लॉक डाउन मधलं इंदू -बिंदू च महिला मंडळ इंदू बिंदू या दोघी सख्या मैत्रिणी प्रत्येक गोष्ट एकीने केली की दुसरी त्याहून वरचढ करणारी चला तर आज ह्या दोघींच्या महिला मंडळाच्या गप्पा ऐकूया इंदू : काय ग बिंदू कुठे होती? अनलॉक सुरू होऊन महिना झाला तरी महिला मंडळात तुझा पत्ताच नाही कुठे गेली होती? बिंदू : अगं अनलॉक मुळे दुकान सुरू झाली पण आपलं रुटीन थोडच बदललं बाई. इंदू: का गं काय झालं? बिंदु: अगं नवरा ऑफिसात जातो किंवा बाहेरून येतो ना तेव्हा त्याला सूचना देता देता मला तरी घामच फुटला. इंदू : हो ग खरंच! मलापण धाप लागते रोज रोज तेच- तेच सांगून, पण हा माणूस कानावर गोष्ट घेत नाही. बिंदू: अगं माझ्या रावांना कितीवेळा सांगितलं रोज बाहेरून आलं की स्वतःचे कपडे, सॉक्स, हात- रुमाल, हात मोजे, तेव्हाच धुवायचे, चांगले कडक पळून, झटकून , वाळत घालायचे पण नाही सगळं करतात आणि शेवटी कपड्यांना चिमटे लावन विसरतात इंदू: काय सांगतेस! मी तर माझ्या साहेबांना त्यांचा स्वतःचा डबा काय, पण आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक शिवाय, भाजीपाला -वाणसामानआणणे आणि भाज्या धुवून, सुकवून ,फ्रिजमध्ये ठेवायला त्यांनाच लावते ,शिवाय मिनूचा माझ्या मुलीचा अभ्यास पण त्यांना घ्यायला लावते. बिंदु: अग मी तर "यांना" दाराचे हँडल, गाडीचे हँडल आणि घरची लादी सगळंच पुसायला लागते. इंदू: हो ना बघु आपले "अहो" हे सगळं नाही करणार तर corona भारतातून कसा जाणार? बिंदु: ते जाऊ दे ग!, लॉक डाऊन मधले आपल्या महिला मंडळाचे सामाजिक उपक्रम माहिती आहेत का तुला ,एके एक काही पण बक्षीस पात्र उपक्रम होते हो. इंदू: होना!ती देशमुखांची नीता लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी. N_95 मास्क चे तिने चार खोके विकत घेतलेले. म्हणजे एकूण जवळपास एक हजार मास्क आहेस कुठे. आणि फेसबुक वर मारे मास्क लावून सेल्फी टाकत होती. बिंदु: अग ती "पाटलांची आशा" कोण्या एका राजकीय पक्षात महिला आघाडीत आहे, तिने तर जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा सपाटाच लावला होता. गावातल्या प्रत्येक प्रभागात जाऊन तिने किट वाटली. प्रत्येका सोबत सेल्फी घेऊन स्टेटस ला टाकत होती. इंदू: ती "देशपांडे मंडळी" माहिती आहेत ना तुला! मुलाचा वाढदिवस म्हणे ,त्यांनी बे घरांसोबत साजरा केला. बिंदु: अग त्यांच्या घरी कुठल्याही कार्यक्रमाचा एकच मेनू असतो "छोले पुरी". इंदू: अगदी बरोबर तेच देशपांडे तर ते बे घरं काय म्हणत होते माहिती आहे त्या प्रिती ला " बाई साहेब आज तुम्ही सतराव्या समाजसेविका आहात मुलाच्या वाढदिवसाचे जेवण देऊन ,पेपर साठी फोटो काढणाऱ्या. कालही अशाच दहा बारा जणी येऊन वाढदिवसाचे नाव सांगून ,फोटो काढून गेल्या' बिंदु: अग हे तर काहीच नाही ती "जाधवांची रीमा" तीने तर नवर्याला हट्टच केला की, लग्नाचा वाढदिवस गोरगरिबांना अन्नदान करून साजरा करूया इंदू: पण ती तर मला सांगत होती की, लग्नाच्या वाढदिवसाला तिच्या नवऱ्याने तिला आय फोन सिक्स दिला. बिंदु: अगं ते तर खरंच, पण खरी गंमत काय माहिती आहे का, जेव्हा अन्नदान करण्यासाठी ती आणि तिचा नवरा गरीब वस्तीत किट वाटायला गेले, तेव्हा ते लोक म्हणत होते "आता आम्हाला किट नको, स्वीट नाहीतर कपडे द्या " आणि पुढची तर गंमत अजूनच आहे. हे दोघं किट वाटताना सेल्फी घेत होते, तेव्हा मोबाईलची बॅटरी लो झाली तर तिथल्याच एकाने सेल्फी घ्यायसाठी आयफोन सिक्स तिला बरं का! इंदू: अग बाई! खरंच सांगतेस कि काय, गरीब वस्तीतल्या लोकांकडे चक्क आयफोन सिक्स गंमतच आहे बाई! बिंदु: अगं चांगल्याचा तर जमानाच नाही दुनिया अशीच आहे लबाड अन बिलंदर. चल बाई निघते मी घरी राव यायची वेळ झाली आहे मग रात्रीचा मेनू लवकर सांगितला नाही तर, नुसता वरण-भात करून ठेवतात. इंदू: हो ग आमचे साहेब नाही नुसतच खिचडी करतात चल मग भेटू पुन्हा निवांत गप्पा मारायला बाय | ReplyForward | | | |