Login

ईरा म्हणजे संजना इंगळे

ईरा साहित्यक्षेत्राचा नवा मानदंड


ईरा म्हणजे संजना इंगळे

शब्दांनाही मायेचा आधार देणारं कुणीतरी असतं , प्रेमांने झालेला लेखणीचा सुखद स्पर्श अद्भूत निर्मिती करतो आणि तिथे साहित्याचा कुंभमेळा भरतो नेमकं असच ईरा या व्यासपिठाच्या निर्मितीचं झाले आहे.मॉम्सप्रेसोवर लेखनाचे पडघम वाजत असताना मनात नवनिर्मितीची बीजे निर्माण होत होती.लेखनाचा गाढा अनुभव आणि दिर्घकालीन दुरदृष्टीचा विचार यातून लेखकांच्या शब्दांना ख-या आधाराची सल मनात रुंजी घालू लागली.कणखर मनाने क्षितिजापलिकडेही झेप घेण्याची जिद्द केली आणि एका बावन्नकशी " ईरा " व्यासपिठाची निर्मिती संजना मॕडम यांनी केली.आता शब्दांनी गरुडभरारी घेतली होती कारण पंखाना आता बळ मिळाले होते.लेखकांचे शब्द टवटवीत झाले होते त्यांना आपल्या हक्काचे व्यासपिठ मिळाले होते.सुरवात कमी प्रतीसादाने जरी झाली असली तरी लेखकांची मर्मस्थाने काय आहेत त्यांना लेखनाच्या बाबतीत काय मदत हवी आहे याचा सुवर्णमध्य साधून लेखकांना सन्मानजनक वागणूक दिली. लेखकांची प्रतिभा हि त्यांची दैवी देणगी असते त्यांचा उचित गौरव व्हावा व लेखणीचा आदरयुक्त सन्मान व्हावा याचा विचार करुन लेखकांना त्यांच्या लिखाणाला आर्थिक सुबत्ता देण्याचा पहिला प्रयत्न संजना मॕडम यांनी केला आणि ईरावरील लेखकांच्या लेखणीने गतीमानतेचा राजमार्ग धरला.

लेखकांनी आपले विविध चतुरतेने भारलेले लेखन ईरावर सुरु केले आणि वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला.अल्पावधीतच ईरा नावारुपाले आले त्यात महिला लेखिकांंचा मोलाचा वाटा आहे.अनेक जबाबदारीचे ओझे मनावर असताना आपल्या भावना लेखनाच्या माध्यमांतून ईरावर व्यक्त केल्या आणि स्री हे विचारांचे भांडार आहे सिद्ध केले.ईराच्या सौजन्यपुर्ण वागणूकीमुळे लेखक दिलखुलास लिहू लागले.विविध स्पर्धा त्यांचे योग्य परिक्षण यामुळे लेखकांनी ईराला प्राधान्य दिले.ऐतिहासिक चॕम्पियन ट्रॉफी , राज्यस्तरीय स्पर्धा , गोष्ट छोटी डोंगराएवढी , जलद लेखन स्पर्धा अशा नाविन्यपूर्ण स्पर्धेमुळे ईराला नवा लूक मिळाला याचे श्रेय संजना इंगळे , योगिताजी , सारंगसर , निशाजी प्रशासकीय टीमला जाते पण या सर्वांना एकत्र संवाद साधून संजना मॕडम यांनी एक स्री सुद्धा साहित्यक्षेत्रात प्रगती करु शकते हे दाखवले आहे.आता ईरा समृद्धीने आणि वेगवान भरारी घेत आहे याचा लेखमंडळीना अभिमान आहे.

अलौकिक संयम , दूरदृष्टीता , अफलातून नियोजन , सर्वांना एकत्र जोडण्याची कला , साहित्याची उत्तम जाण , शब्दावर प्रभुत्व , प्रतिभासंपन्नतेची देणगी लाभलेल्या , ईरा व्यासपिठाच्या निर्मितीने लेखणीला बळ देणा-या ईराच्या सर्वेसर्वा आदरणीय संजना इंगळे म्हणजे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत . येणारे क्षण आनंदाचे यावेत , सुखसमृद्धीचे जीवन लाभावे , उत्तम आरोग्य लाभावे , ईराचा नावलौकि वाढावा व ईराची  अशीच प्रगती होत रहावी यासाठी भरभरुन शुभेच्छा ..!!

©®नामदेवपाटील
0