ईरा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Iraa Tula Vadhdivsachya


ईरा तू मी आणि आपला हा प्रवास खूप नवा आहे तसा तो जणू खूप पूर्वीपासून आहे असे वाटते. नाते जरी नवे असले तरी का माहीत नाही ते खूप जुने आहे असे वाटते.. आईच्या कुशीत येऊन पिल्लू जसे आपल्या मनातले सगळे आपसूकच बोलून लागते तसेच त्याला बोलता येऊ वा, ना येवो ती आई आपल्या बाळाचे बोल समजूनच घेत असते आणि चुकले की ती त्याला पुन्हा बोलायला शिकवते आणि मग तो हळूहळू आईचे बोल बोलायला शिकतो तसेच काही से तुझे नी माझे नाते आहे ग "ईरा" तुला अग तुग करण्याची कसलीच भीती आता वाटत नाही ,तशी भीती आता मनात उरलीच नाही. तू किती सहजतेने मला सावरले ,किती चुका तू सांभाळून घेतल्या आहेस..आणि मी चुकत सावरत हळूहळू शिकत गेले..

आज ह्या ईरा ला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.. शब्द नाहीत पण मनात खूप भाव दाटून आले आहेत


ईरा हा वटवृक्ष आहेच पण ईरा ही लांबच्या प्रवासाला निघालेली मोठी नाव आहे, सोबत किती तरी नव नवे प्रवासी लेखक घेऊन मोठ्या प्रवाहात ती प्रवास करणार आहे..तिला अजून ही खूप टप्पे गाठायचे आहे..अजून खूप सोहळे साजरे करायचे आहे..त्याचे साक्षी सगळे लेखक सगळे वाचक आणि खुद्द ह्या नावेला चालवणाऱ्या आपल्या कॅप्टन संजना मॅडम ही आपल्याला ह्या मार्गावर घेऊन जाणार आहे, त्यांना साथ देत असलेल्या योगिता मॅडम यांचा ही ह्या नावेला पुढे घेऊन इथपर्यंत आणण्यात आणि पुढील प्रवासात पुढे घेऊन जाण्यात खूप मोठा वाटा आहे..

आपण ईरा प्रेमी,आता जणू एक परिवार अपेक्षा करूया की ह्या नावेत आलेले प्रवासी हे येत राहतील पण मध्येच कोणी हा प्रवास अपूर्ण ठेवणार नाही.. कारण आपल्या सर्वांना हा प्रवास सुखकर करायचा आहे त्यात आपल्या लेखनाने सर्वांना अपरिमित आंनद द्यायचा आहे. आपल्या ह्या ध्येयाने कोणाला तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुख द्यायचे तर आहेच पण त्यांच्या विचारांत बदल घडवून त्यांच्या विचारांना चालना द्यायची हा निरस हेतू आहे .

माझ्यासाठी हे तीन वर्षे जणू मी कुंडीत लावलेल्या गुलाबी जास्वंदीला आलेले तीन गोड गुलाबी जास्वंद,ज्या जास्वंदीला रोज थोडे थोडे पाणी,काळजी आणि प्रेमाने जोपासले आणि त्या छोट्या जास्वंदीला आज तीन टवटवीत सुंदर मोहक जस्वानंद भरून यावे आणि मन ही प्रसन्न करून जावे तसेच काहीसे ईरा बाबत होत आहे..
हा ऋणानुबंध कायमस्वरूपी असाच बहरत जावा...

संजना मॅडम यांनी तीन वर्षा पूर्वी लावलेल्या ह्या वटवृक्षाच्याच्या हया झाडाच्या सावलीत कोणी ही वाटसरू थकून आल्यावर त्याला ही ह्या सावलीत विसावा मिळावा ,तो ही तृप्त होऊन जावा..आणि त्याची ख्याती सर्वदूर पसरावी, त्याचे पाये मुळे घट्ट रोवले जावे ..हीच मनस्वी प्रार्थना ?

ईराला आज तिच्या तिसऱ्या जन्म दिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा ,असाच सतत बहरत राहो, असाच फुलत जाओ ,असाच एक विसावा आमच्यासाठी कायम राहो..येणाऱ्या पिढीसाठी एक वारसा आपल्या सर्वांकडून पुढे जाओ..