बसलेल्या एका आज्जी बाई वर अमिताची नजर गेली,आज्जी बाई शांतपणे एकटीच बसली होती. आमिताला तिचा चेहरा एकदम तेजस्वी वाटला होता,आज्जी बाई चे अंगावर असणाऱ्या असंख्य सुरकुत्या तिच्या तेजस्वी रंगाला मॅच करत होत्या.सुंदर सरळ नाक,तिला या वयामध्ये ही उठावदार वाटत होते.आज्जी बाई कडे बघून आमिता मधला कायिंडणेस जागा झाला होता.
मंदिरा मधून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिने सगळ्यात पहिला विषय काढलाच अजयकडे.अजयला ही गोष्ट नवीन नव्हतीच,पण आमिताला नाराज नको करायला म्हणून तो तिने बोललेली प्रत्येक करायचा,आणि आमिताने सांगितले की,आपण त्या आज्जी बाई सोबत थोडेसे बोलूया,तिला काहीतरी खायला पण देऊया.अजय ने त्याप्रमाणे च केले,मंदिराच्या बाहेरुन थोडासा खाऊ आणून,थोडेसे पैसेही घेऊन ते आज्जी बाई जवळ गेले,आज्जी बाई लाही समजले की,त्या दोघांना तिच्याशी बोलायचे आहे,तिनेही डोके वर केले त्यांच्या कडे बघितलं आणि त्यांची व आज्जी बाई ची नजरा नजर झाली,मग दोघे आणखीन थोडे खाली वाकून,आज्जी बाई ला म्हणाले ,"आज्जी ,हा घ्या खाऊ,अन् हे पैसे पण राहू देत,काही खावेसे वाटले तर घ्या नक्की".
अजयचे बोलून झालं होतं,पण आमिता ला एव्हढे बस नव्हते ,म्हणाली अजय आपण आज्जी बाईंचा आशीर्वाद घेऊया ना? आमिताने तस् बोलल्यावर दोघेही अजून थोडे खाली वाकले,आणि "आज्जी,आशीर्वाद द्या ."अजय म्हणाला...... !!

आत्ता मात्र आज्जी बाई ने निरखून दोघां कडेबघितले.थोडासा विचार करून हसली,अन् म्हणाली, बरें बाबा, तुला दोन बायका मिळू देत.\"
असे अनपेक्षित उत्तर ऐकून आमीता तर चांगलीच भेदरली होती.आन अजय ही थोडासा खुलला होता, त्याने हसायला सुरवात केली होती. आमि ताला आता काय बोलावे ते सुचेना झालं होतं.तिच्या कायिंडनेस ने तिला धोखा दिल्यासारखे वाटायला लागले होते.
मंदिराच्या आत शिरताना दया वाटावी अशी आज्जी बाई तिला आता एखाद्या जक्खड म्हातारी सारखी वाटत होती,तिच्या अंगावरच्या सुरकुत्या आता किळस वाण्या वाटत होत्या,सुंदर उठावदार नाक तिला, गोष्टीतल्या चेतकिनी सारखे वाटत होते,तिचे खुदकन हसणे एकदम बेढब वाटत होते.
ह्या सगळ्या घटने मध्ये अजय ची काहीच चूक न व्हती.तो अजूनही नॉर्मल होता. आमिताने सांगितले ल्या गोष्टी तो करत गेला होता.त्यामुळे ती त्याला काही बोलूही शकत नव्हती.
आता ती स्वतःशीच बोलायला लागली ,मनातल्या मनात.खरंच माझे काही चुकतंय का? माझ्या स्वभाव बदलायला पाहिजे का? माझे कायींडणेस वाले विचार समाजाला सोसत नाहीत का? म्हातारीने असा आशीर्वाद का दिला? तिने माझा विचार केला नसेल का? का अजयला बरे वाटावे म्हणून बोलली असेल? तो नक्की आशीर्वाद च होता का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत राहिले,त्यांची उत्तरे मात्र आता आपण शोधायची आहेत.......
मैत्रिणींनो,अशा छोट्याश्या घटना आयुष्यात घडतच असतात,पण त्याचेपरिणाम मात्र कधी कधी खूप वाईट होतात आपल्या मनावर.
आपण पाहतो,वाचतो की,आज पर्यंत स्त्री पुरुष समानतेच्या लढाया स्त्रियांनी अगदी नेटाने लढल्या आहेत.मोठं मोठ्या विद्वान स्त्री यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य यासाठी पणाला लावले आहे.पण खरंच त्यांची लढाई यशस्वी का होत नाही,स्त्री पुरुष समानतेच्या हक्का साठी पिढ्यान् पिढ्या युगान युगे लोटली आहेत.पण त्या बरोबरच स्त्री याची मानसिकता बदललेली दिसत नाही आजही.एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला ओळखू शकते, हे फक्त बोळण्यापूर्तेच नको आहे.तर स्त्रियांमध्ये असणारे वैचारिक दृष्टिकोन बदलून,वैचारिक आणि इतरही समानता येणे देखील गरजेचे आहे.आणि ही प्रत्येक स्त्री ची जबाबदारी आहे.प्रत्येक स्त्रिच्या आत्म सन्मान साठी.!!!- सुशमा