आंतरजाल भाग - 2

Amit requires a hacker for further investigation.

या आधी -

         रिया मेहता जी अमित ची जिवलग मैत्रीण होती . ती अचानक बेपत्ता झाली . अमितची मदत घ्यायला वर्षा त्याच्या घरात जाते . अमित तिला मदत करायला तयार होतो .

---------------------------------------------------------

     तिघेही पोलिसांच्या गाडीमध्ये बसले आणि घराच्या दिशेने

निघाले. अमितच्या मनात खूप सारे प्रश्न येत होते. रिया कुठे गेली असेल ? गेली असेल तर का आणि कशासाठी गेली असेल ? या प्रश्नाचे शक्यता असलेले उत्तर तो शोधत होता .

     काही वेळात ते वर्षाच्या घराखाली पोहचले. अमित वेळ न घालवता घरात शिरला .

अमित, " रियाची रूम ?"

       त्याने वर्षाकडे एक नजर टाकताच वर्षाने वरच्या मजल्यावर बोट दाखवत खोली दाखवली. अमित , पाटील आणि वर्षा तिघेही त्या खोलीत पोहचले .

पाटील, " या खोलीतल्या वस्तूला हात लावलेला नाही ना ?

तो वर्षाकडे पाहत म्हणाला . 

वर्षाने मान हलवत नकार दिला . अमित खोली पाहत होता. खोलीला एक खिडकी होती. त्या खिडकीला फक्त पडदे होते. 

अमित, " खिडकीला ग्रिल वगैरे का नाहीये ?"

वर्षा, " रियाला खिडकीतून खाली पाहायला खूप आवडत होतं . म्हणून आम्ही ग्रिल लावलंच नाही ."

       अमित खोलीत इतरत्र पाहत होता . त्याने बेडच्या खाली पाहिले . तर त्याला तिथे कागदाचा एक बोळा दिसला. तो हात घालून त्या कागदाच्या बोळ्याला काढण्याचा प्रयत्न करू लागला.  खूप प्रयत्नाने त्याच्या हातात कागदाचा बोळा आला . त्याने तो कागदाचा बोळा उलगडला . उलगडताच त्याला कळले की त्या कागदाच्या बोळ्यात मोबाईल दडलेला होता . मोबाईल साधा फंक्शनल व आकाराने लहान होता . म्हणून कोणाला दिसला नसावा .

अमित, " आता कळलं का पाटील सर ? लोकेशन इथलं का दाखवत होतं ते."

पाटील, "हो . पण हा मोबाईल रियाचा दिसत नाहीये."

अमित, " हो ... या मोबाईलला आणण्यात आलाय."

पाटील, " मग रिया कशामुळे बेपत्ता झाली असेल ?"

अमित, " पाटील सर ... ती बेपत्ता झाली नाहीये . तिला किडनॅप केलं गेलंय."

पाटील, " का ऽऽऽ य ?"

अमित, " हो."

पाटील, "तू कसं काय म्हणू शकतोस ?"

अमित, " खिडकीला कपड्याचा तुकडा लागला आहे. तो रियाच्या कपड्याचा आहे आणि ती जर स्वतःहून गेली असेल , तर ती खिडकीतून कशी काय जाऊ शकते ?"

पाटील, " मग ते पत्र ?"

अमित, " पत्र तर किडनॅपर सुद्धा लिहू शकतो ना ?"

पाटीलला आता सर्वकाही पटत होते .

पाटील, " किडनॅप केलं असेल तर आतापर्यंत फोन आला असता."

अमित, " म्हणजे किडनॅपरला पैसे नकोत."

पाटील, " मग दुसरं काय कारण असू शकतं ?"

अमित, " कोणीतरी सूड घेण्यासाठी हे काम केलं असेल."

अमित विचार करू लागला. काहीतरी आठवताच तो वर्षाकडे वळला आणि विचारले.

अमित, " काकू , तिच्या मागे कोणता मुलगा असलेला तुम्हाला जाणवलं का? म्हणजे एकतर्फी प्रेम वगैरे ..."

तो तपासाची सगळी दिशा पाहत होता .

वर्षा, " नाही... तस काही असतं तर तिने मला सांगितलं असतं ."

अमित आता मात्र विचारात पडला.

पाटील, " अमित .. आता काय करायचं ?"

त्याने काहीवेळ विचार केला आणि म्हणाला.

अमित, " आजकाल सोशल मीडिया आयुष्य दाखवतं . म्हणजे आता रियाचं अकाउंट चेक करावं लागेल."

पाटील, " तुला तिच्या अकाऊंटबद्दल माहिती आहे का ?"

अमित, " नाही."

पाटील, " मग ?"

अमित, " आपल्याला एखाद्या प्रोफेशनल हॅकरची मदत घ्यावी लागेल."

पाटीलला अचानक काहीतरी सुचलं आणि तो म्हणाला .

पाटील, " आठवलं ."

अमित, " तुझ्या ओळखीचं कोणी आहे का ?"

पाटील, " हो आहे ."

अमित, " कोण आहे तो ?"

पाटील, " तो नाही ती ."

अमित, " म्हणजे ?"

पाटील, " कळेलच ."

त्याने खिशातून मोबाईल काढला आणि काहीवेळ फोनवर बोलून तो परत आला .

पाटील, " थोडी वाट पाहावी लागेल."

