आपल्या समाजाची विडंबना.

Again brutal rape on a girl.

पुन्हा एका कोवळ्या मुलीवर बलात्कार.

कोण आहे हे लोक, कुठुन येतात हे लोक, कशे हे लोक इतके जनावरां सारखं वागु शकतात. जेव्हा आपण म्हणतो कि खरी शिक्षा ही घरा पासूनच सुरु होते तर कोणते पालक आपल्या मुलांना असा अघोरीपणा करायला शिकवत असतील? ह्यांच्या कडे हृदय आणि डोकं नावाची वस्तु असते का नाही? कारण एखाद्या मुलीवर इतका अमानुष पणा दाखवताना, त्यांचं हृदय कसं द्रवीत नाही होत, शिवाय डोक्यावर सुद्धा काही नियंत्रण कसं नाही रहात?त्यांच्या अश्या वागणुकी साठी कोण जबाबदार आहे, हा समाज, कुटुंबं, सिनेमा, का अशिक्षा?

          प्रश्न तर अनेक आहे आणि त्यांचे उत्तरं सुद्धा अनेक आहे.

बस आता काय, आणखी काही दिवस ह्या प्रश्न आणि उत्तरांचा कार्यक्रम असाच चालत राहणार, सगळ्यांसाठीच हा विषय अगदी गहन चर्चेचा विषय होणार, मोमबत्त्या जाळून जुलूस काढले जाणार, तथाकथित समाजसेवक कोपर्या कोपर्यातूनं निघून येणार आणि पिडित मुली साठी न्याय मिळावा ह्याची मागणी करणार. न्यूज चॅनल वाल्यां साठी तर ही आनंदाचीच गोष्ट ठरणार, मग काय प्रत्येक न्यूज चॅनल वर सभ्यतेच्या सगळ्या हदी पार करून चर्चांचे दौर सुरू होणार आणि ह्या चर्चां मध्ये सारेच आपला फायदा बघणार. कोणी आपली टी आर पी कशी वाढेल ह्या कडे डोळा ठेवून राहिलं तर कोणी आपली राजनिती कशी चमकू शकते ह्या कडे लक्षं केंद्रीत करेल. आणि त्या मुलीची आणि तिच्या कुटुंबाची उरलीसुरली अब्रु सुद्धा निर्लज्जपणे चव्हाट्यावर आणणारं.

पोलिस वर्षानुवर्ष बलात्काराची किंवा बलात्कार करून हत्या केल्यागेल्याची साक्ष आणि साक्षीदार शोधत राहतील.कारण आपला कायदाच तसा म्हणतो. आणि तो पर्यंत पीडित आणि पडितेचा परिवार कितीतरी शिक्षा भोगून चुकले असतील. आणि गुन्हा सिद्ध होईस्तोवर आरोपी जमानती वर, निर्लज्जा सारखे बिंदास बाहेर फिरतील .कारण त्यांना ही आपल्या कायद्या चे लूप होल माहितच असणार कि नाही.आणि त्यांना बघुन आणखी लोकांना सुद्धा असलं काही करायची प्रेरणा मिळणार.

           असं काही अइकलं कि आपल्या सगळ्यांच्या तळ पायाची आग मस्तकात जाते. आपण सगळेच दात ओठ खात बलात्कारीला शिव्या गाळ्या करत बसतो. ते साहजिकच आहे म्हणा, कारण अश्या घटनांनी ज्याचं रक्त नाही उसळणार तो माणुसच कसा.

         पण आपण न्याय मिळावा म्हणुन मोमबत्त्या, जुलूस आणि आंदोलनं कराय पेक्षा, जर कायद्यात बदल व्हावा हेच्या साठी आपली लढाई लढली तर? म्हणजे आपण सगळे मिळून लढुया ते बलात्कार्याला, लवकरात लवकर कठोर पेक्षा कठोर सजा मिळावी म्हणून आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला कि कोणतीच सोहलत नाही का मोहलत नाही. फक्त शिक्षा.आणि शिक्षा पण अशी तशी नाही इतकी कठोर आणि वाईट की असलं काही करायचं तर दूर, मनात विचारही आणताना कोणाचे हातपाय थंडे पडायला पाहिजे.तरचं असलल्या घृणास्पद अपराधांच प्रमाण कमी होणार.

            पण बघा, ज्या समाजात, असल्या अमानवीय आणि घृणास्पद कृत्य केलेल्या आणि त्यावर आरोप सुद्धा सिद्ध झालेलं असेल अश्या आरोपी ला सुद्धा, सहजच वकील भेटतात, आणि समजा जर त्याच्यावर आरोप सिद्ध होऊन कठोर शिक्षा देण्यातही आली तर त्याच्या सजा माफी किंवा सजा कमी ह्वावी ह्या करता लढणारे तथाकथित समाजसेवकही आरामात मिळून जातात, (जे आधी पिडित ला न्याय मिळावा म्हणून उत्सुक असतात) त्या समाजाशी तुम्ही आणखी काय होप ठेवूं शकतात.  हीच तर खरी विडंबना आहे आपल्या समाजाची.

रेणुका राजे