मनाचा जागर...
करावा मनाचा जागर,
ज्याचा महिमा अपार..
ज्याचा महिमा अपार..
मनी असावा भक्तीचा,
श्रद्धेचा जागर...
नसावा अभक्ती ,
अंधश्रद्धेचा सागर...
दु:खातही भरावी
मायेने सुखाची
ही घागर....
आनंदी लाट
येता अंगावर,
प्रेमाने भरेल मग
आयुष्याचा सागर...
करावा मनाचा जागर,
व्हावया आयुष्याचा
सुखसागर...
ज्याचा महिमा अपार...!!
- हर्षदा नंदकुमार पिंपळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा