ईरावरील अभिवाचन : मधुर आवाजाची मेजवानी

ईरा : लेखणीचा नवा सूर्योदय

ईरावरील अभिवाचन : मधुर आवाजाची मेजवानी 

     ईरा व्यासपीठ ज्या प्रेरणादायी विचांरांनी उदयास आले त्याचे प्रत्यंतर सध्या प्रत्येक गोष्टीत जाणवू लागले आहे.लेखकांचे लिखाण जेंव्हा एका विशिष्ट चाकोरीतून जात असते तेंव्हा वाचकही त्याप्रमाणेच विचार करत असतात पण याच लिखाणाला वेगवेगळ्या शैलीत गुंफूण कलात्मक कलाटणी मिळते त्यावेळी वाचक आनंदाने बागडू लागतो हेच विहंगम दृश्य ईरावर स्पष्टपणे दिसत आहे आणि या आवडीने बराच वाचकवर्ग आकृष्ट  होवून डोकावून पहात आहे.या सर्वाची छान केमिस्ट्री आदरणीय संजना मॕडम व योगिता मॕडम यांनी हाताळली आहे.
   ईरावर दर्जेदार कथांचा सुकाळ आहे.कथेमध्ये वाचक इतका गुंतला आहे  की त्याला  ईरावरील कथेशिवाय चैनच पडत नाही.लेखकांना नवचेतना देण्यासाठी ईरा विविध स्पर्धा भरविते.स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळतो व वाचकांना नवनव्या कथा वाचायला मिळतात.एकापेक्षा एक सरस कथेमुळे वाचक उत्साही रहातो.

     लेखक हा सतत कांहीना कांहीतरी प्रयोग करीत असतो.कथेतील पात्रांची जुळवाजुळव , नात्यांची गुंफण , छान सुरवात , मध्यंतर खिळवून ठेवणारा व शेवट रोमहर्षक अशा प्रक्रियेतून कथा जन्माला येत असते प्रत्येकवेळी वाचकांना  नवीन देण्याचा  लेखकांचा प्रयत्न असतो.आपल्या कथा , कविता यांचे लेखन भरपूर झाले आहे याची लेखकांना जाणिव असते पण याच कथेंचे जर अभिवाचन केले तर वाचकांना याचा खराखुरा आनंद घेता येईल व वाचक यामुळे प्रेरित होईल हिच युक्ती ईरावरील प्रतीभावंत लेखक , लेखिकांनी अमलात आणून वाचकांच्यात जोश आणला आहे.ईराच्या फेसबुक पेजवर हे अभिवाचन ऐकायला मिळते.याची सुरवात आदरणीय लेखिका प्रियांका अभिनंदन  पाटील यांची  लघूकथा " तू विधवा आहे ", आदरणीय लेखिका निशा थोरे यांचा लेख " मी तुझी पणती , आदरणीय लेखिका मेघा अमोल यांचा लेख " वेळ दे तिला व आदरणीय लेखक सारंग चव्हाण यांची कविता , शिवबाराज बघताय नव्हं.." या सर्वांचे अभिवाचन वाचकांना मनापासून आवडले.स्पष्ट उच्चार , आवाजातील चढउतार , मधुर आवाज , वाचण्याची लकब यामुळे या सर्वांचे उत्तम सादरीकरण झाले आहे.आपल्याच कथा आपल्या आवाजात ऐकवून वाचकांना या लेखकांनी सुखद धक्का दिला आहे.याची सर्व लेखकांनी दखल घेऊन अभिवाचन केल्यास स्वतःला वेगळा आनंद प्राप्त होईल व आपल्याच लिखाणाला स्फूर्ती येईल .ईरा टीमनेही याबाबत लेखक व वाचकांना प्रोत्साहित करावे , बदल म्हणून अभिवाचन स्पर्धेचेही आयोजन करावे त्यामुळे ईरा , लेखक व वाचक यांचे नाते आधिक सदृढ होईल.

      ©®नामदेवपाटील