सुख म्हणजे नक्की काय

सुख कशात आहे


सुख म्हणजे नक्की काय ( भाग १)


आज गेट टुगेदर आहे. सीमाच्या जुन्या शाळकरी मैत्रिणींच. कर्म धर्म संयोगाने सगळ्या एकाच गावात म्हणजे पुण्यात. लग्न होऊनही इथेच राहिल्या, परगावी गेल्या नाहीत हे महत्वाचे. सगळा ग्रुप बारा पंधरा जणी म्हणजे नुसता कल्ला असायचा पुर्वी. घरी आल्या की घर डोक्यावर घ्यायच्या. मग सीमाच्या आजी आजोबांची सीमाच्या आईच्या मागे भूणभूण चालायची. त्यांना काही हा दंगा सहन
व्हायचा नाही. आता सगळ्या आहेत पण गेट टुगेदरला किती येतील कुणास ठाऊक. हल्ली किमान फोन मुळे सारख बोलणं तरी होते. पुर्वी वर्ष वर्ष भेट व्हायची नाही. पत्रातून हाल हवाल करायची तेवढेच.
सकाळ पेपर वाचत होती सीमा पण मनात मात्र विचार. तेवढ्यात शलाका सीमाच्या सून सीमासाठी गरमागरम नाष्टा आणि काॅफी घेऊन आली.
" तू पण बस गं शलाका. एकटी कुठे बसते स्वयंपाक घरात? " सीमा
" हो. आलेच. " शलाका तिचा नाष्टा आणि काॅफी घेऊन आली. " आई आज तुला जायचयं ना गेट टुगेदरला? मस्त एंजॉय कर. आणि फ्रेश होऊन ये. " शलाका.

" हो गं. आज फूल टू एंजाॅय करणारे. मागच्या वर्षी कितीतरी जणी येणार नव्हत्या म्हणून कॅन्सल झाले होते. या वर्षी बर्याच येणार आहेत. धमाल येईल. " सीमा.

" हं. किती वाजता जायचयं? " शलाका.
" येईलच आत्ता गाडी घ्यायला. आपल्या इथूनच पुढे जायचयं ना? " सीमा.

" ती बघ आलीच. चल बाय मी निघते. आणि फोन करून त्रास देऊ नका हं सारखा. काही होत नाही मला. आणि तुझ्या सासर्यांना सांग मी गेले म्हणून. "
सीमा निघाली. ब्लू कलरची जीन्स त्यावर स्काय ब्लू कलरचा टाॅप आणि लाईट मेक अप. अगदी टवका दिसत होती वयाच्या साठी सुद्धा. ती गाडीत येऊन बसल्या बसल्या कोणीतरी पचकले " आली हिरोईन". सीमा नुसते बघून हसली. " म्हणाली, चलो लेट्स एंजाॅय. " आणि सगळ्यांनी जोरजोरात गाणी म्हणायला सुरुवात देखील केली, अर्थात त्यांच्या जमान्यातील. नुसता हैदोस चालला होता. दीड दोन तास कसे गेले त्यांच त्यांना ही समजले नाही. गाणी म्हणत म्हणत मस्ती करत सगळ्या वाई जवळच्या "माई रिसाॅर्ट वर येऊन पोचल्या देखील.

गेल्या गेल्या मस्त पाणीपुरी चाट वडापाव खाऊन झाले. वर गरम गरम आल्याचा चहा. सगळ्या एकदम खूश होऊन भटकायला निघाल्या. चालता चालता गप्पा चेष्टा मस्करी चालली होती. अपवाद होती फक्त मनिषा. मनिषा फार कोणात मिसळत नव्हती. गप्प गप्प होती. शेवटी रागिणीने तिला बोलती केली. मनिषा सांगू लागली, " हं. फक्त आजचाच दिवस ही एंजाॅयमेंट. आजच्या दिवस सुट्टी आहे मला. उद्यापासून परत कामावर रुजू व्हायचयं. " मनिषा.
" अग कसलं काम. आता साठी उलटल्यानंतर नोकरी धरलीस की काय? " सगळ्यांचा एकच प्रश्न.

" नाही ग. नोकरी नाही. पण घरचीच नोकरी आहे. ते करायलाच हवे ना. तरच सगळं नीट. नाहीतर" म्हणत मनिषा ने डोळ्यातल पाणी पुसले. " नाहीतर मला जेवायला पण नाही मिळायचं आणि ह्यांची आणि सुनेची बोलणी खावी लागतील ते वेगळेच. "

सगळे ऐकून सगळ्याच मैत्रिणी हळहळल्या आणि त्यावर तोडगा काढायचाच हे ठरले.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all