Jan 23, 2021
माहितीपूर्ण

Internation democracy day

Read Later
Internation democracy day

International democracy day

क्रिकेट ,सिनेजगत ,राजकारण ......अश्या बऱयाच विषयांशी निगडित माहित सांगणारे उतारे चा उतारे पाठवणारे आपल्या स्टेटस ला लावणारे बरेच msg येतात ....परंतु आज  लोकशाही बदल माहित देणारे एक ही उतारा मात्र आज कुठे दिसलें  नाहीत 

                          मला ही स्टेटस लाच लावायचं होत पण ,आपल्या देशात घडणाऱ्या घटना बघता मत व्यक्त कारण जास्ती सुखावणार वाटलं असं म्हंटल तरी वागव ठरणार नाही ,.......

Democracy-  demo-जनता ,cracy-सत्ता 
एकंदरीत लोकांनी लोकांसाठी केलेली कायदे  व्यवस्था....
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असं अभिमानानं बोललं जात.पण त्या दिवशी त्या बद्दल साधी चर्चा देखील होऊ नये हे या संविधानच दुर्भाग्य ......कारण आपल्यला सुशांत सिंग ,कंगना ,हिंदू -मुस्लिम ,जातीवाद .....या गोष्टी जास्ती महत्वाच्या वटतात .....प्रसार माध्यम म्हणून ते  दाखवतात कारण आपण ते बघून त्याची trp वाढवतो ,या सर्वात कुठे तरी आपण ही तेवढंच जवाबदार आहोत ...आपण सरकार च लक्ष आपल्या प्रश्ना कडे खेचण्यासाठी असमर्थ आहोत ....आपण तेच बघतो त्याना जे दाखवायचं असत,दिल्ली ला आजाद मैदानात संविधानाचा प्रति जडण्यात आल्या त्या वर एकही समाज माध्यमाने चर्चा घडून आणली नाही ...भारतात असा ही वर्ग आहे जो या देशाच्या संविधाना ला मनात नाही ,हा विषय केवढा गंभीर आहे ,हे यातून कळत .

पत्रकारिता हा लोकशाहीचा 4 स्तंभ आहे ...परंतु आज देशात खरी पत्रकारिताच उरली नाही ये न स्वीकारलेलं सत्य आहे .
लोकशाही ही हक्क ,स्वतंत्र ,समता ,बंधुता या तत्वांवर आधारलेली आहे ..परंतु या गोष्टी किती प्रत्यक्षात उतरवल्या जातात ....
हक्क तर न बोलले च बर ,हक्क सांगण्याच  स्वतंत्र  उरलं नाही ,जो प्रश्न विचारतो त्याला antinational tag लावून चूप बसवलं जात .

                        1953 ला bbc ला दिलेली आंबेडकरांची मुलकात विशेष ठरते,त्यानी  67वर्षा  आधी ठरवलेलं भाकीत  आज खरं ठरताना दिसत  आहे ......भारतात लोकशाही टिकणार नाही ते कोलमडून पडेल  असं ते  बोल्ले, कारण भारतीय  राजकारणावर समाज व्यवस्थेचा पगडा जास्ती आहे .....भारतात लोकशाही च   स्वरूप जे दिसत त्या पेक्षा ग्राउंड लेवल वर गोष्टी बऱयाच वेगळ्या आहेत ....पुढे सांगताना ते बोल्ले भारत लोकशाहीच विभाजन 2 भागात होत 
1)सामाजिक लोकशाही 
2)राजकीय लोकशाही 
सामाजिक लोकशाही ही  समाजव्यवस्थेशी निगडित आहे त्याचा सरळ  परिणाम हा  राजकीय लोकशाही वर होतो.सामाजिक लोकशाही चा पाया खंबीर केला तरच आणि तरच राजकीय लोकशाही टिकेल .
ही भारताची परिस्थिती कोणीही नाकारू शकत नाही ...पुढे त्यानी 1956साली लोकशाहीशी निगडित भाष्य हे आज  च्या परस्थिती शी  तंतोतंत लागू होताना आपल्याला दिसतील ...जर लोकांनी राजकीय पक्षाची विचारधारा ही देशापेक्षा मोठी असं समजायला लागले तर देशाचं विघटन होऊ शकत ..पुढे ते म्हणतात धर्म माणसाची नैतिक गरज आहे ,धर्म तुम्हला आत्मिक समाधान देत,पण धर्म तुम्ही राजकारणात आणता कामा नये..जेव्हा धर्म तुम्ही राजकारणात घेऊन येता तेव्हा विभूती पूजा वाढते ...असं झालं तर ते हुककूमशाही कडे वाटचाल असेल .

 कुठे तरी तीच परिस्तिथी आज आपली झली आहे ,बरेचशे महत्वाचे मुद्दे त्यावर चर्चाच होत नाही ...समाजात विषमता वाढत चालली आहे ,समाजव्यवस्था मुजबूतीने पाय रोवत आहे ,महत्वाच्या मुद्दांचा विसर सर्वांना पडत आहे ,समाज माध्यम पंगु होत आहे ,आपले विशेष अधिकार नाहीसे करण्याचा प्रयत्न होत आहे ,मजबूत असा विरोधी पक्ष उरलेला नाही,खाजगीकरण ,बँकात होणारे घोटाळे या कडे कानाडोळा केला जात आहे,प्रश्न विचारायचा अधिकार लोकशाही आपल्यला देते ,सत्ते ला प्रश्न विचारांचं लोकशाहीचा आधार आहे.

आपल्या सारख्या तरुण वर्गावर या देशाच्या लोकशाहीच भविष्य टाकलेलं आहे ...आशा महत्वाच्या मुद्द्यनवर चर्चा व्हायलाच हवी ....काही विशेष लोकांचं आहेत जी आपल्या परीने या गोष्टींवर चर्चा करतात ...त्यातलीच  तापसी पन्नू ,बरेच celebrity आहेत , कोणाला आपल मत मांडव वाटलं नाही पण ती आपल म्हणणं ठाम पणे मांडते आज  ही तिने तिचा इन्स्टा वर छान सा video share केलेला आहे .
 

                   लेखन -गंगा मेश्राम

Circle Image

Ganga Mesharam

No

I m intrested in dancing ,writing,reading