      थोड्याच वेळात वर्षाच्या घरापुढे एक कार येऊन थांबली . त्या कारमधून एक मुलगी खाली उतरली. ओठांमध्ये च्युईंग गमने फुगा फुगवत ती घरात येत होती. जीन्सची शॉर्टपँट, काळ्या रंगाचा टी- शर्ट, डोळ्यावर  स्टायलिश गॉगल आणि प्रचंड आत्मविश्वास. अशी काहीशी ती बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर येत होती.

     अमितची नजर तिच्यावर पडली. तेव्हा त्याला नवल वाटले की मुलगीही हॅकर कसं काय असू शकते ? ती खोलीत येताच तिच्या बॅगमधला लॅपटॉप काढून कामाला लागली .

पाटीलने तिला आधीच सर्व काही  समजावले होते. ती एक शब्दही कोणाशी न बोलता काम करत होती. फक्त कीबोर्डचा आवाज मोठ्याने येत होता. काहीवेळ शांततेत गेला. अचानक ती पाटीलकडे वळली.

ती, " कुणाचं अकाउंट हॅक करायचं आहे ?"

पाटील, " रिया मेहता ."

ती परत लॅपटॉप कडे वळली. अमितने पाटीलवर नजर टाकली.

पाटील, " तिचे  नाव प्रिया ठाकूर . उत्कृष्ट हॅकर आहे."

अमित, " हम्म . "

अस म्हणत तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहू लागला.

प्रिया, " अकाउंट हॅक झालं आहे. बोला काय पाहायचं आहे ?"

अमित लॅपटॉपजवळ आला आणि पाहू लागला.

अमित, " तिच्या प्रोफाईलवर जा."

तिने प्रोफाईलला क्लिक केले .  पण दोघांना धक्का बसला. अकाउंटला फक्त एकच फोटो होता. 

अमित, " तिच्या मेसेंजर वर जा."

     प्रियाने मेसेंजर ओपन केला. पण तिला एकही मेसेज आलेला नव्हता. आता प्रियालाही नवल वाटू लागलं.

     अचानक लॅपटॉपवर एक संदेश आला. ठळक अक्षरात 'आय हेट यू.' असे लिहिलेले होते . असे येताच प्रियाचा लॅपटॉप बंद झाला.

अमित, " काय झालं?"

प्रिया, " आय हेट यु व्हायरस ."

अमित, " म्हणजे ?"

प्रिया, " म्हणजे कोणीतरी आपल्याला अकाउंट पाहू देत नाहीये."

अमित, " पण तू तर हॅकर आहेस."

प्रिया, " पण मलाही हे अवघड आहे."

अमित, " का ?"

प्रिया, " डार्क वेब ..."

अमित, " म्हणजे ?"

प्रिया, " डार्कवेब एक असे इंटरनेट आहे कि त्यावर कोणीही काहीही करू शकत.

 म्हणजे मारण्यासाठी सुपारी देणे , बॉडी पार्टस विकणे , पॉर्न व्हिडिओज पोस्ट करणे आणि पब्लिक किलिंग. आपण त्यांना ट्रेस करू शकत नाही. डार्क वेब हे खूप भयानक इंटरनेट आहे . "

अमित, " पब्लिक किलिंग म्हणजे ?"

प्रिया, " म्हणजे कुणालाही किडनॅप करून नेटवर लाईव्ह विडिओ करून मारणे. नेट वर असलेले मारण्यासाठी पैसेही देतात."

हे सर्व ऐकताच पाटील आणि अमितला थोडीशी चिंता वाटू लागली.

पाटील, " त्या पैसे पाठवणाऱ्याला ट्रेस करू शकतो ना ?"

प्रिया,  " नाही . ते पैसे बिट कॉइन मध्ये देतात. त्याला ट्रेस करू शकत नाही."

सगळे आता चिंतेत पडले.

पाटील, " आता कसं शोधून काढायचं ?"

अमित विचारात पडला .

अमित, " तू डार्कवेब मध्ये जाऊ शकत नाही का ?"

तो प्रियाला उद्देशून म्हणाला .

प्रिया, " मी सर्फ करू शकते. पण ते खूप धोकादायक आहे."

अमित, " प्लिज प्रयत्न कर."

हे ऐकताच तिने दुसरा लॅपटॉप काढला आणि डार्क वेबवर लॉगइन केले.

अमित, " पब्लिक किलिंग च्या वेबसाईट वर जा."

प्रियाने तिथे लॉगिन केले.  तिथे गेल्यावर खूप  व्हिडिओज होते .

अमित, "पाच किंवा सहा दिवसा आधीचे विडिओ बघ."

ती पाच दिवस मागचे  विडिओ शोधू लागली. त्यांना एक विडिओ सापडला. ज्यात एक कुरळे केस असलेल्या मुलीच्या डोळ्यात स्क्रू ड्राइवर खुपसला आणि त्यानंतर  चाकूने  तिचे हृदय बाहेर काढले. प्रियाने तर हे पाहताना भीतीने डोळेच बंद केले . 

अमित, " हिला मी कुठेतरी पाहिलंय ? वर्षा काकू तुम्ही पहा."

अमित लॅपटॉपवर पाहून रियाच्या आईला म्हणाला.

वर्षा,  "अरे ही तर रियाची मैत्रीण वैशाली आहे."

असे म्हणत ती रडू लागली . अमितच्या पुढे खूप काही प्रश्न उभे झाले.

**********

क्रमशः

©️ ऋषिकेश मठपती

डार्क वेब या नवीन विषयावरची एक रहस्यकथा. वाचत रहा

'आंतरजाल'.

पुढील भाग लवकरच...

🎭 Series Post

View all