ईराला गवसलेल्या नव संपादीका : निशा थोरे

ईरा : शब्दांना पडलेले गोड स्वप्न

ईराला गवसलेल्या नव संपादीका :  निशा थोरे 


         लेखानकलेने चौखुर उधळलेले ईरा व्यासपीठ वाचकांची मने काबीज करत आहे.एका छोट्याशा रोपट्याचे रुपांतर आता विशाल वटवृक्षात झाले आहे.आदरणीय संजना मॕडम व योगिता मॕडम यांचा सकारात्मक दृष्टीकोन ईराला लेखकांची मने जिंकण्यास उपयुक्त ठरत आहे.लेखकांचे साहित्य ईथे मोकळ्या मनाने प्रदर्शीत होत आहे.लेखक , वाचक ईराच्या या सर्व गोष्टींचा आनंद मनमुराद घेत आहेत हे इतके हर्षभरीत वाटते आहे की , ईरा एकविसाव्या शतकातील नवे पर्व म्हणून उदयास येत आहे.

     ईराचे सर्व स्तरातील नाविन्य पूर्णत्वास आले आहे. एका गोष्टीची कमतरता मात्र सतत जाणवत होती ती म्हणजे " ईराचा दिवाळी अंक "  गेल्या वर्षी  ही संकल्पना मांडली पण घाईगडबडीत ते शक्य झाले नाही पण यावर्षी ईराचा लेखकांच्या व्हाटस्अप ग्रुपवर श्री सारंग सरांनी याची आठवण काढली आणि ईराच्या दिवाळी अंकाची चर्चा सुरु झाली. दिवाळी तोंडावर आली होती. दिवाळी अंक घाईने तयार करणे शक्य नव्हते पण सर्व लेखकांनी उत्फुर्त पाठिंबा दिल्यामुळे दिवाळी अंक तयार करण्याचे ठरले. कमी वेळात हार्ड कॉपी मिळणे अवघडच होते पण ई स्वरुपातील अंक करायचे ठरले.

    ईराच्या संस्थापिका सौ. संजना मॕडम  यांनी दिवाळी अंकाचे साहित्य गोळा करण्यास लेखकापैकी कोण उत्सुक असल्यास सांगा असे ठरले.क्षणाचाही विलंब न करता आदरणीय निशा थोरे मॕडमनी याला संमती दिली..!

प्रारंभ व्हावा दिलखुलास 
यश मिळते हमखास 

   आवडीच्या विषयावर लेखांची विभागणी झाली. सर्व लेखकांचे लेख पटापट येवू लागले.लेखांची वर्गवारी करणे,दिलेल्या मेलवर साहित्य पाठवण्यास सांगणे , लेखामधिल चुका दुरुस्त करणे, साहित्य लवकर पाठवण्यास सांगणे ही जबाबदारी इतक्या तन्मयतेने व लिलया निशा मॕडम  यांनी केली.अॉफीस सांभाळून या गोष्टी करताना कधीही कंटाळा केला नाही.सर्वांंना प्रोत्साहन देत हसतमुखाने हे काम केले आहे.एक लेखिका म्हणून कार्य करताना तपशीलवार माहिती गोळा करण्याचे कसब अप्रतिम आहे.नेहमी सकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेक लेखिकांचे मित्रत्वाचे जाळे विणले आहे ...!! 

   निशा मॕडम यांच्या अथक  प्रयत्नातुन व लेखकमंडळीच्या दर्जेदार लिखाणामुळे ईराचा पहिला ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.राधिका कुलकर्णी , अस्मिता चौगुले , सिद्धी भुरके ,शुभांगी मस्के,कीर्ती वेंगुर्लेकर , कविता सुरासे,अवनी गोखले , ज्योती उरकडे , गीता उगाडे , गीता गरुड ,  सुप्रिया जाधव  प्रीती दळवी  गौरी हर्षल , अमित मेढेकर , राहूल चिंचोळीकर , सारंग चव्हाण  ईरावरील आशा अनेक लेखकांनी निशा मॕडम यांना मदतीचा हात दिला .त्यामुळे वाचक या अंकास भरपूर प्रतिसाद देत आहेत.निशा मॕडम यांची मेहनत संजना मॕडम व योगिता मॕडम यांची सहकार्यवृत्ती व ईरा टिमचे बहुमोल कार्य यामुळेच हा अंक वाचकांना रुचकर लेखणाची मेजवानी ठरणार आहे ..!! या सर्वांना हे शब्दांचे  सुंदर शिल्प निर्माण केल्याबद्दल  मनःपुर्वक शुभेच्छा ..निशा मॕडम  यांच्या बहारदार लेखणीस   व नवे करण्याचा ध्यास असलेल्या मनोवृत्तीस सलाम व पुढील वाटचालीस शुभेच्छा ..!!

    ©®नामदेवपाटील ✍️