ईराच्या लाईव्हशोला भरभरुन प्रतिसाद
ईराच्या उत्कंठावर्धक उपक्रमाने वाचक व लेखकवर्ग मंत्रमुग्ध
एखादे व्यासपिठ उभारता प्रचंड कष्ट लागते पण त्या कष्टाला जेंव्हा यशाची झालर लागते तेंव्हा झालेला आनंद अवर्णणीय असतो .आदरणीय संजना मॕडम यांनी जिद्दीने या व्यासपिठाचा भार सांभाळताना लेखक व वाचक यांच्या साहित्याला नवा मार्ग दाखवला आहे .आदरणीय योगिता मॕडम यांनी हा धावफलक हालता ठेवताना ईराला नवसंजीवनी दिली आहे .. नव्या बदलासह ईरा व्यासपिठ आता एकविसाव्या शतकाकडे झेप घेत आहे .
ईरा व्यासपिठावर लेखकवर्ग भरभरुन लिहीत आहे . दर्जात्मक लिखाण व लेखनाचे विविध पैलू हाताळताना ईथला लेखकवर्ग वाचकांना मनमुराद शब्दांचा खजिना बहाल करत आहे .ईराचा वाचकवर्ग आवडीनिवडीने बहरलेला आहे .लेखकांच्या कथेना मनःपुर्वक दाद देताना चांगल्या प्रतीक्रियेद्वारे त्यांचे मनोबल वाढण्याबरोबरच सातत्याने त्यांंना प्रोत्साहित करत आहे .
ईरा लेखनाविषयी सर्व बाजू सांभाळताना वाचकांशी व लेखकांशी संवाद साधण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे . या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ईरा म्हणजे काय ... ईराचा मानस व ईराबद्दल असलेली जिज्ञासा आदरणीय संजना इंगळे यांनी विषद करताना ईराचे सर्व मनसुबे व्यक्त केले त्यामुळे ईराबद्दल असलेली सर्व माहीती सर्वांना मिळाली.प्रथमदर्शनी ईराचे दर्शन होताच वाचकवर्ग व लेखाकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.ईरावरील कथा ह्या दर्जेदार व वाचनीय असतात हे असंख्य वाचकांच्या पसंतीतीतुन समजते.
ईरावरील अनेक रोमँटीक कथा ह्या
वाचकांच्या मनाचा ठाव घेतात .अनेक कथांचे पन्नास ते सत्तर भागाकडे मजल मारली आहे या लेखकांचे लेखन उत्तरोत्तर बहरत आहे .अशा कथांवर प्रश्न विचारुन वाचक कथेत किती रमला आहे हे या लाईव्ह शोचे मुख्य आकर्षण होते.वाचकांनीही उत्तरे देउन आपली समरसता दाखविली .ईराचा हा पहिलाच लाईव्ह शो असल्यामुळे सर्वांनी भरभभरुन प्रतीसाद दिला .
माध्यमांच्यात अनेक बदल घडत आहेत त्यादृष्टीने ईरा अग्रेसर आहे. नव्या बदलामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत.लेखकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.वेगवेगळ्या स्पर्धाना महत्वपूर्ण दाद दिल्यामुळे रंगतदार स्पर्धा पाहायला मिळते.निकालात पारदर्शकता असल्यामुळे लेखकांचा विश्वास दुनावला आहे.अमित मेढेकर सरांचा लाईव्ह शो म्हणजे विचांराची पर्वणीच असते.मधाळ भाषा, सकारात्मक विचार,मुद्देसुद मांडणी व विधायक दूरदृष्टीता असल्यामुळे त्यांंचा लाईव्ह शोचे आयोजन हे ईरा व्यासपिठाचे चतुरस्र नियोजनाचे फलीत आहे.
,कदाचित वाचकांच्या व लेखकांच्या आणखिन कांही अपेक्षा किंवा बदल असतील तर ते त्यांनी सुचवावे.स्पर्धां तर ईरा घेतच आहे त्याबरोबर लघुकथेचे आयोजन करुन त्यातील विजयी लेखकांचे लाईव्ह शोचे आयोजन करावे. ईरावरील वाचक हा ईराचा मुख्य गाभा आहे सतत क्रियाशील असणाऱ्या वाचकांनाही लाईव्ह शोमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे लेखक,वाचक व ईरा व्यासपिठ यांचे सबंध अधिक सदृढ होतील.
लाईव्ह शोचे आयोजनाबद्ल आदरणीय संजना मॕडम व या व्यासपिठाचा मोठ्या हिमतीने डोलारा सांभाळणा-या आदरणीय योगिता मॕडम यांचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...!!
ईरा : शब्दांचा सुखद प्रवास
©®नामदेवपाटील