ईराचा हिरा : टीम शिवतेजा

टीम शिवतेजा मनोगत


"ईराचा हिरा : टीम शिवतेजा "

खरं तर ईरा अगदी पाळण्यातच होतं तेंव्हापासून ईराची नी माझी ओळख.ईराची पायाभरणी करताना सुरुवातीला काही पोस्ट लिहिल्या पण नंतर नंतर ते कमी होत गेलं. पण आपल्या मैत्रिणीच्या ईरा ह्या आविष्कारावर माया मात्र सदोदित होती जितकी
मैत्रीणीवर माया असते अगदी तितकीच.
ह्या स्पर्धेत उतरले तेंव्हा अगोदरच संघ बनले होते.
सुनीता चौधरी आणि मी खूप उशिरा प्रवेश केला.
तरीही सर्वांनी खूप मोठ्या मनाने स्वागत करून
प्रत्येक पायरीवर आमचे म्हणणे मान्य करत गेले.
संघ म्हटलं की वेगवेगळ्या मतांची टक्कर आलीच.
पण ती टक्कर क्षणिक असायची आणि सरतेशेवटी
टक्कर फक्त संकटांनाच द्यायची ह्या एकमताने आम्ही कामे करत गेलो.
चुका , गोंधळ सगळं सगळं अनुभवलं.
म्हणतात ना लढण्याचा अनुभव जास्त महत्वाचा असतो अगदी तसेच.
" शेवटपर्यंत लढायचे हे शिवरायांचे तेजोमय ब्रीद घेऊन आम्हीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली"
आर्या , कविता आणि श्रीकांत , ईश्वर ह्यांच्या कथा
जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यास मला यश मिळाले.
माझ्या मैत्रिणींनी केवळ मी शेअर करते म्हणून त्यांच्यासाठी नवख्या लेखकांच्या कथेलाही भरभरून कमेंट्स करत जे प्रेम माझ्यावर केलं त्याची मी सदा ऋणी राहीन.
प्रत्येकवेळी कमेंट करणारी सरिता , वैशाली ,मुक्ता, मीनाक्षी , तृप्ती , आर्या , नामदेव आणि माझ्या ग्रुपच्या सर्व सख्या माझ्या साठी माझ्या पूर्ण संघाला प्रोत्साहित करत होत्या ही मी केलेली सर्वात मोठी कमाई ह्या चॅम्पियन ट्रॉफीने मला दिली.
सुनीता माझ्या प्रत्येक निर्णय कुठलाही किंतु परंतु न करता ऐकून घेणारी ,ते इतरांना पटवून देणारी
माझी परम सखी तिच्याबद्दल काय बोलू???
ते सर्व सुजाण लोक जाणतातच.
सुरुवातीलाच तांत्रिक अडचणीत अडकलेली माझी सखी कविता वायकर , हताश न होता केवळ लक्ष केंद्रित करून लिहीत लिहीत दहाव्या भागापर्यंत भरगोस views पटकावत पुढे आली हे ह्या स्पर्धा नावाच्या समुद्रमंथनातील अमृतच मी समजेन.
माहीत नाही जिंकणार कोण पण खरी आव्हाने पेलून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करत ते पूर्ण करणे काही साधं काम नाही. हा अनुभव नक्कीच मला आणि कविताला समृद्ध करत गेला.
जास्तीतजास्त लोकांपर्यंत तिची कथा पोहचली आणि ती लिहीत राहिली ह्याचं मला मिळालेलं समाधान कुठल्याही संपत्तीपेक्षा नक्कीच कमी नाही.त्यासाठी ईराची मी सदोदित ऋणी राहीन.
आर्या आणि प्राजक्ताच्या कविता मनोहारी आहेत.
प्रत्येक लघुकथा एक वेगळी शिकवण देणारी आहे.
आर्याची कथामालिका तर वाईट स्वप्न सुंदर करून सोडणारी एक प्रेमकहाणी आहे.
ईश्वरसरांची जना शिवकालीन शौर्यगाथा आहे.
कविताची सागर आणि किनारा ह्या आकर्षित प्रेम गाथेने तर पब्लिक वेडी झाली.
आयुष्याच्या वळणावरची श्रीकांतची कथा ग्रामीण भागातील कष्ट आणि सच्चे अनुभव सांगणारी आहे.

बॉसच्या सुपीक डोक्यातून निघालेली on the spot लिखाणाची कल्पना एक आगळावेगळा अनुभव देऊन गेली. त्यासाठी खूप कौतुक बॉसच्या आतील गोड सखीचे.
प्राजक्ताने भर रस्त्यात असताना प्रवासात on the spot लिखाण चॅलेंज पूर्ण केलं त्यासाठी तिचं विशेष कौतुक करायलाच हवं.
आपल्या कामात काम काढून लिहीणाऱ्या प्रियांका आणि सुवर्णा , मार्केटिंग केलेल्या पोस्टवर आवर्जून कमेंट्स करत होत्या त्यासाठी खूप आभार.
सुवर्णाने घेतलेली मुलाखत आणि सुनीतानेही संघ मागे पडू नये म्हणून आधीच घेऊन ठेवलेली मुलाखत बघून तर त्यांच्या मेहनतीला खरंच सलाम करावा असेच आहे.
अनुप्रिया प्रत्येकवेळी डोक्यावर बर्फ ठेवून तब्येत बरी नसतानाही मदतीला धावून यायची त्या गोड मदतीसाठी तिचे आभार नाही मानणार त्यासाठी तिला एक कृष्णमयी प्रेमळ झप्पी.
कॅप्टनचे तर काय सांगू , चौफेर व्यक्ती आणि वल्ली सांभाळून नाव किनाऱ्यावर लावली हेच तिचे खरे यश. मला आणि सुनीताला म्हणजे निखारा आणि बर्फाची लादी असं काहीसं तळहातावर पेलण्यास ईराने जी तिला संधी दिली त्याचं मनोगत तिला न विचारलेलेच बरे ????
असो पण नेहमी मधाळ आवाजात बोलून काम करून घेणाऱ्या कॅप्टनचे खूप खूप आभार.
ईरा टीमला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम.
शिवतेजाकडून...???
©®पूनम तावडे लोखंडे