इरा नारीवादी लेखन स्पर्धा..एक प्रवास

एक सुंदर आणि समृध्द करणारा अनुभव.

इरा नारीवादी लेखन स्पर्धा एक समृद्ध करणारा प्रवास.

सोशल मीडियावर माझी लेखक म्हणून ओळख झाली ती इरा व्यासीठावरून.सुरुवातीला वर्षभर जास्त लिखाण होत नव्हते.त्यानंतर कथामालिका सुरू केल्या.तरी फार काही नव्हते.नंतर इरा लेखक ग्रुप जॉईन केला.ह्या मैफिलीत निशा मॅम,सारंग सर,मयुरेश सर,सारिका मॅम असे लेखक मित्र लाभले.

त्याचवेळी इरा वर दीर्घकथा स्पर्धा जाहीर झाली.आपण लिहावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होती. इकडे जोरदार चर्चा आणि स्पर्धेची कथा कशी हवी?नाव काय?सगळे सुरू होते.तीन दिवसांनी एक भाग द्यायचा होता.कमीत कमी चाळीस भाग लिहायचे होते.

नारीवादी लिहायचे म्हणजे संघर्षातून घडवलेले करिअर,सासरचा अन्याय,वगैरे असेच साधारण वाटत असते.मला मात्र काहीतरी वेगळे लिहायचे होते.अचानक विषय सुचला.शिवरायांच्या काळातील काल्पनिक कथा लिहायचे ठरवले.मानिनी लिहायला घेतली.पण जमते आहे का?काहीच कळत नव्हते.नऊ भाग झाले होते आणि अचानक सारंग सरांनी प्रतिक्रिया दिली.आजचा भाग खास झाला.तिथून आत्मविश्वास आला.स्पर्धेत अनेक लोकप्रिय कथा होत्या.सीमंतिनी आणि समर्थांची लेक तर मला प्रचंड आवडल्या.
बघता बघता त्रेचाळीस भाग झाले. सुंदरा, हैबती, दौलत,मोहना सगळी पात्र आजही माझ्यासाठी खास आहेत.त्यानंतर निकाल जाहीर झाला.मी मानिनी,मी मर्दिनी साठी तृतीय पारितोषिक मिळाले.त्या दिवशी असलेली फिलिंग शब्दात सांगू शकत नाही.

ह्या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन करणारी इरा प्रशासकीय टीम,संजना मॅम,योगिता मॅम,मैफिल वरचे लेखक आणि माझ्या इरा कॅप्टन ग्रुपचे खास आभार.इरा कॅप्टन ग्रूपमध्ये वेळोवेळी चर्चा आणि प्रोत्साहन मिळत गेले.त्यामुळे लेखक म्हणून सुरू झालेला हा प्रवास अधिकाधिक समृध्द होत आहे.होत राहील.

आपला सर्वांचा लेखक मित्र
प्रशांत कुंजीर