Mar 01, 2024
वैचारिक

माझा देश... भारत

Read Later
माझा देश... भारत

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं म्हणतात...  म्हणजे त्यात शंकाच नाही. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, अनेक भाषा आणि त्यांच्या संस्कृती. भारतात १०० किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळे भाषा बोलणारे, पोशाख घालणारे तसेच खाण्याच्या पदार्थांची चव बदलते आणि जगाच्या पाठीवर इतकी विविधता असलेला माझा भारत हा एकमेव देश आहे अर्थात अभिमान तर आहेच भारतीय नागरिक असल्याचा...!  दुर्दैव हे की यामुळे हीच विविधता कधी कधी देशाच्या विकासातील बाधा ठरते. म्हणजे कस ते सांगते. बॉलिवूडच्या अमर अकबर अँथनी ने देशातील एकात्मतेचे उदाहरण दिलं असलं तरी राजकारण करणाऱ्यांनी जरा ठिणगी टाकली की हिंदु मुस्लिम वाद पेट घेऊ लागतात आणि बळी पडतो तो एकात्मतेवर विश्वास असलेला सामान्य माणूस. आपण त्या देशाचे नागरिक आहोत जिथे स्त्री शक्ती ची नऊ दिवस पूजा होते आणि विसंगती म्हणजे त्याचं देशात दिल्ली निर्भया किंवा हैद्राबाद सारखी रेप प्रकरण घडतात. आपण मुलींना हे शिकवायला विसरत नाही की अनोळखी लोकांशी बोलू नये पण आपण मुलांना हे  शिकवायला विसरतो की मुलींना आदर देणे म्हणजेच आदर कमावणे आहे. जिथे मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहोचलेला आपला देश, गावागावात शैक्षणिक महत्त्व पोहोचवायला अपुरा पडतो आहे. ५% लोकांकडे ९५% संपत्ती आहे आणि बाकीचे ९५% टक्के मध्यम वर्गीय किंवा दारिद्र्यरषेखालील जिवन जगत आहेत. जितकी नैसर्गिक सुंदरता आपल्याकडे आहे तेवढी कुठेच नाही पण कोणीही ती सुंदरता जपत नाही आणि म्हणूनच निसर्गाचा आस्वाद घ्यायला जाणारे निसर्गावर कचरा रुपी अन्याय करून येतात. आता म्हणाल तू फक्त नकारार्थी गोष्टी बघतेय पण काय करणार जितकं भारतमातेला परमेश्वराने दिलय त्यापेक्षा कितीतरी आपण तिच्याकडून हिरावून घेतले. नाही बोलत फक्त प्रॉब्लेम्स विषयी. एक नागरिक म्हणून मला दिसणाऱ्या प्रॉब्लेम्स वर उपाय सुचवते.
१. माझे राज्य यापेक्षा माझं देश असा विचार करा. इतर राज्यांकडून काय शिकता येईल हे पाहावं. उदाहणार्थ केरळ मध्ये मुलींचा जन्मदर हा मुलांच्या जन्मदरापेक्षा जास्त आहे, इस्रो मध्ये नोकरी करणारे बहुतेक शास्त्रज्ञ हे दक्षिण भारतातले आहेत. यूपीएससी परीक्षेत जास्त करून उत्तर भारतीयच भाग घेतात.
२. घराघरात मुलींना समानतेची वागणूक लहानपणापासूनच देण्यात यावी. आईवडिलांनी हे संस्कार लहानपणापासूनच केले तर मोठ झाल्यावर कोणीही मुलींना आदराने वागवतील व चुकीच्या नजरेने बघणार नाहीत. 
३. सर्वच शाळेत मुलींना लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे दिले गेले पाहिजेत. 
४. सर्व सरकारी शाळेत माफक दरात चांगले शिक्षण देण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. जेणेकरून भारताचे भविष्य काही नव्हे तर खुप साऱ्या उज्वल हातांमध्ये असेल.
५. भारत आपला नाही तर माझा देश आहे अशी भावना मनात आणली तर आपण कचरा रस्त्यावर फेकणारच नाही ना... कारण देश आपला म्हणून आपण कचरा करतो पण घर माझं म्हणून स्वच्छ ठेवतो.

काही उपाय मी सुचवले तर काही तुम्ही सुचवा कॉमेंट्स मधून... दरवेळी सरकारला दोष देऊन उपयोग नाही ना. बदल स्वतःपासून सुरु होतो. तुम्ही बदला... उशिरा का होईना देश ही बदलेल...????

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//