मोह

Is It A Infatuation ?
मोह

स्व. नारायण धारप यांच्या \" प्राध्यापक वाईकरांची कथा \" या कादंबरीतील एका प्रसंगावर आधारित.

शहराच्या गजबजाटापासून भिन्न राहणारा, एकांतातला हा भाग होता. अशा या परिसरात तो पांढरा शुभ्र, दोन मजली भव्य बंगला मोठ्या दिमाखात उभा होता.बंगल्याच्या दोन्ही बाजूने ( मागूनही असावी. ) कंपाऊंडच्या लगत अशोकाच्या उंच झाडांची रांग होती. समोरच्या पोर्चवरील हिरव्यागार लॉनचा थोडा भाग दिसत होता. त्याच्या मधोमध येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी अरूंद, सरळ पायवाट‌. तिच्या शेवटी उंच, भरभक्कम करड्या रंगाचं कुलुपबंद फाटक. डाव्या बाजूला एक छोटस, सुंदर बंगलीवजा घर होतं. इतरही घरं, बंगले होते ; पण ते थोडे दूरवर होते.
दुपारची वेळ. हिवाळ्याचे दिवस असल्याने ऊन सौम्य होत. तो तरुण रस्त्यावर उभा होता. नजर समोरच्या त्या दुमजली बंगल्यावर खिळलेली. उंची भरपूर, परंतु बांधा किरकोळ. वर्ण काळासावळा. मोठ्या बटबटीत डोळ्यात धूर्तपणा.‌ एक भुरटा चोर होता तो. गेली तीन चार दिवस या बंगल्यावर त्याचं लक्ष होतं. सध्या इथे कुणी राहत नसल्याची, आणि शेजाऱ्यांच्या बोलण्यातून किमान आठवडाभर येणार नसल्याची खात्री पटल्यावर आज रात्रीच बंगल्यावर हात साफ करायच त्याने ठरवलेलं.
इतका मोठा, ऐटबाज बंगला म्हणजे त्यात कित्ती मौल्यवान चीजवस्तू असतील, लॉकरमध्ये कित्येक तोळे दागदागिने असतील, खूपशी रोकड असेल. असा मनाशी विचार करीत तो समोर बघत होता. नजर बंगल्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिरभिरत होती. इतक्यात वरच्या मजल्यावरील एका कडेच्या खिडकीच्या काचेआड एक चेहरा डोकावल्याचा त्याला भास झाला. त्याने चमकून त्या खिडकीकडे पाहिलं. अर्ध्यापेक्षा जास्त भागावर पडदा होता, उर्वरित थोडासा भाग अंधारात होता. काळ्याशार अंधाराच्या गर्भात काय दडले आहे, काय धुमसत आहे याच आकलन मानवी मनाला होण अशक्य आहे.

त्याने स्वतःशीच हसत नकारार्थी मान हलवली. मग डावीकडे वळून तो चालू लागला. त्या खिडकीचा पडदा हळूहळू पुढे सरकला, अन् बाकीचा भागही त्यामागे झाकला गेला.

क्रमशः

आवडल्यास ग्रुपला भेट द्या :-
https://www.facebook.com/groups/758165158061766/permalink/993360487875564/?app=fbl

🎭 Series Post

View all